खरेदी एक भोग!
खरेदी एक भोग !
जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला खरेदी करावी लागते. ज्याने आयुष्यात कधीच खरेदी केली नाही असा व्यक्ती कदाचितच असेल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जश्या मुलभूत गरजा होत तशीच खरेदी सुद्धा मुलभूत गरज आहे. किंबहुना खरेदी मुळेच ह्या गरजा भागू शकतात. मानवी उत्कांतीचा इतिहास हा खरेदीचाच इतिहास आहेे. खरेदी प्रकियेत ग्राहक व विक्रेता हे दोन मुलभूत घटक जसे अंतर्भूत असतात तसेच ईतर अनेक घटक देखील यामधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अंतर्भूत होत असतात. आजच्या काळात माणूस हा माणूस आहे का नाही हे खात्रीलायक रीत्या सांगणे धाडसाचेच होईल. पण माणूस हा ग्राहक मात्र आहे.
मिसळपाव