Skip to main content

प्रतिभा

गाणारं वायोलिन!!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 12/12/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या वाद्यातून जर तुम्हाला मराठी भावगीताचे बोल जसेच्या तसे, हो जसेच्या तसेच, म्हणजे अगदी काव्यातल्या जोडाक्षरांसकट आणि गायकाच्या/गायिकेच्या आवाजातली मींड, ताना, आलाप या बारकाव्यांसकट ऐकू आले तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही अचंबित व्हाल, इतकेच नव्हे तर या माणसाच्या प्रेमातच पडाल! माझंही अगदी असंच झालंय. प्रभाकर जोग नावाच्या एका अवलियाचे काही यूट्यूब वीडिओज मध्यंतरी बघितले त्याचवेळी मी वेडा झालो होतो. आज मी ते वीडिओ पुन्हा बघितले आणि मग मला राहवेना म्हंटलं आता मात्र या चमत्काराची ओळख मिपाकरांना करुन द्यायलाच हवी. मराठी संगीत क्षेत्रातले हे अतिशय नाणावलेले व्यक्तिमत्त्व आहे.

भाषण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/12/2011 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली. भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर - येथे जरूर ऐका...

परीणाम ( गफलत भाग २ )

लेखक चाफा यांनी रविवार, 04/12/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
निषाद देवनार यांच्या डायरीतून : आदित्य, माझा खास मित्र, सध्या काहीतरी सैरभैर झाल्यासारखे वागतो. एकदम नक्की सांगायचं झालं तर तो त्या `झांबीडी' नावाच्या गावाला जाउन आल्यानंतरच. त्याच्या लेखाला योग्य तो प्रतीसाद न मिळाल्यामुळे असु शकेल कदाचीत. आणि तसं असेल तर त्यात अशक्य असं काही नाही कारण आपल्या लेखाच्या प्रसिध्दीसाठी कुठे कुठे फ़िरला हा माणुस.... पण त्याला योग्य न्याय मिळाला नाहीच. त्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो तेंव्हाच त्याची अवस्था पाहुन मला वाईट वाटले. खरोखर उत्तम आणि अभ्यासपुर्ण लेखन असते त्याचे अर्थात त्याची मेहनतही तितकीच असते त्या मागे.

गफलत ! ( भाग १ )

लेखक चाफा यांनी बुधवार, 30/11/2011 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुराणाचा अभ्यास हा माझा एकेकाळचा छंद पण आता तोच माझ्या पोटापाण्याचा उद्योग झालाय. सध्या मला एक नाणावलेला पुराणवस्तु संशोधनकर्ता म्हणुन मान्यता मिळायची वेळ आलिये. पण मी नुसताच पुराणवस्तुंमधे गुंतुन पडलेला नाहीये. माझे आवडते मत म्हणजे ‘पुराणातली वांगी पुराणात ठेउ नका’ कारण त्यात बरचसं तथ्य असतं हे आता शास्त्रसुध्दा मान्य करत. निव्वळ दंतकथा म्हणुन आपण कानाडोळा करतो पण मुळात या दंतकथा तयार कशा होतात? आपल्याकडे म्हणतात ना ! ‘आग असल्या शिवाय धुर निघत नाही’ तसा विचार एकदा करुन पहा,............

रेखाचित्रे

लेखक कान्होबा यांनी मंगळवार, 29/11/2011 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी काढलेली काही रेखाचित्रे आहेत..विशेषतः मी ही सर्व चित्रे रांगोळी या स्वरुपात काढतो...परंतु पहिल्यांदा या रेखा चित्रे कलाप्रकारात तरबेज व्हावे लागते,कारण तोच पुढचा पाया आहे...म्हणुन आधी पाया दाखवत आहेत...कळस पुढे लवकर करु...

क्रांतीतै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 28/11/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.