Skip to main content

जीवनमान

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४०

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 16/04/2015 04:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि ह्या काहिश्या समाधानानी दाटलेल्या हृद्य प्रसंगी, काकूचा निरोप घेऊन आंम्ही घराकडे परतलो. पुढे चालू... =================================================== काहि व्यवसायच असे असतात..की त्यामधे सुट्टी घेण्याचं स्वातंत्र्य असलं,तरी ती मिळण्याचं असेलच असं नाही. आता हेच बघा ना.. मी इकडे दिडदोन महिन्याकरिता आलो आणि त्यातले पंधरावीस दिवस गेले कसे ते खरच कळलं नाही..असं म्हणण्यासारखे दिवस सुखात चाललेले होते.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 14/04/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. मी दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहाच्या पहिल्या येश्टीनी गावाकडे निघालो.. पुढे चालू... ========================================== आणि पुन्हा येकवार तो येश्टीचा कंटाळवाणा परंवास करुन, मी दुपारच्या चिडचिडं करणार्‍या तिनाच्या तिरप्या उन्हात मुक्कामी पोहोचलो. बघतो..., तर चक्क काका त्याची ती भल्यामोठ्ठ्या क्यारियरची सायकल घेऊन स्वागताला उभा असल्यासारखा उभा.आणि बरोबर संघटनेतल्या दोनचार पोरांचं कोंडाळंही.

टोल भैरव !!

लेखक नितिन शेंडगे यांनी मंगळवार, 14/04/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !!, आज काल सगळीकडे टोल चा मुद्दा खूप गाजतोय. नुकताच सरकार ने काही टोल बंध केले आणि काही ठिकाणी तात्पुरती टोल माफी दिली . मी सुरुवातीला स्पष्ट करतोय कि कोणत्याही राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मी हे लिहित नाहीये. हा तर चला मग, ज्या वेळेस मनसेने टोल चा मुद्दा घेतला त्याच्या आधी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे तरी लक्ष होते का कि आपण किती आणि का टोल देतो ?? कधीतरी आपण विचारले का रे बाबा किती दिवस टोल घेणार ?

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/04/2015 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. जिन्याच्या पायर्‍या चढू लागलो.. पुढे चालू... ================================== अर्थातच हा जिना मी प्रथमदर्शनी जरी एका इमारतीचा चढत असलो,तरी मनामधे जी चढण सुरु झाली होती, ती एका व्यवसायिक वटवृक्षाची होती..याचा मला तेंव्हा अंदाजंही आलेला नव्हता. काय आहे ना? की कुठल्याही नोकरीधंद्यात प्रथम प्रथम माणासाला सशाची कातडी प्राप्त झालेली असते. प्रत्येक नविन गोष्ट करताना तो घाबरतो,चाचपडतो..हे करु की नको? चुकेल की बरोबर येइल? हे असच-असतं का? असले ढीगभर प्रश्न त्याला पडतात.

सन २५१३ मधला मिसळपाववरील ऐक लेख…

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 08/04/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
टीप १ : *** अत्यंत अत्यंत अत्यंत काल्पनिक ……! टीप २ : (लेखाची पार्श्वभूमी, २१ व्या शतकातल्या वाचकांसाठी :: १६ मार्च २२८० रोजी, ३ मैल व्यास असलेली १९५०-डीए नावाची उल्का पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळली. अर्थातच ती पृथ्वीच्या जवळ येण्यापूर्वी तिच्या ठिकऱ्या करण्याचे किंवा मार्ग बदलण्यासाठी, पृथ्वीवासियांनी, तिच्यावर अण्वस्त्रांचा मारा केला होता.

पुणे पासपोर्ट ऑफिसचा त्रास

लेखक कपिलमुनी यांनी बुधवार, 08/04/2015 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
मानसिक त्रास काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती. १.व्यवस्थित भरलेला फॉर्म २.रीसीट ३.आधार कार्ड ४ पॅन कार्ड ५. शाळा सोडल्याचा दाखला ६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट ७. अ‍ॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी) ८.अ‍ॅनेक्चर ए ( जन्मगाव ) ९. लाइट बिल १०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने) वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अ‍ॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते. प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्‍या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले .

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३७

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 08/04/2015 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. "तुमच्या मधली प्रीती अविच्छिन्न राहो." भावार्थ तर कळला होताच..पण त्यातल्या प्रीती.., या शब्दाचा मतितार्थ कळण्यासाठी, मी माझ्या सुभगेसह..एका सर्वस्वी अनोळखी..परंतू जगण्याला नवी दिशा आणि आनंद देणार्‍या नव्या जीवनाच्या वाटेवर निघालो होतो. पुढे चालू... ===================== "गगन...सदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश.... देई अभय...गगन...सदन..." "आत्मू... अरे तुझी ती गाणी किती वस्तू कुठे कुठे विसरायला लावतात रे........!!!

गोंधळ

लेखक नाखु यांनी सोमवार, 06/04/2015 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ. असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली. प्रांतोप्राती वेग्वेगळ्या लोकप्रथा असल्या तरी त्याचा गाभाहेतू एकमेकांच्या परंपरेशी नाळ जोडणारा असतो .

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 27/03/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे. जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते?

गनिमी कावा

लेखक विदेश यांनी गुरुवार, 26/03/2015 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
विचारत इकडे तिकडे आले आज पाहुणे घरात आले अहाहा सदन धन्य झाले .. निवांत खुर्चीवर ते बसले मान डोलवत जरासे हसले रुमालाने तोंडही पुसले .. 'कसे काय तुम्ही वाट चुकला आठव आमचा कसा जाहला ?' - गूळपाणी देत प्रश्न विचारला .. ओशाळवाणे पाहुणे हसले हळूच इकडे तिकडे पाहिले प्रश्नाचे उत्तर देणे टाळले .. पिशवीतून मोबाईल काढला रुमालाने स्वच्छही पुसला माझ्या हाती तो सोपवला .. "गनिमी कावा" त्याचा ध्यानी आला माझ्या त्याच क्षणी मुकाट उठलो हाती धरुनी .. जर्जर जीव त्या पाहुण्याचा "चार्जर" विसरला मोबाईलचा शोधला पत्ता माझ्या घरचा .. ! .