कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे संपत्तीकडे
सध्या निवडणुकांमुळे वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळत आहेत. त्यात देखील जे आधी पासूनच मान्यवर (?) आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या कार्यकाळात झालेली वाढ हि विशेषत्वाने नोंद घेण्यासारखी आहे. केवळ पाच वर्षातील हि प्रचंड वाढ बघता हि सगळी मंडळी कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन वेगाने संपत्तीकडे झेपावत आहेत असे दिसून येते.
जेव्हा तुमच्या आमच्या सारखी सामान्य जन मंडळी (संक्षींच्या भाषेत ईएमआयग्रस्त) जेमतेम उत्पन्न मिळवत असताना या मान्यवर मंडळींची संपत्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें टॅक्स मंडळा अशी कित्येक पटीनी कशी काय वाढत आहे?
मिसळपाव