Skip to main content

जीवनमान

ऐक स्वखे : त्रिधारा भाग-३

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 24/04/2015 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
स्व भाग १: ======= एक घटना आपल्याच लोकांना कसं बदलविते ते पहा लग्न होई पर्यंत जर कश्यालाही विरोध केला तरी पटवून दिले तर घरच्यांना पटत असे पण आता मात्र प्रत्येक लहान सहान गोष्टीत सुद्धा "हे तुला बायकोने सांगीतले असेल","तीचे ऐकून असे बोलतोयस झालं" असा समारोप होऊ लागला. सोसयटीच्या लोकांची आपल्या संसारात नको इतकी लुड्बूड आणि स्वखीच्या धार्मीकतेवर शेरेबाजी कशी “अस्थानी आणि अन्यायी” आहे हे घरच्यांना पटवणे अवघड होऊन बसले.

ऐक स्वखे : त्रिधारा भाग-२

लेखक नाखु यांनी बुधवार, 22/04/2015 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तू भाग १ हो मी वास्तूच (वास्तुपुरूष म्हणा की वास्तु देवता ते फार महत्वाचे नाहीये.) या स्वखी आणि स्व यांच्या संसाराचा मूक साक्षीदार (मूक कसा म्हणू मी, स्वखी बोलते माझ्याशी अगदी मनापासून, काळजी घेते) सुरुबातीला मी यांच्यासोबत फ्लॅट्मध्ये होतो साधारण २ वर्ष नंतर त्याने बंगला बांधला तिथे गेलो.

अष्टवृक्षासौभाग्यवती

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 21/04/2015 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
महमूद दरवेश या पालेस्तिनी लेखकाच्या 'If Only the Young Were Trees!' या ललितलेखाचा मुक्त अनुवाद. झाड झाडांचे सहोदर.

झाडपण

लेखक नाखु यांनी मंगळवार, 21/04/2015 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
कधी खंत करी कधी ते एकटे झाड.. नक्की झाड वाकडे-तिकडे म्हणून वेगळे ! का गेंड्याच्या नाकावरच्या शिंगासारख्या टेकाड्-फोडावर आले म्हणून आगळे ! नक्की माहीत जरा जास्त्च तिरके उगवले होते ते जणू एअर इंडीयाचा महाराजा. हे तिरके म्हणून कुणी सरळमार्गी त्याच्या जवळ येत नसे. अगदी पायवाटही त्याचा अगदी सावलीचाही विटाळ नको म्हणून थोड्या अंतरावरून वळसा घालून उतरायची खालच्या वाडी-वस्तीत. त्या झाडाला जर बोलता आले अस्ते तर तेही ओरडून म्हणाले असते मी तुमच्यातलाच आहे.. गर्द देवराईला, ओढ्याच्या पांदीला आणी पिंपळपाराच्या फांदीला पण. मुकाट वरून बघायचे मी सगळ्या झाडांपाशी,झाडावर,झाडाखाली चैतन्यझरा सळसळताना... शा

मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है ....

लेखक कहर यांनी सोमवार, 20/04/2015 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है .... "५.३० पहिला गजर झाला ५ मिनटात उठुया" "अरे दुसरा गजर झाला ? साला ५ मिनटात ६.१५ कसे वाजले " "६.३५ झालेत आताशी ? आज दाढी करायला वेळ आहे आपल्याला " "७.२५ वाजले ? बाप रे उशीर झाला ..

कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 20/04/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाची देवाला विनंती: असूनही रणरणत्या उन्हाची वेळ का चालवलायस तू पावसाचा खेळ? बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ? देवाचे सडेतोड उत्तर: माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ
काव्यरस

ऐक स्वखे : त्रिधारा

लेखक नाखु यांनी सोमवार, 20/04/2015 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
  • हे ललीत लेखन एका वेगळ्या धाटणीचे आहे याबाबत व यातील तपशीलांचा खुलासा अतिंम भागात करणे रास्त ठरेल
  • ह्या लिखाणादरम्यान आलेली गाणी फक्त त्या प्रसंगवर्णनासाठी आहेत त्यांचे श्रेय त्या त्या निर्मात्याचे आहे आणी इथे त्यांचा वापर फक्त भावना प्रगट करण्यापुरताच आहे
  • याहीपेक्षा समृद्ध आणी चतुरस्त्र अनुभव असलेली जेष्ठ मिपा मंडळी आहेत तरी त्यांचे तुलनेने विस्कळीत असे लि़खाण करीत आहे याची नम्र जाणीव आहे.
स्वखे:भाग १ *** "वन्स फोन आलाय तिकडून आणि बाबा बोलतायत त्यांच्याशी" वहिनीने निरोप दिला आणि मी आतल्या खोलीत आईकडे गेले. "आई मला

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 20/04/2015 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. अश्या तर्‍हेनी अखेर हे नावाला नाटकापुरतं-धरलेलं नाटक होऊन.. बर्‍याचश्या करमणुकि नंतर पब्लिक आपापल्या घरी पांगलं... पुढे चालू... ============================================== पांगलं ते पांगलं खरं,पण आंम्ही सगळी देवीच्या देवळापासून घरी चालत चालत येता येता हीचं अजुन एक नाटक सुरु झालं. ही:-आत्मू... मी:- काय? ही:-तू गाणी कधीपासून लिहितोस? मी:- १ अठवड्यापूर्वीपासून...(पलिकडून काकाचा हशा!) ही:- सांग ना???? मी:- अगं खरच १ अठवड्यापूर्वीपासून...काका म्हणाला-लिही!

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४१ .. (खेडेगावातील नाटक..)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 17/04/2015 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि अश्या वातावरणात मग ते नाटकं सुरु झालं. नाटकाचं नाव होतं............... पुढे चालू... ====================================== रामाची सीता... हां ...... , पण ह्यात गोंधळाल हां तुम्ही. आता 'रामाची सीता...' ह्या नावाची ट्रॅजिडी म्हणजे, खरं तर या वर्षी ठरलेलं नाटक होतं- सीता स्वयंवर . पण पहिल्यांदा तालमी सुरु झाल्या आणि हुंबैस्नं मिलवलेली प्रोपेशनल नटी ठरल्या मानधनाच्या दुप्पट मागायला लागली. आणि मग आली पंचाइत सगली.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.