Skip to main content

जीवनमान

यु मी और 'हम'............

लेखक राधा यांनी मंगळवार, 29/07/2008 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व वाचक मंडळीना नमस्कार. 'व्यक्ती आणि व्यक्ती'(२ भाग) व 'वाघ्या' या लिखाणानंतर आता थोडा काही वेगळ लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. आधीच्या प्रतिक्रिया वाचुनच हे लिखण करते आहे , म्हणुनच पुन्हा एकदा आपल्या प्रतिक्रियांची साथ हवी आहे. इतक्यातच काजोल आणि अजय देवगण यांचा ' यु मी और हम' पिक्चर बघीतला. तो कसा बनला आहे किंवा अभिनयाबद्दल मला नाही लिहायच हा पण त्याची 'कथा' मात्र मनात घर करुन गेली. 'alzimer'हा रोग झालेल्या एका स्त्री ला तिचा नवरा नव्हे ' जीवनसाथी' कसा आधार देतो ते यात दाखवले आहे.

लास्ट लेक्चर - प्रोफेसर रँडी पॉश्च

लेखक विकास यांनी शनिवार, 26/07/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
"जेंव्हा तुम्हाला जे हवे ते मिळत नाही, तेंव्हा जे मिळते त्याला अनुभव म्हणतात...हे जगणे म्हणजे फक्त तुमची स्वप्ने साकार करणे नव्हे तर ते आपण आपल्या जीवनाचे कसे नेतृत्व करतो, या संदर्भातील आहे. जर तुम्ही तुमचे आयुष्य योग्य रीतीने पुढे नेत रहाल तर तुमची कर्मे आपोआप बाकीच्या गोष्टींची (यशाची) काळजी घेतील. आणि तुमची स्वप्ने साकार होतील." - शेवटचे भाषण (स्वैर अनुवाद "लास्ट लेक्चर")
- प्रोफेसर रँडी पॉश्च, (Randy Pausch, October 23, 1960 – July 25, 2008), कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी.

आमच्या १० वी ची पंचविशी..

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 23/07/2008 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला क्रिकेटचा विश्वचषक जिंकून जितकी वर्षे झाली ना तितकीच वर्षं आम्हाला १० वीचा चषक जिंकून(की हारून?)झाली. त्यामुळे पेपराततल्या रौप्यमहोत्सवाच्या बातम्या वाचून आमच्या मित्रमंडळींना आठवण झाली की आपल्या १०वीने पंचविशी गाठली की! मग एकेकाचे विरोप यायला सुरूवात झाली.मागच्या २ ,३ बॅचनी १० वीची पंचविशी कशी कशी साजरी केली त्याची वर्णनं समजायला लागली.

अनमोल ठेव.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 21/07/2008 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा कर ! आज बरेच दिवसांनी मी "त्या" फाऊंटन पेन नी लिहिताना मागच्या आठवणी जाग्या झाल्या आणि या पेनामागची कथा तुम्हाला सांगाविशी वाटली.बघा तर वाचून .....

मिसळ

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 15/07/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal

बदल तर घडतोय...

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 14/07/2008 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
टीक-टॉक टीक-टॉक टीक-टॉक ठांग! लोलक, जागच्या जागी फिरतोय! लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट ठक्काक! मानव, जागच्या जागीच चालतोय! ठांग!. ठांग!!.. ठांग!!!... तरी ..बदल तर घडतोय... मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं! अखंड, अविरत... अथक!! बदल तर घडतोच आहे... क्षणा क्षणाला..कणा कणाने, वाढणार्‍या एव्हरेस्ट प्रमाणे! क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने, वितळणार्‍या हिमाद्री प्रमाणे! एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे, दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे! एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे... पुढे.. मागे.. जिथल्या तिथे! जिथल्या तिथे.. मागे..

नोटापुराण

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 14/07/2008 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी." "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना." मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसर्‍या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते :) काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे फाटलेल्या, जीर्ण होत चाललेल्या नोटाही वापरात ठेवल्या होत्या लोकांनी.

एक वादळ ..

लेखक आनंदा माने यांनी शनिवार, 12/07/2008 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक वादळ.. एक वादळ..थोडंसं अंधारात पडलेलं माहीत नाही कुणाला पण प्रत्येकात दडलेलं.. उठ शोध घे, तुझ्यामधल्या वादळाचा.. विसरून जा सारं मनाविरूद्ध घडलेलं.. अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं.. अंधार हो प्रकाश घे, सुर्य हो प्रकाश दे नव्या पालवीत विसरून जा एकेक पान झडलेलं निर्झर हो वाहून जा, झर-झर सारं पाहून जा खुळ्या हळव्या डोळ्यातून, कुठे पाणी होतोस अडलेलं.. आनंदा
Taxonomy upgrade extras