Skip to main content

प्रतिभा

मळ्यातील दर्शन

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 14/03/2011 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
.............................. आज खूप महिन्यांनंतर माझी पाऊले आमच्या वाडीतल्या भैरोबाच्या विहीरीकडे वळली. पण मळ्यातील पाऊलवाटेवरून चालतांना मात्र मागे फ़िरून धूम ठोकाविशी वाटली. तरीही कुठल्याशा विचित्र ओढीने पाऊले मंत्रमुग्ध झाल्यासारखी विहीरीच्या दिशेने चालतच राहिली. हिला भैरोबाची विहीर नाव का पडले कोणास ठावूक. दाट झाडीमधे लपलेली आणि आजकाल वापरात नसलेली विहीर. आमच्या मळ्यात सगळीकडे कालव्याचे पाणी खेळवले होते. पुर्वी कालवा नव्हता तेव्हा पाण्यासाठीच बांधली असणार. कालवा आल्यानंतर देखील विहीरीच्या आजुबाजुच्या भाज्यांसाठी रहाटाने पाणी काढून देण्यासाठी विहीर पण वापरली जायची. आबांचा तो छंदच होता.

आयूष्य एक रंगभूमी....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
आयूष्याच्या ह्या रंगभूमीवरचे, आपण जणू एक कलाकारच असतो । आपापल्या परीने प्रत्येक जण, आपापली भूमिका ति बजावत असतो । प्रत्येक दीवस तो नवा प्रयोग ह्या, रंगमंच्यावर मांडत असतो । असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे, आपण येथे साकारत असतो । कुणास जमतो-कुणास न जमतो, अभिनय येथे परी करावाच लागतो । दुःखात हसून डोळे हळूच पुसून, नाट्यमय देखावा उभाऱ्हावाच लागतो । कितीही लांबला जरी खेळहा तरी तो, शेवट त्याचा अपूल्या हातीच नसतो । खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे, ह्या परी कोणता मग मार्गच नसतो । ह्या खेळाचा सुत्रधार तो, एकमेव हा देवच असत

असे कुणीतरी यावे.....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
असे कुणीतरी यावे, जिच्यात आपण हरवूनी जावे । शोधिता अपुल्यास अपुल्यात अपुल्याला, तिचेच दर्शन व्हावे । हे असे कुणीतरी यावे..... ओठांतले ते शब्द तिने मग, अलगद झेलुनी घ्यावे । अबोल अश्या ह्या डोळ्यांतले ते, भाव समजोनी जावे । हे असे कुणीतरी यावे..... मौन धरिले तिनेच जरका, मी अस्वस्थ असावे । अश्या क्षणिमग बोलुनी काही, मौन तिने सोडावे । हे असे कुणीतरी यावे..... बोल लाविले तिला कुणी तर, घाव मलाच मिळावे । घाव लागता अंगी माझ्या, आईग...

शब्दांचे खेळ...

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपं असत नाई शब्दांचे असे हे खेळ करणं, भावनांच्या गुंत्यात गुंतवून ह्या शब्दांना वाक्यांमध्ये पाडणं । पडताना मात्र वाक्यांमध्ये हे शब्द काहिना-काही अर्थ घेऊन पडतात, थोडीशी जागा चुकली तर मात्र हेच... अर्थाचा अनर्थ करून टाकतात । पण चुकल्या वाक्यांतील ते शब्द देखील काहिना-काही सांगत असतात, चुकीचीच का असेनात..

कविता.....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
कविता कराव्या लागत नाहीत, त्या नकळतच होत असतात । मनातल्या भावनांना जसे, शब्दांचे आधार मिळत असतात । जुळवायचीच म्हणून, वाक्यांतील यमके जुळवायची नसतात । वरच्या ओळींची खालच्या ओळींशी, ओढून ताणून नाती जोडायची नसतात । सरळ सोप्या शब्दात भावना मनातल्या, कवीतेतून ह्या मांडायच्या असतात । शब्द असतात भावनांसाठी कवीतेत, भावना शब्दां साठी नसतात । हर्षद प्रभुदेसाई.....(डोंबिवली)

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-८)

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 13/03/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) (भाग-२) (भाग-३) (भाग-४) (भाग- ५) (भाग- ६) (भाग-७) या भागात २-५ चित्रपटांची कारकिर्द असलेल्या संगीतकारांना मागे ठेवुन यामधे सर्वात जास्त कारकिर्द असलेल्या संगीतकाराच्या कारकिर्दीचा आढा

अबोला

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 11/03/2011 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिटींग संपता संपत नव्हती. ऑफिसमधून घरी पोहोचायला सुधाला कमीत कमी एक तास उशीर होणार होता. जास्त उशीर झाला तर सुहास पुन्हा अबोला धरणार. सुधाने पुन्हा एकदा हातातल्या घडाळ्यावर नजर टाकली. "ह्या मिटींग्ज वेळेत घ्यायला काय होतं ह्या अय्यरला ! ऑफिस सुटायच्या वेळेला बरोब्बर मिटींग घ्यायला सुचतं याला. शिवाय मिटींगचा उपयोग काही नाही." "सुधा, सुधा! " सुधाने चमकून अय्यरकडे पाहिलं. "मी तुम्हाला डिस्टर्ब नाहि ना केलं?" अय्यर तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसून म्हणाला. "अं! नाही सर. माझं लक्ष आहे सर." सुधा मनातला सगळा राग चेहर्‍यावर दिसू न देता चेहर्‍यावर खोटं स्मित आणून म्हणाली.

सायन्स-सुपरनॅचरल फिक्शन कादंबरी : "जलजीवा"( भाग १३ ते १६-शेवट)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/03/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग १३) ऑर्थर हॉफमन यांनी पुढे लिहिले होते- .....परतीच्या प्रवासात कॅप्टन कडून मला माहिती मिळाली की पहील्या महायुद्धात काही युद्धकैद्यांच्या खुप छळ केला गेला होता. त्यांना डेव्हील्स स्क्वेअर वरच्या बेटांवर ठेवण्यात आले होते. त्या बेटावर त्यांचा खुप छळ केला गेला होता. विरुद्ध राष्टाकडच्या अधिकार्‍यांकडून, जवानाकडून! त्यामध्ये अनेक महिला होत्या. त्यापैकी जेनिफर नावाची एक अमेरीकन गुप्तहेर होती. ती पूर्वी एक अट्टल गुन्हेगार होती. पण अमेरीकेने तीला काही वर्षे तुरुंगात ती सुधारल्यानंतर रशियाच्या हेरगीरी साठी पाठवले होते. पण, ती युद्धा दरम्यान पकड्ली गेली.