Skip to main content

प्रतिभा

रंग...!

लेखक वेणू यांनी गुरुवार, 29/03/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक रंग माझ्या ओंजळीत दिलेस... अगदी हळूवारपणे... हरखून गेले ते रंग पाहताना... माझ्या ओल्या डोळ्यात त्या इंद्रधनूचं प्रतिबिंब तरळलं.... नजर हलेना माझ्याच भरलेल्या ओंजळीवरून... तू : पाहतेस काय? मी : हे...... हे रंग.. कित्ती आहेत!! सुंदर एक- एक... तू : हम्म, तुझेच आहेत मी :सारे? तू : हो मी :काय म्हणू? तू : डोळ्यांनी सांगितलं सारं..

मन...!

लेखक वेणू यांनी बुधवार, 28/03/2012 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी तुझं मन खणायला घेतलंच शेवटी.... एक भली मोठी पिशवी घेऊन प्रवेश करणार होतो. नको ते सल, तण उपटून टाकून बाहेर घेऊन येण्याच्या हेतूने... प्रवेशाचे महाद्वारच महामजबूत!!! आत प्रवेश करायलाच माझी निम्मी शक्ती खर्ची पडली, पण; आज मी ही माघार घेणारच नव्हतो... तुझी मन-वस्ती सुनसान आणि निपचित वाटली मला.... सगळं आवरत, स्वच्छ करत निघालो.. बरीच जळमटं, सर्वत्र धूळ, जिवंतपणाचं एकही लक्षण नाही त्यात.. अवकाशाने कळलं, मी तुझ्या मन-गाभ्याच्या भूतकाळात शिरलोय!!

शब्द...!

लेखक वेणू यांनी शनिवार, 24/03/2012 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
सुटीची मस्त सकाळ म्हटलं की हातात वाफाळत्या चहाचा कप आणि समोर वृत्तपत्र, ठरलेलंच!! "घरकाम होत राहतील आरामात" कसली घाई नाही, गडबड नाही हा आल्हाददायी विचार करत पहिला घोट घेतला अमृततुल्याचा- चहाची चष्म्यावर आलेली वाफ साफ करत, वृत्तपत्रात घातलं डोकं... 'पुंजके' नावाचा स्तंभलेख वाचताना, सुधीर मोघे म्हणतात- येथे रेंगाळले, ओळी सुंदरच होत्या, "शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते, वाहतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते!" वाचन खुंटलं इथेच... खरंच शब्द म्हणजे नक्की काय, नितळ पाणी? भावनांचा रंग मिसळला की तेच भाव व्यक्त करणारे!

कट्टेकर्‍यांची वारी... चिंचवडवर स्वारी ...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 19/03/2012 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
कवनरुपे कहाणी-श्री.अन्नक्षेत्र चिंचवड,मिपा खादाडवारी,संयोजक-मोदक ;-) एक आहे गावं चिंचवड,तेथे मिपाची एक कावडं अजोबा एक नातू सगळे,नाती काही असती... मोदक नामे नवमिपाकरू,वल्ली मागे महामेरु चिंचवडकरांसी आधारु,मिपा कट्टा करण्या... तारीख सतरा वारं-शनिवार,रोजवूड मधला आहार सायं-काली पक्ष्यांचा बहर,बरा होता तेथे बा...

वांझोटा...

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 13/03/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
बोंबला, तिच्यायला माझी बायको बायको म्हणुन जिला जीव लावला, दहा वर्षे जे तिला सोसावं लागलं ते सोसायला मदत केली, बोललो असेन एक दोन वेळा मी सुद्धा चिडुन, पण म्हणुन असं पदरचं दुखः इंटरनेटवर मांडावं, ह्या देशात कायदा आहे म्हणे की, बलात्कार झालेल्या बाईचं नाव डायरेक्ट लिहित नाहीत, मग हे कसं काय चालतं. हा काय बलात्कार नाही का, म्हणजे जे नटरंग मध्ये दाखवलं तसं झालं तरच पुरुषावर बलात्कार होतो का, बायकांची मनं जळतात, करपतात, उध्वस्त होतात आणि पुरुषाच्य मनाला काय नवी पालवी फुटते, पालीला शेपटी फुटते तशी ?

(कॉमन मॅन यांनी पुन्हा धागा काढला)

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 28/02/2012 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरचे तथाकथित वकील सदस्य कॉमन मॅन यांनी आजच पुन्हा एकदा कथ्याकुट सदरात धागा काढून त्यांची मते मांडली आहेत दोन वाक्यात आपले मत व्यक्त करण्यासाठी नमनालाच घडाभर तेलाची उधळपट्टी केली आहे कॉमन मॅनच्या हाताशी असलेला जिलेबीचा सोऱ्या, इतर सदस्यांच्या प्रतिक्रियांचा ओघ आणि आपणच इथले कायद्याचे जाणकार असून, प्रत्येक धाग्यात कलमांचा संदर्भ लावलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह आता बळावलेला दिसतो असेच म्हणावे लागेल कॉमन मॅन यांनी पाडलेल्या जिलेब्यांच्या विषयांवरून जयंत कुलकर्णी यांनी त्यांच्या पोशाखाला चालेंज करायचे ठरवलेले दिसते.