Skip to main content

जीवनमान

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 17/03/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
भुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची.

निसर्गवेड्यांसाठी नवी भेट - पुण्याचे पक्षीवैभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 16/03/2011 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
एनआरसीओतर्फे `पुण्याचे पक्षीवैभव’ फील्ड गाईडचे प्रकाशन २० मार्च रोजी नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) या पुण्यातील संस्थेच्या वतीने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून दिनांक २० मार्च रोजी वनाधिकारी व वन्यजीव तज्ञ श्री. प्रभाकर कुकडोलकर यांनी लिहिलेल्या `पुण्याचे पक्षीवैभव’ या पक्षीनिरीक्षकांसाठीच्या फील्ड गाईडचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 16/03/2011 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान ही विश्वास कल्याणकर यांचा धागा वाचल्यावर मला मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्स मधे आलेली लेखमाला आणि लोकप्रभामधील एका लेखाची आठवण झाली. हे लेख मी संकलीत करून ऑर्कुटवर एका समुहावर ठेवले होते.

रावसाहेब

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 14/03/2011 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
रावसाहेबांनी डोळे किलकिले करून बघितलं. आजूबाजूला कुणाची चाहूल नव्हती. अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी कूस बदलली. पडद्याच्या फटीतून सकाळची कोवळी किरणे रावसाहेबांना त्या थंड वातावरणात हवीहवीशी वाटणारी उब देत होती. म्हणजे, दिवस थंडीचे नव्हते, ती थंडी ए.सी.ची होती. मुंबईत राहून हिवाळा अनुभवायचा असेल तर एसी शिवाय पर्याय नाही हे त्यांना कळलं होतं. पुन्हा एकदा रावसाहेबांनी स्वतःला मऊ दुलईत गुरफटून घेतलं. मागचे काही दिवस हा त्यांचा नेहेमीचा उद्योग झाला होता. आताशा पूर्वीसारखे कुणी त्यांना सकाळी सकाळी उठवायच्या मागे लागलेले नसायचे. पूर्वी म्हणजे सकाळी घराचं जणू रणांगण झालेलं असायचं.

ग्रुहकर्ज ..एक अनुभव

लेखक नि३ यांनी गुरुवार, 10/03/2011 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या घर घर चालु आहे...प्रत्येक विकांत असाच पायपिट करण्यात व्यर्थ ...१ BHK घ्याव कि २ BHK.ह्या एरीयात घ्याव की त्या तिथे पलीकडे...दिनोदीन जमिनीचे रेट वाढतच आहे..ग्रुहकर्जाचे व्याजदर पण..काही दिवस आणखी थांबलो तर घर घ्यायची लायकी राहणार नाही आपली पुण्यात. आणि नाही हो करता करता ..शेवटी एकदाचा बुक केला ...

.... उचल ना फोन..

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 07/03/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसात जाताना असं होतं, कधी कधी माझा आणि बायकोचा वाद झालेला असतो, आम्ही तसेच ऑफिसला जातो, चेहरा लगेच कार्पोरेट झालेला असतो, पण आत काहीतरी बोलायचं राहिलेलं असतं, काहीतरी ऐकलेलं डोक्याच्या बाहेर निघायला तयार नसतं. टेबलवर फोन वाजत असतो, टॅण टॅ धॅन टॅ . voice call from **** टॅण टॅ धॅन टॅ .. मी फोन उचलत नाही तर सायलेंट करुन ठेवतो, पुन्हा ४-५ मिनिटांनी फोन टॅण टॅ धॅन टॅ . voice call f******* टॅण टॅ धॅन टॅ , आता चिडणारा दुसरा कोणितरी असतो पण डायलॉग तोच -'अरे उचल ना फोन ' . मी तरी ही फोन उचलत नाही.

"माफ कर, अरुणा.....पण नाही तुला दयामरण !"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी सोमवार, 07/03/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
कायद्यातील तरतुदीपुढे न्याय पीठासनदेखील हतबल होते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि गेली ३७ वर्षे जिवंतपणीच 'मरण' भोगत असलेल्या अरुणा शानबाग यांच्यावतीने लेखिका पिंकी विराणी आणि अनेक वकिलांनी केलेल्या "दयामरण" अर्जातील विनंती सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू आणि ग्यान मिश्रा यांच्या खंडपीठाने "कायद्यात तरतूद नाही" या मुद्द्यावर फेटाळून लावली. "दयामरण" हा भारतातच नव्हे तर जगात अनेक देशात वारंवार चर्चेला येणारा विषय आहे. त्याची कारणमीमांसा करण्याअगोदर आपल्या कायद्यातील एका तरतुदीकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

पत्रलेखन ... हरवत चाललेला ठेवा

लेखक शरद यांनी रविवार, 06/03/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. पंगुशेठ यांचा लेख वाचला आणि एक जुनी आठवण जागी झाली. त्यावेळी बराह, श्रीलिपी वगैरे उपलब्ध नव्हते. त्यामुळे पुण्याहून अमेरिकेतल्या आपल्या लाडक्या लेकीला ई-मेल पाठवतांना आईला इंग्रजीशिवाय पर्याय नव्हता. आणि हे माध्यम भावना, तळमळ कळवण्यास तसे निरुपयोगीच. मी एक सोपा उपाय सुचवला होता. एक साधा स्कॅनर घ्या, कागदावर स्वहस्ताने खरडलेले पत्र स्कॅन करा व द्या पाठवून. निदान दोघींनी तो मानला व त्याचा इतका उपयोग झाल्याचे दिसून आले की त्यांच्या मैत्रिणी घरी पत्र लिहावयाच्या व यांच्याकडे येऊन, ते स्कॅन करून, आपापल्या मुलींना "पत्र" पाठवावयाच्या.