Skip to main content

जीवनमान

पुण्यात लव्हर्स पार्क!! मीमराठी

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 09/07/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
कही दिवसंपुर्वी TV वर एक चर्चा पाहिली... नाव होते "पुण्यात लव्हर्स पार्क! - असावी कि नसावी". अनेक लोक प्रतिक्रिया देत होते परंतु ज्या चैनल वर हा कार्यक्रम होता तो चैनल एवढा प्रसिद्ध नाही, त्यामुळे चर्चा एकाच भागात संपली... !! माझ्या मते लव्हर्स पार्क करणे हे काही प्रमाणात योग्य आहे. ( सामाजिक द्रुष्ट्या.. ) आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिले तर थोड्या अधिक सुधारणा आवश्यक असतील.. ! आता खरचं विचार करण्याची वेळ आलेली आहे... कारण तर सुज्ञांना माहितच आहे !! कृपया आपले मत नोंदवा... ह्या लेखांच्या प्रतिक्रियांवर मी रोज नजर ठेवून असेन.. !

शर्यत

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 09/07/2008 05:37 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून

काबूल ब्युटी स्कूल... डेबोरा रॉड्रिग्ज.

लेखक प्राजु यांनी रविवार, 22/06/2008 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
काबूल ब्युटी स्कूल , एका अमेरिकन स्त्रीने बुरख्या आडून घेतलेला शोध. लेखिका : डेबोरा रॉड्रिग्ज. अनुवाद : उषा तांबे. प्रकाशक : कॉनसेप्ट बुक्स, पुणे. मूल्य : १९५ रू. मंडळी, काबूल ब्यूटी स्कूल हे पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. मला मिळालं, आणि सहज चाळता चाळता मी ते झपाटल्यासारखं ४-५ दिवसांत वाचून काढलं. अफगाणिस्तानातल्या स्त्रियांच्यावर बरंच वाचलं आणि ऐकलं होतं. एस्केप फ्रॉम तालिबान या आणि अशा पुस्तकातून अफगाणी स्त्रीचं आयुष्य किती खडतर आहे हे थोडं समजलं होतं. पण काबूल ब्यूटी...

पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 22/06/2008 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत.

अ॑तर

लेखक शितल यांनी शनिवार, 21/06/2008 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
कविता अणि अमेय चा मुलगा मानस आज उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला रवानगा होणार होता. कविता आणि मानस पुण्याहुन मुबईला कॆब करून एअरपोर्टवर आले, अमेय त्याची वाट पहातच उभा होता. मानसने त्याच्या बाबाना पाहिल्यावर त्याना नमस्कार केला, आज ब-याच वर्षानी कविता आणि अमेय समोरा समोर होते आणि कोणाला काय बोलावे हे समजत नव्हते.