माझी गोष्ट
आज काल माझ्या आयुष्यात काही तरी वेगळ घडतय. वेगळ म्हणजे नक्की काय ते अस सुसंगत पणे नाही सांगता येणार पण तरीही एक प्रयत्न करतो. आता हेच बघा ना मी कोण हे सांगायच्या आधीच तूम्हाला दूसरच काहीतरी सांगायला सुरूवात केली. अस हल्ली सारख घडतय. माझ मन थार्यावर नाही. कसली तरी टोचणी लागून राहीलीये मनाला. आता राहील मी कोण्?.सांगतो. माझ नाव राकेश. देसाई वकिलांकडे मी असिस्टंट म्हणून सुरूवात केली. ते त्यांच्या निव्रुत्ती नंतर ही अजून तिथेच आहे. आज काल त्यांचा मुलगा वकिली बघतो. कधी तरी माझा सल्ला विचारतो. आता माझी चाळीशी आलीये. म्हणजे काही फार वय नाही. Life begins at 40 म्हणतात ते काय उगाच?
मिसळपाव