Skip to main content

जीवनमान

अग़बाई अरेच्चा !

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 13/05/2015 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
पतीने आपल्या पत्नीसाठी आणलेली भेट पत्नीला आवडते की नाही हे पाहण्यासाठी पती तिच्या नजरेकडे पाहात असतो. वस्तू पाहण्याची उत्सुकता आणि मिळणारा प्रतिसाद लागलीच डोळ्यांच्या भाषेतून कळतो. तिच्या डोळ्यात जी चमक आणि प्रसन्नता उमटते ती फक्त पतीलाच कळते. मागची ८ वर्षे मदर्स-डे निमित्त आपल्या पत्नीला ड्रेस किंवा अलंकार भेट म्हणून देतो आहोत, तर यावेळी आपण इतर लोकांपेक्षा काही वेगळेच गिफ्ट द्यायचेच, अशी खुणगाठ, पेन होल्डरनेस या, दोन मुलांचा बाप असलेल्या, ४० वर्षीय (साहसी ?) पतीने, मनाशी बांधली.

फिटनेस माउंटन अँड युअर एसयुव्ही

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 12/05/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक सहज सुचलेली/केलेली तुलना. FM फिट व्हायचंय, व्यायाम करायचाय... असं म्हणताना/ऐकताना लोकांच्या चेह-यावर एखादं मोठं संकट पुढे उभं राहिल्यासारखे भाव असतात. समजा, की हे संकट आहे. प्रचंड मोठा डोंगर आहे. तुमचं उद्दिष्ट त्याच्या शिखरावर पोहोचणं हे आहे. तुम्ही म्हणजे एक फोर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही आहात. तर; तुमच्या मागील चाकांना मिळणारी ताकद म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाचा. ख-या अर्थाने तुम्हाला प्रॉपेल करतो तो व्यायाम. पुढच्या चाकांना मिळणारी ताकद म्हणजे डायट. रेअर व्हील ड्राइव्ह इज नॉट इनफ.

जरुरत है, जरुरत है......

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 10/05/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?” नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!” “मग?” “पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम?

काही नवे करावे म्हणून.

लेखक नूतन सावंत यांनी शनिवार, 09/05/2015 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरी येथे पूर्वी अंगण नावाचे खाद्यगृह होते.जेवण झकासच असायचे.आपणपण इथे एक खाद्यगृह सुरु करूया, अशी इच्छा मनात धरून जागा शोधायला सुरुवात केली.जागांच्या अव्वाच्या सव्वा किंमती पाहून थंडावलो.पण तुमच्याकडे पैसे आहेत हे दलालांना समजले की,जागांच्या वेगवेगळ्या ऑफर्स यायला सुरुवात होते.त्यप्रमाणे कोणीतरी फणसोप येथी आंबाच्या बागेची माहिती सांगितली. जागा पाहून आलो तेव्हा ऐन मे महिना.झाडे रोपदळच पण आंबे लागलेले.सोबत आई होती.तिच्या माहेरी म्हणजे माझ्या आजोळी आंब्याचे उत्पन्न भरपूर.अनुभवही खूप."एकदा बाग घेतली तर पन्नास ते साठ वर्षे बघायला नको" असा तिचा शेरा.जागेत पाण्याची सोय नव्हती पण जवळच ओहोळाच

खड्डा आणि मी

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 08/05/2015 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शहरात एक सुप्रसिद्ध खड्डा आहे.संपूर्ण महाराष्ट्र्ात जरी एक वेळ दुष्काळ पडला तरी तो तेव्हा एखाद्या नदीसारखा दुथडीभरुन वाहत असेल यात शंका नाही तर इतर खडड्याप्रमाणेच याही खड्ड्याचे पुनर्निमाण नेहमीच होत असे. अहो खड्डे आहेत म्हणुन तर लोक गाड्या हळु चालवतात अशी मी स्वताःची समजुत करुन घेतली आहे त्या दिवशी मी महत्वाच्या कामानिमित्त [कोणते ? राष्ट्रउभारणीचे अत्यंत गुपित कार्य होते ते] त्या रस्यावरुन निघालो होतो.एक ब्रह्नानंदी टाळी लावलेला टॅम्पो रस्त्यात हळुवारपणे चालला होता.इतर कोणत्याही सांसारिक गोष्टिप्रमाणे त्याला मागच्या कोणत्याही ओरडणारया वाहनाची तमा नव्हती.

'' अरे, ऐकतोस ना रे...''

लेखक संकेत२५ यांनी गुरुवार, 07/05/2015 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या स्वप्नवतं दुनयेत गाढ असता अचानकपणे जाग यावी अन ते स्वप्नचं कोलमडून जावे तसंच काहीसं आयुष्यात कधी घडतं . आयुष्यातले ' रंग ' एकाकी बदलतात.. अन होत्याच न्हवतं होवून जातं. 'क्षणा' चा हि विलंब न लागता... अशीच एक रविवारची रात्र ,हास्य आनंदा कडून वेद्नेकडे झुकलेली ... रात्रीचे साधारण सव्वा आठ होत आले होते .. पनवेल स्थानकाहून ठाण्यासाठी आम्ही लोकल पकडली अन सीट वर निवांत बसते झालो. . रेल्वे रुळावरून लोकलं अगदी धीम्या गतीनं पुढे सरत होती. डब्यात कमी अधिक रेलचेल होती. हळू आवजात कुणा एकेकाची, आप आपसात कुजबुज चाललेली . कुणी मोबाईल मध्ये डोकावलं होतं.

मनकवडा डॉक्टर …

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 07/05/2015 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पना करा, संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या घरात असताना, अचानक सर्व शहरातली लाईट गेली, आणि आपल्याकडे एकदम बुक्क अंधार झाला तर, अंधाराला डोळे सरवयापर्यंत, मनावर कशी एकप्रकारची अनामिक भीती एकटेपणाची काळोखी पसरते. आता त्या काही क्षणांच्या अनुभवावर अंध व्यक्तींचा जीवनातील काळोखीवर खर्‍या अर्थाने विचार करून, अंध बांधवांच्या दु:क्खाची भयाणता, डोळस व्यक्ती कल्पना करू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच अंधांचा जगाशी संपर्क येतो.

विश्वास आजूबाजूंच्यावरचा

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 06/05/2015 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
पोट गहीवरुन आले वात गेला निसटून दोष कुणाचा लपवण्यास गवाक्ष खुले हे झाले गुन्हा केला कोणी आरोपी कुणा ठरवावे बालंट ते नाकारण्यास सगळेच भोळे झाले चर्चा केली त्यांनी संशयित शोधण्याचे ठरले ढोंग सारे रचण्यात मग लोकही कडवे झाले चौकश्याचें सत्र होते आरोपी सर्वत्र होते कोठुनी गंध तो आला रोख मात्र इतरत्र होते हायसे झाले 'निरागसाला' नाव कल्लोळी वाचले संशयात हरले सगळे पण त्याचेही सोहळे झाले

विश्वास श्वासावरचा

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 06/05/2015 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
रोज पुन्हापुन्हा तो बाहेर पडतो संगे फक्त कोरडा उःश्वास घेतो हजारो वर्षापासुन तो तिला शोधतो ती अजुनही असल्यावर विश्चास ठेवतो प्रत्येकाच्या शरीरात जावुन तो पाहतो तिच्या अोळखीच्या खुणा शरीरात शोधतो पवनाच्या रुपातुन तो मला रोज भेटतो पुन्हापुन्हा तिचे कुशल मला विचारतो प्रत्येक श्वासातुन मी समजावु पाहतो श्वासाशिवायच्या शरीरास मी तरी नाकारतो तो मात्र अजुनही विश्वास ठेवतो तिच्या श्वासहिन शरीरास शोधत राहतो श्वासाशिवाय तो तरी भटकत राहतो श्वासावरच्या विश्वासास ठोकरु पाहतो.....