Skip to main content

विचार

सत्यमेव न जयते, कल्याणमस्तु!

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 14/04/2017 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे - सत्यमेव जयते. या ब्रीदवाक्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा अवमान मला सोसवत नाही हे प्रथम नोंदवतो. आजपावेतो लोकांनी माझ्या विधानाचा असा अर्थ घ्यावा, तसा घेऊ नये असं डिस्क्लेमर मी कधी टाकलं नाही, पण इथे विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लेखातील चिकित्सेचा अर्थ राष्ट्रद्रोह इ इ नाही असे पुन्हा नमूद करतो. ============================================================== सत्यमेव जयते चं शब्दशः भाषांतर "सत्यच जिंकते" असे आहे. सत्यम् = सत्य, एव = च जयते = जिंकते. च वर जोर.

श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ भाग १

लेखक aanandinee यांनी शुक्रवार, 14/04/2017 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ हरिः ॐ अध्याय १, भाग १. भावार्थ- नेहमी केल्या जाणार्या या गणेशवंदनेतसुद्धा हेमाडपंतांचे सद्भक्त असणे उठून दिसून येते. त्यांनी केवळ गणपतीला वंदन केले नाही तर गणपतीमध्येच त्यांनी त्यांच्या सद्गुरू साईनाथांना पाहिले. हिंदू धर्मात आपल्या अनेक वेगवेगळ्या देवता, त्यांचे वेगवेगळे सण , साजरे सर्व काही केले जाते पण मग त्यामध्ये कधीकधी "आपली निष्ठा नक्की कुठे आहे? मग बाकीच्या गोष्टी मानायला हव्यातच का ? बाकीच्या देवांना नमस्कार करायलाच हवा का? न केला तर काही होईल का?

दिवस....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 13/04/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या दिवसांचं काही कळतच नाही बुवा...कधी शेवरीच्या कापसासारखे आपसूक उडतात,कधी लोखंडी रोलरसारखे ढकलावे लागतात.... कँलेंडरमधे दिसणारे दिवस दिसतात त्यापेक्षा अधिक जवळ असतात... प्रत्येक उगवणारा दिवस मावळतोच...उद्याचा दिवस दिसेलच याचीही काही खात्री नसते..... काही लोक दिवस मोजत असतात ...

अंजलीची गोष्ट - संवेदना .... सहवेदना

लेखक aanandinee यांनी सोमवार, 10/04/2017 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
"डॉक्टर, आत येऊ?" दरवाज्यातून आवाज आला. "हं, ये" अंजलीने पाहिलं काल रात्री डिलिव्हरी झालेली १२ नंबरची पेशंट आली होती. "अगं चालून का आलीस तू? काही होतंय का?" अंजलीने काळजीने विचारलं. "बस आधी". राधा समोरच्या खुर्चीवर बसली. राधा परवा डिलिव्हरी साठी बायकांच्या वॉर्डमध्ये ऍडमिट झाली होती. घरची परिस्थिती बरी होती म्हणून स्पेशल रूम घेतली होती. काल रात्री नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ बाळंतीण दोघेही व्यवस्थित होते. पहिलंच बाळ, त्त्यामुळे घरच्यांमधे आनंदी आनंद होता. "बाळ कुठे आहे?" अंजलीने विचारलं.

तुझ्यात जीव रंगला

लेखक परशु सोंडगे यांनी शुक्रवार, 07/04/2017 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा *************** कुणात जीव रंगला ? ***** परवा आमच्या शहरातल्या मोठया कपडयाचा दुकानात जाण्याचा योग आला.असा योग नेहमीचं येतो. सौ.चा हट्टच होता.मेहूणी आली होती. आम्ही त्या अलीशान, भव्य दुकानात शिरलो.ते पण कसबसं... यात नेहमीचं प्रचंड गर्दी असते. दुकानातल्या गर्दीला एक प्रकारची शिस्त असते.या दुकानात तसं काही नाही नसतं.तो एक बाजारचं असतो. नुसता गर्दा... कसं उभा राहयचं . लेडीज विभात गेलोत. त्यात पुन्हा वयानुसार, फॅशननुसार विभाग ... दवाखान्यात जसे सुपरस्पॅशालिटी डाॅक्टर असतात अगदी तसंच इथं ही होतं . सारं सारं स्पशेलचं. दुकानात पोहचल्या नंतर माझं काम संपलं होतं.

पन्हं

लेखक रामदास यांनी मंगळवार, 04/04/2017 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
कैरीचं पन्हं : पन्हं कधीही , म्हणजे अगदी उन्हाळ्यात सुध्दा उठसूठ प्यायचे नसते . आता बाजारात बारा महीने कैर्‍या मिळतात म्हणून करण्याचा हा प्रकार नव्हे. आणि हा सिंथेटीक सरबतासारखा उठवळ आयटमही नव्हे. पण पन्ह्याची कृतीसुध्दा पाल्हाळीक नसावी. चला बनवू या उत्तम पन्हे. पन्हं म्हणजे कच्च्या कैरीचे की कैर्‍या उकडून ? असा आगाऊ प्रश्न विचाराणार्‍या माणसाला पन्ह्याच्या कार्यक्रमातून आधीच कटाप करावे. पन्हे म्हणजे उकडलेल्या कैर्‍यांचेच !! पन्ह्यासाठी आधी कैरीचे वय बघावे. अगदीच बालिकाबधू कैर्‍या टाळाव्यात. पोटात घट्ट कोय धरलेल्या साधारण पोक्त कैर्‍या निवडून घ्याव्यात.

द अंडरटेकर रिटायर्स

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 04/04/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी एकीकडे किशोरी ताईंच्या निधनाची बातमी वाचली आणि दुसरीकडे अंडरटेकर पुन्हा कधीच रिंगमधे येणार नसल्याची. किशोरी ताई निवर्तल्या, अंडरटेकर निवृत्त झाला. एकीकडे सूर, तर दुसरीकडे WWE मधला असुर. इकडे सम, तर तिकडे दम. दोनही गोष्टी 'आता पुन्हा नाहीत' हे मात्र साम्य होतं. कदाचित बरेच जण रेस्लिंग किंवा WWE बघणारे नसतील, पण अंडरटेकर हे नाव तरीही त्यांनी ऐकलेलं असेल. कारण त्याचा करिश्माच तसा होता.

आंबा बघावा देठात....

लेखक रामदास यांनी मंगळवार, 04/04/2017 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
चिरंजीव, बायकोच्या हातात पाळण्याची दोरी दिल्यावर तुमच्या हातात बाजारहाटाची पिशवी येणे हा निसर्गक्रमच आहे. असो. आता एकेक प्रश्न आपण अग्रक्रमाने घेण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी सांगणे अत्यावश्यक आहे. बर्‍याच वर्षानी तुम्ही आम्हाला काहीतरी विचारताय याचा आनंद आहेच पण त्याहूनी आनंद तुम्ही आमच्या पिशवी पंथात सामील झाल्याचा आहे. पुन्हा एकदा असो. चांगला हापूस कुठे मिळतो ? : शाकाहारी बहुल वस्ती असलेल्या बाजारात म्हणजे मुंबैत घाटकोपर-मुलुंड -सायन -विलेपार्ले हापूस चांगला मिळतो. एपीएमसी बाजारात जाण्याचा अतिउत्साह करण्याची ही वेळ नाही .

लॉजिक म्हणजे काय?

लेखक arunjoshi123 यांनी सोमवार, 03/04/2017 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
लॉजिकला आपण मराठीत तर्क म्हणतो. एखादे विधान वा वागणे वा कृत्य हे लॉजिकल म्हणजे तार्किक किंवा इल्लॉजिकल म्हणजे अतार्किक असते. तार्किक वागणे, विधान मनात, समाजात, कोठेही, अगदी वैज्ञानिक वर्तुळांत स्वीकार्य असते (अपवाद - मात्राशास्त्र). अतार्किक वागण्याची विधानांची खिल्ली उडवली जाते, त्यांना स्वीकारले जात नाही. इथेही भावनात्मक वा ज्याला आपण सेंटीमेंटल म्हणतो अशा वर्तनांचा अपवाद असतो. पण शेवटी लॉजिक म्हणजे काय? सर्वच तत्त्वज्ञानांची, म्हणजे अगदी विज्ञान धरून सर्वच तत्त्वज्ञानांची एक गोची आहे कि त्यांना कोणतेही सत्य केवल संदर्भात (अबसॉल्यूट काँटेक्स्टमधे) सिद्ध करता येत नाही.

जुनी व्यवस्था आणि नवी व्यवस्था

लेखक arunjoshi123 यांनी रविवार, 02/04/2017 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
द न्यू ऑर्डरः १. स्वातंत्र्य, समता, बंधुता २. पूर्वीच्या राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य, इथून पुढे जे काही वाढीव आहे त्यात समता, बंधुता पूर्वीचा राज्यकर्ता कोण? धर्म! मागची असमानता? ती पुढे चालूच. मग , ३. धर्मापासून स्वातंत्र्य, फक्त संधींत समता, बंधुता जे धार्मिक आहेत त्यांचं काय? त्यांना त्यांचा मूर्खपणा सोडायचा नाही आणि जबरदस्ती सोडून घेता येता नाही. समतेचे निकष काय? तर जे नैसर्गिक आहे त्या पुढे काही करायची धमक नाही, मग ४.