Skip to main content

कथा

नाईट-ओव्हर!!!

लेखक वडापाव यांनी शनिवार, 11/01/2014 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टीच्या दिवसात आई-वडील गावाला निघाले की पोरं जाम खुश होतात... लगेच ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरांना फोनाफोनी होते. प्रत्येकाने किती किती पैसे काढायचे याचा एक अंदाज ठरतो. कोणकोणत्या मुलींना बोलवायचं(किंवा होस्ट मुलगीच असेल तर सोन्याहूनही पिवळं), कोणाला कटवायचं वगैरे बोलणी होते. प्रत्येकाचे आपआपल्या पसंतीनुसार आणि ऐपतीनुसार 'ब्रँड्स' ठरलेले असतात. कोणी नुकतीच भीष्म प्रतिज्ञा करून 'दारू सिगरेटला हात लावणार नाही' असा चारजणांचे ग्लास समोर भरलेले दिसल्यावर आपोआप ढळणारा अढळ निश्चय केलेला असतो.

अविस्मरणीय...

लेखक वडापाव यांनी बुधवार, 08/01/2014 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
हुकूमानुसार मी क्लासला बुट्टी मारून ऑन हर मॅजेस्टी'च्या सिक्रेट मोहीमेवर निघालो होतो(म्हणजे तिच्या घरी निघालो होतो). याआधी इतक्या मोहीमा झाल्या होत्या, पण तरीही 'कधीना कधी तरी आपण पकडले जाणारच' या भितीपोटी नेहमी गडाच्या पायथ्याशी (म्हणजे तिच्या सोसायटीच्या मेनगेटजवळ) आल्यावर छातीत धडधड सुरू व्हायची. तशी ती आजही सुरू झाली. पण 'डर के आगे जीत है, घर के अंदर अकेली मेरी प्रीत है' असं मनातल्या मनात म्हणत मी निधड्या छातीनं जीन्स सच्चिन-स्टाईलमध्ये अ‍ॅड्जस्ट करत सोसायटीत शिरायचो. सोसायटीचा विस्तार तसा ब-यापैकी मोठा होता.

भगवान जब लेता है छप्पर फाड के लेता है

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 07/01/2014 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
'आरं ते रम्या आलंय नव्हं,' 'आणि आलं का?,' 'म्हणजे लग्नाला मुलगी बघतोय माहीत नाय काय?,' 'लाय गावडळं हाय बघ,कोण देणार त्याला मुलगी,' 'आरं मुलगा कसला का आसना काम करणार पाहिजे,आणि हा तर शहरात वाँचमनी करतोय की,' 'ते बरोबर हाय पण याचं नशिब कसं फळणार,याच्या बरोबरची लगीन होऊन दोन दोन पोरं झाल्याती, आणि हा बसलाय हात हालवत,' आसे शिरर्क्या म्हणताना सर्व जण हासु लागले, या महिन्यात रम्यानं कारण नसताना चांगली पंधरा दिवसाची रजा काढुन गावी आला होता,पहिल्या पाच दिवसात त्यानं दोन मुली शेजारच्या गावात पाहिल्या,पण काही जुळले नाही.नेहमीप्रमाणे तो बाबाला हातबार लावण्यासाठी पिठाच्या चक्कीवर काम करी,मग वसंतराव ही रम

एक होती सगुणा

लेखक धन्या यांनी सोमवार, 06/01/2014 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती सगुणा. तिच्या नवर्‍याचे नाव ईश्वर. तिच्या नवर्‍याला आणखी एक बायको होती. तिचे नाव निगुणा. दोघींचंही आपल्या नवर्‍यावर खुप प्रेम होते. पण दोघींच्या प्रेमाची तर्‍हा मात्र पुर्णपणे वेगळी. सगुणेचा सारा भर असण्यावर आणि दिसण्यावर. ती आपले नवर्‍यावरील प्रेम आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून व्यक्त करायची. त्याला चांगलं चुंगलं करुन खाऊ घालायची. त्याच्याशी प्रेमाच्या गोष्टी करायची. तो समोर दिसला नाही की बैचैन व्हायची. निगुणेचं सारंच उलट. तिचं प्रेम करणं कुणाला दिसायचं नाही. कारण ती ते शब्दांमधून व्यक्त करायची नाही. नवरा सतत आपल्या समोर असायला हवा असा तिचा मुळीच अट्टाहास नसायचा.

छोटीसी मुलाकात प्यार बन गयी... २

लेखक वडापाव यांनी रविवार, 05/01/2014 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
छोटीसी मुलाकात प्यार बन गयी... योगायोगांबद्दल माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. संमिश्र म्हणजे, मला ते आवडतात सुद्धा, आणि त्यांचा रागही येतो. जेव्हा मी एखाद्या व्यक्तिचा सतत विचार करत असतो, ती व्यक्ती भेटत राहावी, समोर यावी अशी मनातल्या मनात प्रार्थना करत असतो, ती मुलगी समोर आल्यावर तिच्याशी मी कसा बोलेन, तिला कसा सामोरा जाईन वगैरे कल्पना रंगवत असतो, तेव्हा ती व्यक्ती कधीच समोर येत नाही.

नमिताचा क्लास (शतशब्दकथा)

लेखक आदूबाळ यांनी गुरुवार, 02/01/2014 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
कॉमर्सच्या बारावीला मार्कांचं एवढं काही कौतुक नसतं. तरी बोर्डात येणं भारीच! दहा मित्र-मैत्रिणींच्या ग्रूपमध्ये नमिताच बोर्डात आली होती. "माहेश्वरी आहे." कुळ्या म्हणाला. "कॉमर्सच्या बोर्डात नाही आली तर उपयोग काय मारवाडी असण्याचा?" सगळे जोरजोरात हसले. नमितासुद्धा, पण डोळ्यांत थोडी उदासी होती. बाकीच्यांना बरे मार्क होते तसे, भारी काही नाही. सीए करायचं. "झावरे" लावायचा, का "जोशी", का "अग्रवाल" हे ठरंत होती. नमिता एकटीच बसली होती, कडेला. क्लासचं विचारल्यावर म्हणाली, "काय पप्पा म्हणतील तसं..." आठवड्यातच तिची लग्नपत्रिका सगळ्यांना पोस्टाने आली. लातूरचा तेलाचा व्यापारी होता.

पायाखाली

लेखक arunjoshi123 यांनी सोमवार, 30/12/2013 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या काळात कोमट्यांच्या घरांत ब्राह्मण भाडेकरूच चालायचे, लिंगायतांच्या घरांत जंगम भाडेकरूच चालायचे, त्या काळात बाबूराव खंदारेंचा वाडा प्रचंड कॉस्मोपॉलिटन म्हणायला हवा. एक बाजूला कौलारू शेडमधे लिंगायत बाबूराव आणि त्यांच्या सप्तकन्या यांचे कुटुंब. दुसर्‍या बाजूला काँक्रीटच्या छताखाली चार वेगवेगळी कुटुंबे. एका छोटेखानी खोलीत आमचे ब्राह्मण कुटुंब, आमच्या मागे थोड्या लांब खोलीत वारकाचे बालाजीमामा, त्यांच्याशेजारी यलमाच्या जिंदगानीचे दोन खोल्यांचे कुटुंब. भाडे वाढले तसे त्यांनी एकच खोली ठेवली आणि त्यांच्यापुढे थोडे भिडस्त मराठे कुटुंब राहायला आले.

मिर्झा ग़ालिब...........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 30/12/2013 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मिर्झा ग़ालिब...........भाग-१ जेव्हा ग़ालिब दिल्लीत आला तेव्हा तो तसा तरुणच होता. म्हणजे त्याचे वय त्यावेळेस १९ असले तरीही कवी म्हणून त्याला थोडी फार प्रसिद्धी मिळाली होती. ती प्रसिद्धी पुढे वाढतच जाणार होती. पण त्याच्या लोकप्रियतेचे एकमेव कारण त्याचे काव्य नसून त्याचा स्वभाव हेही एक प्रमुख कारण होते.

भान

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 29/12/2013 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
'हे बघा तुमची मुलगी खुपच वेगळी वागते,'सासु म्हणाली, 'तुम्हाला म्हणायचे नेमके काय?एवढे दिवस काही नव्हते बरं ती काय नविन आहे का?,'मुलीचा बाप बापु म्हणाला, 'आता पर्यत खुप सहन केली, आता या पुढे जमणार नाही,'महेश मध्येच म्हणाला, 'बापु ह्याचं काही एकु नका हे तुमच्या समोर एक बोलतात आणि माघारी माझ्या समोर एक वेग़ळच बोलतात,'मुलग़ी ग़ीता म्हणाली, 'हो हो हो तुझावरच विश्वास ठेवतील बघ,शेवटी तुझा बाप,'सासु म्हणाली, 'आहो तसे नव्हे,दोघांचंही ऐकुण घेतोच की ,हे बघा महेशराव आतापर्यत देवाच्या आशिर्वादान ग़ोडी ग़ुलाबीन चालु होत, हो की नाय,'बापु हात करत, 'मग़ ह्या दोघाचं आता का पटंना?कारण दोघांनी ही एकमेकांना समजावुन घेत

गपचिप

लेखक आतिवास यांनी शनिवार, 28/12/2013 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची आई येकदम वाईट. च्या काय देत नाही कदी. ही मोटी मान्सं बरी च्या पित्यात. आमाला मात्र न्हाई. आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.” त्यादिशी पाटीलकाका आल्ते. आई च्या दिऊन बोलत बसली तितचं. मला म्हन्ली, “बेटा, तेवढी कपबशी आत नेऊन ठेव मोरीत. न फोडता ने.” आता पावणे होते; तेंच्यासमोर आईचं ऐकाया पायजे ना! वाईट असली ती तरी! पाटीलकाकांनी कपात उलिसा च्या तसाच ठुला व्हता. म्या पिऊन टाकला तो गपचिप. येकदम झ्याक. तवापासून आले पावणे, की उचल कपबशी ... प्या च्या..... पावणे नाय आले तर? म्या रस्त्यावर जाऊन कुणालाबी सांगतिया “आई-आण्णा बोलावत्येत” म्हनूनशान. आई करतेच च्या. म्याबी पिते. उलिसा. गपचिप.