Skip to main content

विचार

आक्रमक चीनचा धोका

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 11/07/2017 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानला शिव्या देण्याची भारतीय नेते आणि जनता यांना तशी सवय झाली आहे. किंबहूना पाकिस्तानला शिव्या दिल्याशिवाय आमची देशभक्ती सिद्धच होत नाही. शत्रू जेवढा छोटा तेवढ्या शिव्या जोरात. हा भारतीयांचा ढोंगीपणा नेहमी पहायला मिळतो. चीनबद्दल मात्र आमची ब्र काढायची हिम्मत नसते, तिथे आम्ही भारतीय पेग गिळून गप्प बसतो. असो. पाकिस्तानबद्दल सध्या पुरे.

आर्य हे दक्षिण भारतीय होते

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 09/07/2017 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
(आपल्या स्वार्थासाठी नव्याने इतिहास लिहिणाऱ्या आजच्या महान इतिहासकारांपासून प्रेरणा घेऊन लिहिलेला तर्क पूर्ण लेख) आर्य शब्दाचा संस्कृत अर्थ आहे उत्तम आणि सुसंस्कृत व्यक्ती अर्थात आचार आणि विचाराने चांगला व्यक्ती. आर्य नावाची कुठली जाती होती आणि ती परदेशातून भारतात आली या भाकड कथेवर मी कधीच विश्वास ठेवला नाही. तरीही जे माझे मित्र आर्य आणि संस्कृत बोलणारे ब्राम्हण विदेशातून भारतात आले होते, त्यांच्या साठी हा लेख. आर्य हे दक्षिण भारतीय होते आणि त्यांची भाषा संस्कृत होती हे मी लेखात तार्किक रित्या सिद्ध करणार आहे. पुरातन इतिहासाचे लिखित प्रमाण कमीच आहे.

अजून एक कप, 'हमेशा तुमको चहा'

लेखक सरनौबत यांनी शनिवार, 08/07/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्मार्टफोन वर लांबलचक पोस्ट्स लोकं वाचत नाहीत. म्हणून 'हमेशा तुमको चहा' मध्ये मोजक्याच गोष्टी लिहिल्या. जिव्हाळ्याचा विषय असल्याने लेखाबद्दल बरेच अभिप्राय आले. ‘आधण शिल्लक आहे आणि गॅस गरम आहे’ तोवर अजून एक कप टाकू म्हणून हा 'दुसरा कप'

किस्से गोवा ट्रिपचे- भाग २

लेखक पी. के. यांनी शुक्रवार, 07/07/2017 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा दिवस गोव्यात फिरण्यात गेला. पैसायच्या दुष्काळाची धग वाढत चालली होती. लॉजच्या टेरेसवर झोपण्याची चैन आता आम्हाला परवडण्यासारखी नव्हती म्हणून एका बीच शेजारी आम्ही आमचा संसार मांडला. शिल्लक राहिलेली अंडी, आमटी आणि भात तयार करून जेवायला बसलो. गडबडीत बीच वरची थोडी रेतीपण आमटीत गेली. हा आमचा गबाळेपणा पाहून काही फॉरेनर्स आमच्याकडे पाहून कंमेंट्स करत होते. "This culprits are spoiling the beach " पण culprit आणि spoiling ह्या शब्दांचा अर्थ माहित नसल्यामुळे आम्ही आमच्या अज्ञानात आनंदी होतो. झोपायची सोय नसल्यामुळं रात्री प्रवास करून मालवणला जायचा प्लॅन फायनल केला.

पीएमटी आणि तुकाराम मुंढे साहेब

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 03/07/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
बी जे मेडिकल कॉलेजला प्रोफेसर होता तेव्हापासून आम्ही श्रीकरला पाहतो आहोत. त्याच्या त्या लाल एम ५० वरून तो येजा करीत असे. पुढे तो आयएएस झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तो आयुक्त होता तेव्हा नियमावर बोट ठेऊन काम करणारा अधिकारी म्हणून त्याची महाराष्ट्रभर ख्याती होती. नियमाबाहेर जाऊन कोणी काम करत असेल तर त्यावर श्रीकरची कारवाई ठरलेली. यामुळे त्यांना निनावी पत्रे आणि धमक्या यायला सुरुवात झाली.

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

why is there something rather than nothing???????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 28/06/2017 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
देव,धर्म,मृत्युनंतरचे जीवन,अमानवी शक्ती व अनेक गोष्टी मानवाला आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही लहानपणी या गोष्टींवर विश्वास ठेवायचो,त्यांच्यात असलेल्या गूढत्वाच्या वलयात स्वतःला हरवून जाण्यात एक वेगळीच झिंग असते.बहुतांश लोक या नशेतून बाहेर येत नाहीत.

आमची भारतीय प्रमाणवेळ !

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/06/2017 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
‘’अनेक बाबतीत विविधता व मतभिन्नता असलेल्या तुमच्या देशातील नागरिकांमध्ये एखाद्या बाबतीत तरी समानता आहे का हो?’’ असा प्रश्न जर आपल्याला एखाद्या परदेशी व्यक्तीने विचारला, तर त्याचे उत्तर ‘’होय, आम्ही भारतीय, ठरलेली वेळ न पाळण्याच्या बाबतीत समानधर्मी आहोत’’ असे देता येईल! काय, दचकलात ना हे उत्तर ऐकून? पण वास्तव नाकारून कसे चालेल? आपल्याकडे कुठलाही प्रसंग असो, ठरलेली वेळ ही अभावानेच पाळली जाते. थोडाफार उशीर करणे हा आपला स्थायीभाव आहे.

स‌त्तेत‌ली मिश्किली आणि विवेक

लेखक मन यांनी सोमवार, 26/06/2017 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल‌ माधुरी पुरंदरे यांचं अभिवाचन होतं सोलारिस‌ क्ल‌बात‌. त्यांनी "एक असाधारण वाचक" साद‌र‌ केलं. हा "अॅल‌न‌ बेनेट‌" लिखित‌ ‘The Uncommon Reader’ ह्या कादंबरीचा अनुवाद होता. तिथं उप‌स्थित राह‌णं हा नित‌ळ सुंद‌र‌, निव्व‌ळ अप्र‌तिम‌ अनुभ‌व होता. पुरंद‌रे ताई थोर आहेत‌. ग्रेट्ट आहेत‌. मी त्यांचा प‌ंखा/फॅन आहेच. विविध‌ भाषांव‌र‌ची त्यांची हुकुम‌त‌ , व त्या- त्या भाषेत‌लं स‌हित्य‌ स‌म‌जून घेणं हे स‌ग‌ळं त‌र‌ त्यांच्याठायी आहेच‌ प‌ण एका भाषेत‌ला म‌ज्कूर‌ दुस‌ऱ्या भाषेत‌ नेम‌क्या आश‌यास‌ह‌ पोच‌व‌णं हे काम‌ लै अव‌घ‌ड‌. प‌ण ह्या त्यात‌ही वाक‌ब‌गार आहेत‌. असो.

तुमचे आवडते "इंग्रजी सिनेमांचे थीम संगीत" कोणते?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 26/06/2017 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी सिनेमांना थीम संगीत नसतेच असे नाही, पण पण त्यांची धाव ही "टायटल साँग" पुरतीच मर्यादित. कोणे एके काळी हिंदी सिनेमांना टायटल साँग असणे अनिवार्य होते. उदा, "जब प्यार किसि से होता है" किंवा "युं तो हमनें लाख हसीन देखे है." किंवा मग टायटल साँग नसेल तर, मग जंगली सिनेमातील "ऐहसान तेरा हो गा मुझपर" हे गाणे.