अशीच एक फँटसी..(१)
शॉपिंग मॉलचा मधला जिना चढताना अर्णवने आधी शर्टचा अन मग पँटचे दोन असे तीनही खिसे नीट तपासले. तिथे ती यादी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने आपले डोके तीन वेळा झटकले. मग त्याच्या (म्हणजे डोक्याच्या) मागच्या भागावर पालथ्या मुठीने तीन खारका मारल्या.
..इतके करून झाल्यावर त्याला पक्के कळून चुकले की सामानाची यादी खिशातून अन उर्मीने आणायला सांगितलेली तेरावी ( की सतरावी ?)वस्तू त्याच्या आठवणीतून, नेहमीप्रमाणे, हद्दपार झाली आहे.
मिसळपाव