एक ऐकशील?
तू येशील आणिक जाशील
काही देशील ,काही घेशील
पहाटेच्या साखरस्वप्नांना
गुलाबी बनवून जाशील!
भरती-ओहोटीचा खेळ होईल
किनारा परत एकटा राहील
तेव्हा जपलेल्या खुणांना
सांग नातं कधी देशील?
अर्थ, संदर्भ गोठून जातील
जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील
पण एकटं असताना
तेच तर माझी साथ देतील!
मग अशीच तू वेळ ठरवशील
भेटण्यासाठी इथं येशील
घड्याळातल्या काट्यांना
सांग तेव्हा तू कसं बांधशील?
वेळ संपली, आता तू निघशील
पण आता एक करशील?
पुन्हा आपण भेटताना
निदान ह्या नात्याचं नाव सांगशील?
काही देशील ,काही घेशील
पहाटेच्या साखरस्वप्नांना
गुलाबी बनवून जाशील!
भरती-ओहोटीचा खेळ होईल
किनारा परत एकटा राहील
तेव्हा जपलेल्या खुणांना
सांग नातं कधी देशील?
अर्थ, संदर्भ गोठून जातील
जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील
पण एकटं असताना
तेच तर माझी साथ देतील!
मग अशीच तू वेळ ठरवशील
भेटण्यासाठी इथं येशील
घड्याळातल्या काट्यांना
सांग तेव्हा तू कसं बांधशील?
वेळ संपली, आता तू निघशील
पण आता एक करशील?
पुन्हा आपण भेटताना
निदान ह्या नात्याचं नाव सांगशील?
--- मी अश्विनी
Taxonomy upgrade extras
मिसळपाव