कोलाज
शनिवारी सकाळी सहा चा गजर वाजतो. मी डोळे किलकिले करत उठतो, आज गावाला जायला निघायचंय. आई नेहमीप्रमाणे माझ्याही आधी उठलीये. गाडी साडेनऊला आहे. मी तोंड धुवून नेहमीप्रमाणे ग्राऊंड वर जायचा विचार करतो आणि बूट चढवून निघतो.
"लवकर ये रे..", आई जवळजवळ ओरडतेच.
मला का कोण जाणे मागील ४-५ वर्षं न चुकता अगदी सकाळी सहा च्या ठोक्याला पळायला घेवून जाणार्या मित्राची आठवण येते. त्याच्यामुळेच तर ही एकच चांगली सवय लागली. गेले वर्षभर मात्र तो अमेरिकेत आहे. नुकतंच लग्न झालं त्याचं. परवाच फेसबूकावर फोटो पाहिला. माझ्यापेक्षाही बारीक असणारा आता माझ्या तिप्पट झालाय.
मिसळपाव