बाळासाहेबासुध्दा आपली पोळी भाजायला सरसावलेत आता!
बाळासाहेबानी अण्णाना पत्र पाठवलं आहे. त्यातला थोडा मजकूर (मटा मधून) पहा -
-----------------आपणांस आठवत असेलच , ४ ऑक्टोबर १९९६ रोजी आपण मला मातोश्री या निवासस्थानी भेटलात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व थरांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की , शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्तितच !
मिसळपाव
|| वैभव संपन्न गणेश ||
१९७८ साली मी विद्यार्थी दशेत असताना बेलूर आणि हळेबीड येथील मंदिरे पहावयास गेलो होतो.तेथे असलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि मी भारावून गेलो.त्या दागिन्याने खूप सजवलेल्या होत्या पण मला ते दागिने जास्त बोजड वाटले. माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपल्या पारंपारिक मूर्तीला असे दागिने घातले तर आणि जरा नवीन पद्धतीचे दागिने घातले तर ती मूर्ती कशी दिसेल!म्हणुन मी दागिन्यांचा अभ्यास करु लागलो.