Skip to main content

प्रकटन

कामवाली

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 24/09/2011 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हा कदाचित, भारतात राहण्यार्‍या भारतीय (आयटी वाईफ्/वर्किंग वाईफ/रिच नॉन वर्किंग वाइफ) गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय असेल. आजकाल चांगली कामवाली मिळणे कठीण गोष्ट आहे असे ऐकिवात आहे. ;) गोष्ट तशी जुनी आहे. मी बेंगलोरात नवखाच गेलो होतो तेव्हाची. ऑफिस शहराबाहेर असल्याने जवळपास रहाणे क्रमप्राप्त होते, पगारही कमीच होता. लोटेगोल्लाहली नावाच्या खेड्यासम एरीआ मधे १ बीएचके जागेत रुमपार्टनर हवा आहे म्हणून अ‍ॅड लागली होती हापिसात. भाडं कमी होतं, पंजाबी रुम पार्टनर म्हणजे खाण्या आणि "पिण्याची' आबाळं होणार नाहीत अशी अपेक्षा करुन चांगभलं म्हंटलं. शनिवारी संध्याकाळी रहायला गेलो.

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

लेखक VINODBANKHELE यांनी शुक्रवार, 23/09/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्

निदान नमस्कार तर कराल?

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 23/09/2011 04:44 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी कामावर निघण्याच्या गडबडीत नित्यकर्मे उरकत असतांना पत्नीच्या आई म्हणाल्या, "आज अविधवा नवमी आहे, निघतांना आईच्या फोटोला नमस्कार करून जा, आणि येतांना दुध-केळी आणायला विसरू नकोस." गेली ३० वर्षे पत्नीच्या आईना मीही 'आई'च म्हणतो. त्याही त्यांच्या मुली इतकंच माझ्यावर प्रेम करतात, क्वचित कधी हक्काने रागावतातही. लग्नानंतर माझ्या आईला विचारलं होतं, "मी त्यांना आई म्हणालो तर तुला चालेल का गं?", तर म्हणाली "अरे बाबा, दोन आया मिळणं याला नशीब लागतं, त्या किती प्रेम करतात ते पाहिलंय मी, मला वाईट तर नाहीच, उलट आनंदच वाटेल. फक्त तूच लक्षात ठेव, आई म्हणशील तर तसा मानही ठेव!" मी जमेल तितकं ते पाळतो.

प्रिय माधुरीस

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 20/09/2011 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय माधुरीस, तु तेज़ाबमधुन आलीस, वादळासारखी, आणि 1-2-3-4 च्या तालावर सर्वांना वेड लावलसं. मला मात्र 'कह दो के तुम हो मेरे वरना...' ह्या गाण्यात मांडीवर थाप मारुन अनिल कपुरला आर्ततेनं साद घालणारी तु प्रचंड भावलीस आणि चरचर काळीज कापत काळजात खोल रुतुन बसलीस. अजुनही ते गाणे आणि त्यातली तुझी ती थाप काळजात कालवाकालव करते.

आंदोलन

लेखक जयनीत यांनी सोमवार, 19/09/2011 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटीश सरकार विरुद्ध अधून मधून एखादी आंदोलनाची लाट उसळून जायची , मग काही दिवसांनी सगळं पूर्वपदावर येत होतं . कालपर्यंत अगदी उत्साहात असलेले कार्यकर्ते निराश होत होते . एकदा आंदोलनाचं लोण ओसरलं की मग पुन्हा आपल्या आयुष्याची जुळवाजुळव करत होते . निराशा झटकून परत उत्साहानी जमवा जमव करणारे विरळेच , तसे लोकं संख्येनी फार कमी होते . त्यातलाच माझा मित्र होता विश्वास . लहानपणा पासूनचा शेजारी , वर्गमित्र , बालमित्र . लहान असताना मी पण एका आंदोलनात भाग घेतला होता , सरकारी कचेरीवर पिकेटिंग होतं , आम्ही मुलांनी त्यात मोठ्या उत्साहानी भाग घेतला होता .

माझ्या वाचक मित्रांनो....................

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 18/09/2011 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचक मित्रांनो व मैत्रिणींनो, मी दोन महिने वाचनमात्र राहणार आहे. हिटलरच्या सेनापती व मंत्र्यांबद्दल मी लिहायचे कबूल केले होते ते जरा मागे पडणार आहे. मला आशा आहे आपण मला उदार अंतःकरणाने क्षमा कराल व माझ्या पुढील लेखनाची वाट बघाल. पुढील भाग असे असतील - ( दोन महिन्यांनंतर) अल्बर्ट स्पीअर पूर्ण करायचे अंदाजे ५ भाग अजून. हाईन्झ गुडेरिअन मुसोलिनी. मी हे लिहिणार हे निश्चित ! कारण हा माझा आणि आपला आवडता विषय आहे. अर्थात मधेच मी माझ्या छायाचित्रांचे धागे टाकीनच म्हणजे मी जिवंत आहे हे ही आपल्याला कळेल. :-) आपला, वाट चुकणारा, परंतू परत वाटेवर येणारा, जयंत कुलकर्णी.

डॉ. स्ट्रेंजलव्ह ... आणि माझं स्फोटांवर प्रेम जडलं

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 16/09/2011 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
"डॉ. स्ट्रेंजलव्ह" हा चित्रपट आपण पाहू या असं माईकने घरात जाहीर केलं तेव्हा सर्व ब्रिटीश घरमित्रांनी जोरात "हेऽऽऽ" करत गलका केला. त्यांच्या लेखी आम्ही काही "फकिन' फॉरीनर्स" मात्र एकमेकांकडे "हे काय नाव झालं का?" अशा चेहेर्‍यांनी पहात होतो. अर्थात असलं काहीतरी नाव बनवून आम्हाला बनवण्याचा म्याडपणा माईक करू शकतो अशीच खात्री त्यात जास्त होतो. तो दाणदाण पावलं वाजवत डीव्हीडी घेऊन टीव्हीरूममधे आलाही. "Dr Strangelove: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb" असं नाव असणार्‍या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल पोस्टर बघूनच निर्माण झालं.

एक स्वतःची भाषा

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 15/09/2011 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळीवर वावरताना आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे. काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया उदा... मोठे व्हा जिलब्यापाडू लिखाण हलवाई भंपक आपल्याला आठवणार्‍या शब्दांची आपण भर घालावी ---

निष्पर्ण

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 14/09/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, आईला पण घेऊन जा ना आज; तिची खूप इच्छा आहे..." "असं काय करतोस, गौतम? तुला माहिती आहे ना काय होतं ते?" "मला माहिती आहे हो...पण...अपूर्वापण मला सांगत होती की आज बाबांना आईला सोबत घेऊन जायला सांग म्हणून...आई रडली तिच्याजवळ काल दुपारी." "गौतम, मला वाटत नाही का तिला सोबत घेऊन जावं म्हणून? मागच्या वेळेस मी आणि ती गेलो होतो सुधाकरच्या घरी. मग घरी परत आल्यावर ती कितीतरी वेळ रडत बसली होती कुणी तिच्याशी बोलत नाही म्हणून..." "मग तुम्ही तिला सहभागी करून घेत जा ना तुमच्या गप्पांमध्ये. म्हणजे आपोआप सगळे बोलतील, बरं वाटेल तिला...सुधाकरकाका, विमलकाकू, अजय, स्मिता...सगळ्यांना माहिती आहेच ना.