Skip to main content

विचार

फुल्ल प्रुफ पिलानः एक हसीन सपना

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 11/01/2017 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
म्येंरें प्यारँ द्येषवाषियों, जनता की खास मांगपर, सतत की डीमांडपर, एटीएमकी रांगपर फुल्लपुरुफ प्ल्यान लाया हूं. बोलो जाहीर करुं के नं करुं.... बोलो करुं के नं करुं.... करुं के नं करुं.... लो कर दिया..... -------------------------------------- नोटाबंदीच करायची असती तर कशी करता आली असती तर ही एक आयडीया. मनोरंजन आहे, फिक्शन म्हणून वाचा. पण आता पर्यंतचे नोटाबंदीबद्दलचे सर्व वाचलेले विसरून वाचावे लागेल. लर्न टू अनलर्न! (पण हे अनलर्न लर्नलेले कसे अनलर्नलायचे??)

मुख्य व एकमेव उद्देशः नोटाबंदीने फक्त काळा पैसा 'नष्ट' करायचा आहे.

थेट नष्ट करायचा.

छत्रपती शिवराय आणि आपण

लेखक कर्रोफर नमुरा यांनी बुधवार, 11/01/2017 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
चला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पुन्हा आठवले! छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावामध्ये महाराज जोडून ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात येणार आहे. छत्रपतींचा यथोचित मान राखणे चांगले आहे. पण मुळात, ज्या क्षेत्राचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काही संबंधच नाही, त्याला त्या राजर्षीचे नाव देण्यात रम्यत्व काय?

महाराष्ट्राचे दुर्गसंवर्धन आणि आपण

लेखक कर्रोफर नमुरा यांनी बुधवार, 11/01/2017 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सारखा ज्वलंत इतिहास आणि ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. क्षेत्रफळाचा विचार करता एकट्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण एवढे किल्ले जरी मोजले तरी त्याच्या अर्धे किल्लेही दुसऱ्या राज्यात नसतील. पण, कर्नाटक, गोवा, राजस्थान, तामीळनाडू व इतर राज्यात जशी जोपासना किल्ल्यांची आणि इतर ऐतिहासिक वारशांची झाली तशी ती महाराष्ट्रात होत नाही. हा आपला कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल. समाज आणि प्रशासन दोन्ही आघाड्यांवर आपण अपयशी ठरलोय. राज्य सरकारने तर मुंबई उच्च न्यायालयात एका जनहीत याचिकेच्या सुनावणी वेळी, ऊन-पाऊस-वाऱ्यामुळे किल्ल्यांची वाताहात झाली असे प्रतिज्ञापत्र दाखल केले.

काही ओळखीच्या स्त्रिया

लेखक मिडास यांनी सोमवार, 09/01/2017 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
"वाट पंढरीची बाई कशी झाली ओली ? नाहत होती रुख्मीणी केस वाळवीत गेली ." दोनच ओळी पण एक नविन जग डोळ्यासमोर उलगडणारी . आपल्या लोकगीतांची पण कामालाच आहे. किती सामर्थ्य आहे यांच्यात? एक मोहक क्षण आपल्याला स्पर्शुन जातो. त्या पंढरपूरच्या विठ्ठला मागे हि रुख्मिणी धावत गेली खरी, पण त्या विठोबाला तिची खबर होती कि नाही कोण जाणे. आपला इतिहास पण अश्याच रुख्मिणींच्या जिवावर जगू पाह्तोय. आत्ताच नाही पण शेकडो हजारो वर्षा पासून. मागे एकदा मी माझ्या मैत्रिणीला विचारला होतं "का करतात माणसं लग्न?" " Because we need a witness in our life.

नाती

लेखक रोहित जाधव यांनी शुक्रवार, 06/01/2017 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
नाती म्हंटल की आठवतात ती रक्ताची नाती. पण काही नाती ही रक्ताचा नात्यानं पेक्षा थोडी वेगळी असतात. काही प्रसंगी तर ती रक्ताचा नात्यानं पेक्षा जास्त घट्ट वाटतात. आपण आपल्या मित्राला खूप वर्षा नंतर भेटतो. बराच वेळ गप्पा केल्या नंतर आपण जायला निघतो त्याला आपले प्रॉब्लेम न सांगताच आणि मित्र बोलतो अरे जे बोलायला आला होतास ते तर बोललाचस नाहीस. इथे आपल्याला जाणीव होते की आपण न बोलताच आपल्या भावना त्याचा पर्यंत पोहोचलेल्या असतात. घरी टिव्ही वर कधी तरी एखादी क्रिकेट मैच एकदम रंगात आलेली असते.

बन्दे की मेहनत को किस्मतका सादर परनाम है प्यारे.. दंगल दंगल!

लेखक पिलीयन रायडर यांनी गुरुवार, 05/01/2017 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
Dangal दंगल पाहिला. आवडलाच.. अगदी शतकोत्तर कलाकृती नसली तरी पिक्चर उत्तमच आहे. आणि मला आमीर खान देशद्रोही वाटत नाही, म्हणुन मला त्याचं कौतुक करायलाही काही त्रास नाही. दंगल मध्ये आमिर, फातिमा, सान्या, सांक्षी तंवर आणि अपारशक्ति खुराणा म्हणजेच ओंकार.. सगळ्यांचेच काम उत्तम आहे. त्यांनी त्यांच्या लुक्सवर घेतलेली मेहनत, त्यासाठी केलेला व्यायाम.. हे तर महत्वाचं आहेच. पण खास करुन आमीरने वजन वाढवुन, ते पुन्हा कमी केलंय.

दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१७ :: ३ ते ६ फेब्रूवारी २०१७ रोजी वापरा #ट्विटरसंमेलन

लेखक स्वप्निल_शिंगोटे यांनी गुरुवार, 05/01/2017 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
" प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा !! " ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे.ह्या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात.एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे.मग अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे ? असा तुम्हाला प्रश्न पडेल.सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी उगमावस्थेत असले तरी त्याचे भविष्य उज्जवल आहे.

मिपाच्या नव्या थीमची ओळख

लेखक नीलकांत यांनी रविवार, 01/01/2017 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज नव्या वर्षाच्या सुरूवातीला मिपाला नवीन थीम लावली आहे. या थीम मध्ये रंगसंगतीसह अनेक बदल केलेले आहेत. त्या नव्या बदलांची सवय होई पर्यंत नेमके काय बदल आहेत आणि नवी ठेवण कशी आहे हे आपण येथे बघुया. सध्याची मिपाची थीम ही मोबाईल व अन्य लहान स्क्रिनसाईज असलेल्या डीव्हाईससाठी सहज अनुरूप होईल अशी थीम आहे. त्यामुळे संगणक, लॅपटॉप सोबतच यापुढे मोबाईल, टॅब आदीवर मिपावाचन आणि प्रतिक्रिया देणे सहज सोपे होईल अशी अपेक्षा आहे. १) तुर्तास मिपाचा लोगो नाहीये. - ही तात्पुरती सोय आहे. मिपाचा लोगो लवकरच वरच्या भागात असेल. २) मेन्यु - सध्या वरच्या मेन्युमध्ये साहित्य प्रकार नावाचा मेन्यु आहे.

एक लडका और एक लडकी कभी दोस्त नाही हो सकते!

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 31/12/2016 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री-पुरुष मैत्री हा विषय अनेकदा अनेक स्तरांवार चर्चेत आला आहे. वाद-विवाद, चर्चा, मत-मतांतर अनेकदा वाचनात आली आहेत. त्यातलाच एक लेख नुकताच वाचनात आला. विषय काहीसा स्त्री-पुरुष मैत्री आणि पुरुषांना समाजाने मान्य केलेली मोकळीक आणि स्त्रियांना दिली जाणारी म्हणा किंवा स्त्रियांनी घेतलेली 'मोकळीक' याविषयी स्त्रियांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन. असा काहीसा होता. त्यात अस म्हंटल होत की स्त्रियांनी पुस्तकांवर लिहावं, समाजातल्या, धर्मातल्या, राजकारणातल्या समस्यांना हात घालावा पण यात जिथे जिथे सेक्स आहे तिथे बाईने हात घालू नये.

स्ट्रारबॉय

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 31/12/2016 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ज्या गाण्याने मला वेड लावलं आहे ते म्हणजे स्ट्रारबॉय चे द वि़केंड... या चार्ट बस्टर गाण्याचे संगीत मनात पार घर करुन बसले आहे, तर जगात या गाण्याने अक्षरः धुमा़कुळ घातला आहे ! तु-नळीवर अनेक गाणी ऐकताना,शोधताना एका गाण्याच्या खाली असलेल्या एक प्रतिक्रियेत या गाण्याचा उल्लेख मला दिसला आणि हे गाणे मी शोधले आणि ऐकले. कॅनडा / फ्रान्स / न्यूझिलंड / नॉर्वे / डेन्मार्क / स्विडन / मॅक्सिको / अमेरिका / ऑस्ट्रेलिया इथे या गाण्याने अर्थातच चार्ट बस्ट केले. या गाण्याचे अनेक व्होकल आणि अकुस्टिक कव्हर्स आत्ता पर्यंत केले गेले आहेत / केले जात आहेत...