Skip to main content

विरंगुळा

पेन्सिल रेखाटन

लेखक वर्षा यांनी शुक्रवार, 24/10/2008 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आवडती हिरॉईन रेखाटायचा एक फसलेला प्रयत्न! माध्यमः Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil -वर्षा

आगंतुक पाहुणा

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 24/10/2008 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री झोपायला म्हणुन खोलीत आलो. पलंगपोस बदलावा म्हणुन घातलेला पलंगपोस काढणार तेव्हढ्यात लक्ष बिछान्यावर विराजमान झालेल्या पाहुण्याकडे. पाहुणा घर आपलच समजुन मस्त मजेत बिछान्यावर फिरत होता. हिरवेगार तुकतुकीत अंग, पंखांना तपकिरी काठ, साधारण एक सेंटिमिटर आकार, पंख मिटुन घेतलेले असा पाहुणा सोयिस्कर जागेची पाहणी करत असावा हा प्रकार जरा वेगळाच दिसला. म्हटल पाहुणे आले आहेत तर त्यांची छबी टिपावी. लगबगीन कपाटातला कॅमेरा काढला, भिंगसंच बदलला.

नावात काय नाही?

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 24/10/2008 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच मला काही कामानिमित्त वासिलिकी नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधायचा होता (ह्या व्यक्तीचे आडनाव देवनागरीत टंकणे हे माझ्या आवाक्यापलीकडचे आहे!). ही व्यक्ती अमुक एका कंपनीत, अमुक एका विभागात, अमुक एका हुद्द्यावर काम करते आणि त्यामुळे मला हवी असलेली माहिती ही व्यक्ती देऊ शकते, इतकीच माहिती मला देण्यात आली होती. आता वसिलिकी ही बाई आहे की बुवा याचा कुणालाच काही अंदाज नव्हता. अर्थात त्यामुळे कामात काही फरक पडत होता असे नाही, पण उगाच एक उत्सुकता होती. माझ्या पुढे होता त्या वसिलिकीचा फोन नंबर आणि इमेल. मी फोन लावला. फोन काही वेळ वाजला आणि वॉइस मेसेजवर गेला.

भाजे लेणी

लेखक झकासराव यांनी गुरुवार, 23/10/2008 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यतंरी भाजे येथे जाण झाल. भाजे लेणी हे बौद्ध लेणी आहेत. अख्ख्या डोंगर पोखरुन ही लेणी बनवली आहेत. अशी अनेक लेणी सापडतात. कार्ला , शिवनेरी परिसरात अशी लेणी आहेत. ही लेणी तेव्हाच्या बौद्ध भिक्षुंच्या रहिवासासाठी असायचीत. (म्हणे) भाजे हे ठिकाण पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर आहे. जर पुण्याहुन लोकलने जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनटाच्या अंतरावर आहेत. स्टेशनवर उतरल की लोहगड आणि विसापुरच दर्शन होतच. तिथेच जवळच ही लेणी आहेत. विसापुर आणि लोहगड हे मात्र जास्त अंतरावर आहेत. जर जुन्या मुंबई पुणे रोड ने गेल की कार्ला (एकवीरा माता) इकडे जाण्यासाठी एक चौक लागतो.

दुखतामां?, दुखतालाचतां,दुखुकच व्होयां(दुखतंना? दुखणारच ते,दुखायलाच हवं)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 23/10/2008 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांना त्यांच्या आयुष्यात दोनदा स्ट्रोक आला.एकदा त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी आणि नंतर दहा वर्षानंतर,म्हणजे पन्नासाव्या वर्षी.पहिल्या खेपेला ते लवकरच बरे झाले.एक तर ते तरूण होते,आणि स्ट्रोक त्यामानाने माईल्ड होता.त्यांची डावी बाजू पर्‍यालेसीसमुळे निकामी झाली होती.पण लवकरच बरे होवून ते कामावर जावू लागले होते. कामावर जॉईन होण्यापुर्वी त्यांची मेडिकल टेस्ट घेतली गेली.त्यांच्या सांगण्याप्रमाणे डॉक्टरने त्यांना पेन उचलून उघडून द्यायला सांगीतलं .ते त्यांनी केलं पण देतांना उलट करून न देता पेनची बाजू डॉक्टरच्या हातात दिली.त्यामुळे त्यांचं फिझीकल आणि मेंटल काम कोऑर्डिनेट होत नाही असं अनमान का

उत्सव - वाटेवरील रंग

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 22/10/2008 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सहा ऋतुंचे सहा सोहळे. पण मला बुवा या न्यु इंग्लंडातली पानगळती (फॉलियेज/फॉल) फार आवडते. उन्हाळा संपून गुलाबी थंडी सुरु होते तसा हिरवा गर्द असणारा निसर्ग रंग पलटू लागतो. उंच-उंच झांडांचे शेंडे पिवळे-लाल पडू लागतात व बघता बघता सगळा परिसर पिवळा धमक व लाल भडक मखमलीने सजून गेलेला असतो. वरमाँट, न्यू हँप्मशरला तर सगळेच जातात. पण दररोज आनंद देणार्‍या कामावर जाताना दिसणार्‍या आजूबाजूंचा झाडांचे कौतुकही करावे म्हणून मी विषेश चित्रे काढली.

(कुंतलांचा पसारा)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 21/10/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - मिपाची कवयित्री प्राजू हिची 'आठवांचा पसारा' ही सुंदर कविता! 'चतुरंगप्रयातात' हे विडंबन करण्याचा प्रयास केलेला आहे.. उवा जाहल्या, कुंतलांचा पसारा रिठ्याने कशा आज डोळ्यांत धारा सुगंधीच मेंदी असावी उशाशी उडू लागला रंग हा आज सारा कसा आणला 'वीगही' मी लपूनी गळू लागला केशसंभार सारा उडाली पहा रातची झोप माझी कुणा वैद्यकाचा मिळे ना सहारा जरी टाळतो मी तुझ्या आलयांना तुला नापिता पाहु येतो शहारा चला संपला भार या डोसक्याचा मिळाला वयाने मला हा इशारा चतुरंग

(मदार)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 20/10/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
नीरज कुलकर्णी यांची 'मदार' कशावर आहे हे बघून मला माझी मदार विडंबनावरच कशी आहे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि.... नवटाक ह्या कवींची, भाषा सुमार आहे... आता विडंबने ही, माझी मदार आहे... आश्वासने मिळाली, त्यांना जरी कुणाची; निश्चीत आज त्यांची, कविता शिकार आहे... मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्‍या; असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे... का भाव मोल केला, ही शायरी अशी का? मारुन सर्व बाता, होतो फरार आहे! 'हे काव्य आज त्याचे, उसवून काढले मी!!' हा कोणता निराळा, शिंपी टुकार आहे? गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी; 'रंग्यास' कल्पनेचा, चढला बुखार आ