चाळ नावाची भूताळ वस्ती
आजकाल खूप सारे भयपट घाबरत घाबरत का होईना पाहील्यामूळे म्हणा किंवा भूताच्या गोष्टी वाचल्याने म्हणा ही भय-कल्पना सुचली.
.
मुंबईतल्या कुठल्याश्या एका चाळीत काही भूत रहातात. चाळ तशी एक मजलीच. अजून सुदैवाने कुण्या बील्डरची नजर ह्या चाळीवर गेली नाही. त्यामूळे चाळ अजून टीकून आहे. चाळीच्या तळमजल्यावरच्या जीन्याजवळची खोली ही चाळ सेक्रेटरीची हे वाचकांनी ओळखले असेलच. किंबहुना ह्या मोक्याच्या खोलीमुळेच सेक्रेटरी-पणाची माळ (लिंबू-मिरच्यांची अर्थात ) ह्यांच्या गळ्यात पडली आहे. आजचा दिन विशेष आहे. आज दिवाळी निमीत्त काही सांस्कृतिक कार्यक्रम ठरवण्यासाठी मुद्दाम चाळीची विशेष बैठक बोलवण्यात आलेली आहे.
मिसळपाव