अपहरण - भाग ७
भाग ६ - https://misalpav.com/node/51983
कर्नल एकटेच आपल्या केबिनमध्ये येरझारे घालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली यशाची मोहर दिवसेंदिवस दृढ होत होती. जगातल्या सर्वात सामर्थ्यशाली राष्ट्रावर त्यांनी मात केली होती. आधुनिक काळातील सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा त्यांच्यासमोर कुचकामी ठरली होती. त्यांची स्वतःचीच अफाट स्वप्नं फिकी पडावीत, इतकी संपत्ती आज त्यांच्याजवळ होती. तिच्या जोरावर मनात येईल ते पद त्यांना मिळवता आलं असतं. कदाचित त्यांना पूर्वेकडील एखाद्या देशावर राज्य करता आलं असतं.
मिसळपाव