कथा
डायरी
हे कस काय शक्य आहे?
मला अजूनही विश्वास बसत नाहीये.
पण मग मी आत्ता १५ मिनिटांपूर्वी पाहिलं ते काय होत?
But today it’s been 10 years.
म्हणून काय झाल, याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की मी जे पाहिलं ते खोट आहे.
माझ्याच डोक्यात चाललेली ही कालवाकालव माझाच अंत पाहते आहे. खर सांगू मला काहीच कळत नाहीये की मी खुश व्हायला हव की अचंबित.
अरे After bloody 10 years I just saw her with my own two eyes.
मला शहानिशा करन भागच होत की मी आत्ता जे पाहिलं ते खर होत की फक्त माझ्या मनाचे खेळ होते.
मी आत्ता हा इथे उभा होतो. काय करत होतो बर ??? हा बिल भरत होतो. कसलं बर?? आईला ह्या पोरीने वेड लावलाय.
मराठी दिन २०१८: मुलखावेगळी ‘पैज’ (ॲन्टन चेकोव यांची अनुवादित कथा - प्रमाण मराठी)
मुलखावेगळी ‘पैज’
मूळ कथा - ॲन्टन चेकोव (१८६०-१९०४)
१
रात्र टळून चालली होती. तो म्हातारा बँकर आपल्या वाचनालयाच्या खोलीत या टोकापासून त्या टोकापर्यंत येरझारा घालत होता, पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका रात्री त्याने दिलेल्या पार्टीच्या आठवणी मनात जाग्या करीत होता. त्या पार्टीला आलेल्यांत विद्वान मंडळी कमी नव्हती. विविध विषयांवर चर्चा रंगली होती. त्यातही विशेषतः ‘फाशीची शिक्षा असावी की नसावी’ याबाबत भरपूर चर्चा झाली. आलेल्या पाहुण्यांमधे कोणी उच्चविद्याविभूषित होते, काही पत्रकार होते, आणि बहुतेकांचा कल फाशीची शिक्षा नसावी याकडे होता.
मराठी दिन २०१८: टापा (मावळी)
टापा
सांगायचं म्हनश्यान तं गोश्टि जव्हा आम्हि सम्दि नयतर्नी व्हतो कनि ना त्या टायमाला तव्हाच्या ह्येत. रोज सवसान्चं भाकर खाउन्सनी आम्हि सम्दि गाबडी त्या बाळुनानाच्या बिरडिण्गीमो-हं जमुनसनी टापा झोडित बसायचो. तव्हर आम्च्या आइबापानि काय आम्हा खयसान्ना हाडळि आनुन धिल्या नव्ह्त्या. मंग आम्हाला काय राच्च्याला टायिमच टायिम घावायचा. राच्च्या येकदोन वाजेपोहत टापा चालु र्ह्यायच्या. कुढं याचंच माप काढ , कुढं त्याचीच रेवडि उडव. म्या कॉन्हची जिरावली, मपलि कोन्ह्या जिरावली ह्येच सान्गायच आन आयकायचं काम. निर्हा धिंगुड्शा आसाय्चा.
पुरस्काचे खारमुरे
कथा अाणि व्यथा
-------------------------अ
पुरस्काराचे खारमुरे
***************
अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला."
"चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला."
"त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज."
"आज काही विशेष?"
"विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज?
पुरस्काचे खारमुरे
कथा अाणि व्यथा
-------------------------अ
पुरस्काराचे खारमुरे
***************
अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला."
"चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला."
"त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज."
"आज काही विशेष?"
"विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज?
शेवटचा उपाय...
शेवटचा उपाय ...
मनीषा घोरपडे आपल्या खास मैत्रिणीच्या घरून निघाली तेव्हा चेहऱ्यावर हसू घेऊनच. खरच सगळ्या पुरुषांना बायका म्हणजे अबला ,त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी आपलीच आहे असे का वाटते? आज तिची मैत्रीण उज्वला निकम हिचा विवाह ठरला म्हणून उज्वालाने तिच्या घरी पार्टी ठेवली होती. मोजकेच लोक होते पण बहुतेक सगळे मनीषाला ओळखत होते .हा प्रकाश का असेच काही तरी नाव असलेला तरुण तिथे कोणीतरी नवीनच होता . मनीषाला तो ओळखत नव्हता. मान्य आहे की आज मनीषा खूप सुंदर दिसत होती.पावसाळ्याचे दिवस म्हणून तिने आज डार्क हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता.
रावणायन कादंबरीचा थोडक्यात आढावा
इंद्रायणी सावकार यांचे रावणायन नुकतेच वाचून झाले. मला आवडले. खूप छान आहे. आपण सुध्दा जरूर वाचावे. एक वेगळीच अनुभूती आपल्याला हे पुस्तक वाचून मिळेल.
रावणाबद्दल एरवी माहिती नसलेल्या गोष्टी तर कळतीलच पण वाली सुग्रीव आणि तारा यांच्यातील खूपच पराकोटीच्या गुंतागुंतीच्या प्रेम त्रिकोणाचे अद्भुत आणि सतत दोलायमान होणारे खेळ यात वाचायला मिळतील. तसेच तारा आणि मंदोदरी यांच्यातील मैत्रीची कथा या यात प्रकर्षाने पुढे येते.
रावण मंदोदरी यांची प्रेमकथा आणि प्रेम विवाह कसा झाला हे सुध्दा यात आपल्याला कळते.
फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : २
फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate Your Love..)
कथा – २
व्हॅलेंटाईन..
(प्रेमाची नवी नजर..)
ती- "त्या प्रसिध्द पुस्तकाच्या लेखकाने लिहिले आहे की,
' गुलाब आहेच असा सर्वाना आवडण्यासारखा.. पण प्रेमावर फक्त गुलाबाचीच मक्तेदारी का? कधी तरी मोगरा किंवा चाफ्यालाही उमेदवारी देऊन पहावी.. शेवटी सुगंधी ते पण आहेतच ना..!'"
तो- "बरोबरच लिहले आहे की मग.."
ती- "हो मान्य आहे ते पण मला सांगा प्रेमासाठी गुलाबाचं का निवडला असेल.. कारण पुष्पवर्गात तोच एकमेव असेल की ज्याला मिळवण्यासाठी काटेही टोचून घ्यावे लागतात.. म्हणजे प्रेम मिळवायचे असेल तर तुम्हाला अडथळे येणारच हेच सुचवले जात असेल गुलाबाकडून..
वेदांग शिरोडकर
प्रारंभ:
एच् ब्लॉक, रुम नंबर ११७. हॉस्टेलच्या ४-५ मजली इमारतीच्या तळमजल्यावर लोखंडी जाळीच्या गेटपासून पहिलीच रुम मी पसंद केली होती. भूकंप झाला तर सर्वात अगोदर इमारतीपासून शक्य तितक्या दूर धूम ठोकता यावी असा माझ्या लातूरकडच्या भूकंपकंपित मनाचा हिशेब त्यामागे होता. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठवाड्याचा कोटा कमी असल्यानं त्यामानानं चांगले मार्क असूनही मला उशिरा, म्हणजे दुसर्या यादीत, १-२ महिन्यांनी, हॉस्टेलरुम अलॉट झाली होती. रुमच्या लोकेशनवर मी खुष असलो तरी मात्र तिथला व्यत्यय नि वर्दळ यांच्यामुळं शिरोडकरला ती आवडत नसे.
मिसळपाव