खिडकी पलीकडचं जग भाग 2
भाग १ : http://www.misalpav.com/node/39159
भाग २
खूप दिवसांनंतर त्या दिवशी बाबा घरी आले ते एकदम उत्साहात. त्यांनी गौरीसाठी नवीन ड्रॉइंग बोर्ड आणला होता. अड्जस्टेबल होता तो. गौरीच्या सोयीप्रमाणे ती तो पलंगावर उभा किंवा आडवा ठेऊ शकणार होती. पण तो बघुनही गौरी शांतच होती. रात्री जेवायची वेळ झाली होती. आई-बाबा अलीकडे तिच्या बेड जवळच जेवायला बसायचे. त्याप्रमाणे तिघे जावायला बसले. त्यावेळी मात्र बाबांनी एक मोठी बातमी दिली.
"बेटा... मी माझी बदली करून घेतली आहे. आपण नाशिकला जातो आहोत." बाबांनी गौरीच्या मूडचा अंदाज घेत तिला सांगितले.
मिसळपाव