अँड्रॉपॉज.... एक दुर्लक्षित विषय!
अलीकडच्या काळात किमान शहरांमध्ये मेनोपॉज बद्दल हळूहळू चर्चेला सुरवात झाली आहे. स्त्रियांच्यात साधारण चाळीशी नंतर होणारे बदल; त्यांचे ऋतुचक्र बदलणे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याची अलीकडे काही प्रमाणात दखल घेतली जात आहे; आणि हे चित्र समाधानकारक आहे यात प्रश्नच नाही. पण ज्याप्रमाणे मेनोपॉजबद्दल मोकळेपणी बोलले जाते त्याचप्रमाणे अँड्रॉपॉज देखील थोडी चर्चा झाली पाहिजे. कारण स्त्रियांप्रमाणेच पुरुषदेखील या विशिष्ट शारीरिक आणि मानसिक संक्रमणातून जात असतात.
अँड्रॉपॉजचे कारण पुरुषांमधील hormone testosterone कमी होणे हे असते.
मिसळपाव