Dead Man's Hand - 2
"मालवणी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पेक्टर महाडीक बोलतोय..."
"साहेब, मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या उलट्या बाजूला एक मुलगी मरुन पडली आहे. तुम्ही लवकर या!"
महाडीक पुढे काही बोलण्यापूर्वीच फोन कट् झाला होता.
"च्यायला, पोलिसांना पूर्ण माहिती का देत नाहीत हे लोक? डिस्ट्रीक्ट, जीप काढा.. डिटेक्शनवाले कोणकोण आहेत बघा..."
सुमारे वीस मिनीटांत इन्स्पेक्टर घाटे, सब् इन्स्पेक्टर महाडीक, हेड कॉन्स्टेबल राणे आणि इतर चार शिपाई यांच्यासह सायरनचा आवाज करत पोलिस जीप मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या टोकाला येऊन थांबली.
मिसळपाव
