Skip to main content

प्रतिभा

कँडिडेट्स मॅचेस - २०११

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/05/2011 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीच्या सोविएत संघराज्याचा एक भाग असलेल्या परंतु आता स्वतंत्र अशा तातारस्तानची राजधानी कझान इथे दि.५ मे २०११ पासून, म्हणजे उद्यापासून, बुद्धीबळ जगताचे लक्ष लागून राहिलेल्या कँडिडेट्स मॅचेस सुरु होत आहेत. २०१२ सालच्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेसाठी सध्याचा जगज्जेता विश्वनाथन आनंदचा प्रतिस्पर्धी ठरवण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ह्या मॅचेसमधून साध्य होणार आहे. आठ खेळाडूंमधून एकाची निवड होईल. कोण असेल हा खेळाडू?

पिउनी अमृत घेउनी संचित...!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/04/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्याकरता मिपाचे डॉ रमताराम यांचे मनापासून आभार.. पाखरा जा.. (येथे ऐका) पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु लं. चित्रपटकार, नाटककार, व्याख्याता, साहित्यिक, एकपात्री, दाता, इ इ इ असलेला एक अफाट खेळिया. परंतु या छोटेखानी लेखाचा संबंध संगीतकार आणि गायक पुलंशी आहे.. 'गमपसां धसां' असा आलाप असलेली गाण्याची सुरवात. 'जा' या अक्षरावरचा सुंदर निषाद. गमम, गमधप रेसा या स्वरावलींनी पूर्ण होणारे 'प्रेमळ, शीतल छाया..' हे शब्द. सारंच अतिसुंदर! नंद रागाचा भक्कम बेस असलेलं हे गाणं.

हे जग मी सुंदर करून जाईन....

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 21/04/2011 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... नाशिकला विध्यार्थी स्नेह-संमेलनात भाईकाकांनी केलेल्या भाषणाचा काही भाग नुकताच मी इथे वाचला. त्यांनी केलेल्या अनेक उत्तमोत्तम भाषणांपैकी एक!!! कधीकाळी नाशिकला पुलंनी केलेलं हे भाषण अजूनही खूप नाविन्यपूर्ण वाटते, त्यापेक्षा मी असं म्हणेन की, पुलंची कुठलीही भाषण असू द्यात ती कधीच जुनी होऊ शकत नाहीत.

सुंदर माझा गाव !!!

लेखक परदेश् वासी तरिहि घाटी यांनी गुरुवार, 21/04/2011 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपा कर, मी एक नवीन मिपा कर आहे. सध्या व्हर्जिनिया टेक या अमेरिकन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हे विद्यापीठ वॉशिंगटन डीसी पासून ३०० मैलावर ब्लॅकस्‍बर्ग या छोट्याश्या गावात आहे. विद्यापीठाचा परिसर खूपच सुंदर आहे. नुकतेच मी काही फोटो घेतलेत. ते इथे सादर करत आहे. आशा करतो कि मिपा कर चांगला प्रतिसाद देतील. फोटोंवर प्रतिक्रिया दिल्यास अति उत्तम.

3D

लेखक स्पा यांनी शनिवार, 16/04/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मागे दोन लेखात मी म्याट पेंटिंग नावाचा प्रकार फोटोशॉप मध्ये करून दाखवला होता पण खरतर मला माझं 3D च काम इथे दाखवायचं होत, पण कामामुळे वेळ मिळत नव्हता. परवा शेवटी थोडा वेळ मिळाला म्हणून एक सेट डीझाईन केलाय. छोटासाच आहे. आम्ही जे काम करतो याची छोटीशी झलक . बेसिकली आम्ही interior किंवा exterior बांधून होण्याच्या आधीच ते 3d मध्ये बांधतो :) खरोखर बांधकाम पूर्ण झाल्यावर ते कसं दिसेल याची ती झलकच असते म्हणा ना, यामुळे क्लाएंटला समजतं कि तो एवढा पैसा ज्या प्रोजेक्ट मध्ये गुंतवणार आहे , ते शेवटी दिसेल कस? यामुळे बर्याच गोष्टी साध्य होतात किंवा सोप्या होतात १.