वलय (कादंबरी) - प्रकरण ५
प्रकरण ४ ची लिंक: http://www.misalpav.com/node/41834
----
प्रकरण 5
थोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली.
स्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती...
... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले.
रोहनचा भीषण अपघात तिला आठवला...
तिचे जीवनातले पहिले प्रेम - रोहन राठी!
मिसळपाव