एक महाप्रवास !
घाटातून गाडी तशी हळूवारच पण ठामपणे गावाकडे प्रवास करत होती. चांगली हसतीखेळती सकाळ एका फोनने उदासवाण्या दिवसात बदलून टाकलेली. गाडीतली शांतता मधेमधे ऐकू येणार्या वहिनीच्या हुंदक्यांनी थोडीफ़ार भंगत होती तितकीच. पावसाळा नुकताच रंग उधळायला लागल्याने बाहेरचे निसर्गसौंदर्य नक्कीच नजर वेधून घेणारे होते, पण गाडीतल्या सगळ्यांचीच मनःस्थिती आत्तातरी निसर्गाचा आस्वाद घेण्यासारखी नव्हती. सगळ्याच रविवारांप्रमाणे आजचाही दिवस आमच्या घरात हसतखेळत उगवला होता, थोडासा आळसावत, थोडा सैलावत.
मिसळपाव
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या.
हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष.
डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य.