बंक्या आणि भयकथा !
कै.श्री. नारायण धारप यांची क्षमा मागुन......
*********
"भयकथा लिहीणं म्हणजे एक विकॄतीच असते हं" दबक्या सुरात बंक्या म्हणाला. बंक्या म्हणजे आपला खास दोस्त. कॉलेजात असताना लेक्चर्स बंक करायचा म्हणुन आम्ही त्याला बंक्या म्हणत असु. आता ते नाव त्याला कायमचंच चिकटलय. दबक्या सुरात अश्यासाठी की जनरली यानंतर मी त्याला त्याचे थोबाड सांभाळण्याची सुचना देण्याची शक्यता होती पण आज आपला मुड चांगला होता म्हणुन आपलं विचारुन टाकलं
" का बरं ? असं काय विकृत असतं भयकथांमधे?"
" नाही कसं ? भयकथा नाSSSSSSSS त्या म्हणजेSSSSS एकदम हॉरर असतात" नाकावरचा अवजड चष्मा बोटाने सावरत बंक्या म्हणाला.
मिसळपाव
मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील '