जीवनमान
फोरिनची पाटलीण
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.
मुन्नी बदनाम- एक रसग्रहण
मुलांनो, आज आपला रसग्रहणासाठीची कविता आहे 'मुन्नी बदनाम हुई' काही चहाटळ लोक तिला आयटम साँग देखील म्हणतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करु. म्हणतात ना हाथी चले अपनी चाल....
तर थोडी माहिती.
गीत- मुन्नी बदनाम हुई'
चित्रपट - दबंग्ग
संगीत - ललित सेन ( जतिन ललित मधला)
हे पद्य मुख्यत्वे सलमान खान, मलायका (इतर उच्चारही आहेत) अरोरा खान आणि सोनू सूद यांवर चित्रित केले गेलेले असून इतर वडापाव( नीट वाचावे) वालेही कवायत करताना दिसतात.
मुख्य तेवढ्याच मुद्द्यांचे रसग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करुया.
काव्यरस
वारी हनुमान आणि रोडग्यांचा भंडारा.
नमस्कार,
या वर्षी पाडव्याला माझ्या गावाजवळील 'वारी हनुमान' या धार्मीक ठिकाणाला भेट द्यायचा योग आला. तसे या ठिकाणाची खूप ओढ लहानपणापासूनच आहे. शाळेला असताना सायकलने वारीला जाण्यात काही वेगळीच मौज होती. गावाच्या १५ किमी दूर गेलं की पहाडातून येणार्या ओढ्यांनी रस्त्याला चढ उतार दिलेले आहेत. ते सायकलने पैज लाऊन चढून जाणे आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊन तो खोलगट भाग न्याहाळणे अशी मजा करायचो. नंतर याच वारी हनुमान येथे वान नदीवर धरण बांधण्यात आले. यामुळे धरणाच्या कालव्याशेजारी एक कच्चा रस्ता तयार झाला. हा वारीला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे.
जगायचं कसं?
एका पेंशनर ची डायरी....
आज मी आणि सौ मालाड येथे इनॉर्बिटला मॉलमध्ये गेलेलो. हा मॉल म्हणजे पन्नास वर्षांच्या मुंबईत गुजारलेल्या आपल्या आयुष्यात प्रथमच तिचे सिंगापूर (किंवा शांघाय) होण्याच्या स्वप्नात उचलेले पहिले मोठे पाऊल असल्याचे मनोमन वाटले.
(वास्तविक हे एवढे मोठे पहिले पाऊल उचलल्यावर, मुंबईचा पाय मुरगळून ती त्याच पाऊलावर बसकण मारणर होती हे निश्चित होतं... पण पाऊल उचलल्याशी मतलब ... काय? )
मॉल भारी होता. शनिवार संध्याकाळ असल्याने गजबजलेलाही होता.
डायलॉग इन द डार्क
असे काय करतोस/तेस, दिसत नाही का? आंधळा/ळी आहेस का? असे बोल आपण इतरांना बोललो असु किंवा ऐकून घेतले असतील. नुकतेच 'डायलॉग इन द डार्क' ह्या प्रदर्शनाबद्दल एका परिचितांकडून कळले. त्यांचा अनुभव रोचक वाटला. त्यामुळे आपणही हे प्रदर्शन 'बघून' नव्हे अनुभवुन यावे असे ठरवले होते.
ह्या प्रदर्शनाबद्दल थोडक्यात म्हणायचे तर 'अंधांच्या विश्वाची झलक' ह्या तीन शब्दात वर्णन करता येईल. बरेचदा आपण प्रदर्शन 'पहायला' जातो पण इथे संपूर्ण अंधार असल्याने आपले डोळे काहीच कामाचे नसतात.
डायलॉग इन द डार्क हे प्रदर्शन डॉ.
ह्या प्रदर्शनाबद्दल थोडक्यात म्हणायचे तर 'अंधांच्या विश्वाची झलक' ह्या तीन शब्दात वर्णन करता येईल. बरेचदा आपण प्रदर्शन 'पहायला' जातो पण इथे संपूर्ण अंधार असल्याने आपले डोळे काहीच कामाचे नसतात.
डायलॉग इन द डार्क हे प्रदर्शन डॉ.उमलू द्या कळ्यांना : लहान मुलांचे शोषण, माहिती, खबरदारी व कायदा
''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्या, त्यांना कुस्करणार्या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.
अति जेवल्या वर काय कराल?
खादाडी कट्टा हा विषय चाललाच आहे तेव्हा....
'गरम गरम पुरणपोळी, त्यावर साजूक तूप- मग काय विचारताय? चांगल्या ३-४ हाणल्या. एवढ्या प्रेमानं केल्या होत्या मग त्याला दाद द्यायला नको?' असे संवाद तुमच्या कानावर पडले असतीलच. नाही? बरं मग - 'अरे काल आम्ही सगळे मित्र मंडळी जमलो होतो. काय धम्माल आली माहितीये, तंदुरी चिकन, पनीर मक्खन्वाला, गरमागरम बटर रोटी! डाएट वगेरे पार विसरलो रे!' 'अगं काल मी घरी एकटीच होते, मग टी. व्ही. बघता बघता एक डबाभर आईस्क्रीम फस्त केलं. कळलंच नाही कधी एवढं खाल्लं गेलं ते!' ह्या पैकी एक तरी उदाहरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असणार.
मिसळपाव