Skip to main content

विरंगुळा

तुम्ही कोण होणार ?

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 01/01/2013 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ असे कुठेतरी वाचले होते. हे वाचून मी (माझ्या)लहानपणी कोणत्याही बारशाला गेले किंवा नवीन बाळ झाले आहे, अशा घरी गेले, की पाळण्यातल्या बाळाचे पाय पाहण्याचा प्रयत्न करीत असे. पण ते बेटे दुपट्यात लपेटून इतक्या बंदोबस्तात ठेवलेले असत की त्यांचे नखही पाहायला मिळत नसे. एकवेळ शनिवारी संध्याकाळी देवळातल्या मारुतीच्या पायाचे दर्शन होणे सोपे, पण पाळण्यातल्या बाळाचे पाय ? नाव नको ! पुढे पुढे, ती एक म्हण आहे अन त्याचा अर्थ, बाळ मोठेपणी कोण होणार ते समजते, हे समजले. तसेही अलीकडे पाळणे बघायला मिळणे कठीणच.

टेडींचे संमेलन......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 24/12/2012 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रस्त्यावर हे रंगीबेरंगी दृष्य बघितले आणि कॅमेरा बाहेर काढायचा मोह आवरला नाही.

बादशाही ऑम्लेट

लेखक चाफा यांनी शनिवार, 22/12/2012 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
बादशाही ऑम्लेट : साहित्य अंडी - २ कांदे - १ मध्यम आकाराचा आलंलसूण पेस्ट - १ चमचा मिरच्या - ५-६ बारीक चिरलेल्या सोया सॉस - १ चमचा चिलीसॉस ( ग्रीन ) - १ चमचा तेल - गरजेनुसार जिरं - चिमूटभर मोहरी - चिमुटभर मीठ - चवीपुरते कॄती : प्रथम अंडी एका भांड्यात फोडून घ्यावीत, त्यानंतर त्यात सोया सॉस व चिलीसॉस मिसळून ती व्यवस्थित फेटून घ्यावीत त्यानंतर एका लहान भांड्यात चमचाभर तेल टाकून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट व्यवस्थीत परतून घ्यावी ( मिश्रण जास्त घट्ट होता कामा नये ) मिरच्या व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यागेल्यावर त्यात जिरं व मोहरी टाकून गॅस बंद करावा जिरं मोहरी फुलून आल्या बर

Arkansas

लेखक शैलेंद्रसिंह यांनी सोमवार, 17/12/2012 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री साडेबारा वाजता फ़ोन आला....सकाळी ३ वाजता एअरपोर्टला जाऊन कार रेंट करायच्या आहेत, ४ वाजता परत येऊन सगळ्यांना घेऊन आरकंसास च्या ओझार्क टेकड्यांकडे निघायचंय...२ दिवस कॅम्पिंग करायचीय. नकार द्यायचा प्रश्नच नव्हता..कारण तसा ऑप्शन दिलाच नाही....नुकताच टॅको बेल मधुन चालुपाज घेऊन आलो होतो. दोन-दोन चालुपाज हादडले...किचनची आवराआवर, डिश वाशर लावता लावता १:३० वाजले आणि मग बेडवर लॅपटॉप घेऊन ऑर्कुटींग सुरु केली. काही पोस्ट वाचता वाचताच झोप आली...आणि तसाच झोपलो. ३ वाजता उठायचे टेंशन होतेच. पण तरीही ४:१५ वाजता फ़ोन आला तेव्हाच उठलो.

कथा - इरॉस आणि साइक

लेखक शुचि यांनी रविवार, 16/12/2012 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रीक पुराणातील विलक्षण प्रेमकथा वाचनात आली. तिचा हा अनुवाद - खूप पूर्वी पृथ्वीवर एक राजा रहात होता. राजाला ३ मुली होत्या. सर्वात जी धाकटी होती ती अत्यंत मोहक होती. तिचे नाव होते "साइक" (psyc). साइक इतकी सुंदर होती की दूरदूरुन तिला पहाण्यासाठी लोकं येत आणि तिच्या सौंदर्याची स्तुती करत. ते म्हणत की साईक ही प्रत्यक्ष सौंदर्याची देवता "अ‍ॅफ्रोडाइट" (afrodite) पेक्षाही सुंदर आहे. अ‍ॅफ्रोडाइट ची साइकशी काय तुलना? अ‍ॅफ्रोडाइट ची मंदीरे ओस पडू लागली, लोक तिची पूजा करेनासे झाले. त्यामुळे झाले काय अ‍ॅफ्रोडाइट ची झोप उडाली, तिला साइकचा दुस्वास वाटू लागला.

ऊमदा प्राणी.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 15/12/2012 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
परवा या कार्यक्रमाला गेलो होतो तेथे काढलेली काही फोटो...... टापा व घाबरुन उडणारी माती....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जिवाभावाचे मैतर.....घोड्याशी नीटच वागावे लागते. जर तुम्ही त्याच्या मनातून उतरलात तर तो ऐनवेळेस तुम्हाला अस्मान दाखविल्याशिवाय रहात नाही. माणसाला जनावरांचा माणसाचा लागत नाही इतका लळा लागतो.

3d visualisation: making of rainy night (बदलुन)

लेखक स्पा यांनी गुरुवार, 13/12/2012 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
लाईफ ऑफ पाय पहिल्यापासून डोके भिरभिरलेले होते .. चायला जमाना कुठे चाललाय आणि मी कुठे . काहीतरी आपण पण हटके ३डी करायचे असे ,मनाशी वाटत होते . अर्थात मी जे नेहमी काम करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे , हटके , जे मला आनंद देईल असे. विचार करत बसलो मग मागे कधीतरी डोक्यात आलेल्या कथेचा प्लॉट आठवला.

चावडीवरच्या गप्पा - बळीराजा आणि रामगिरी

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 11/12/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत. “आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण