कथा
जळक्या बोटांच्या मुलीच्या वहीची मायक्रो-गोष्ट
जळक्या बोटांची मुलगी धावतपळत बागेत येते.
आज आपल्याला उशीर तर झाला नाही ना, अशी शंका तिच्या मनात चुकचुकते आहे.
घाईघाईने ती इकडून तिकडे पळणारी मुलं, संथपणे एकेक पाऊल टाकत चाललेले आजीआजोबा, एकमेकांच्या हातात हात घालून रमतगमत फिरणारी जोडपी, या सगळ्यांमधून वाट काढत बागेच्या पश्चिम टोकाकडे येते.
तो अजून त्याच्या नेहमीच्या बाकावर बसला आहे. त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडतो.
त्याचा डोळा चुकवून ती हळूहळू तिच्या नेहमीच्या बाकावर, त्याला सहज दिसणार नाही पण त्याच्यावर लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी जाऊन बसते.
मावळत चाललेल्या सूर्याकडे एकटक बघत तो बसलेला आहे.
अचानक तो उठून उभा राहतो.
चिंता
''वंदनाला दोन दिवस फोन करत आहे पण ती उचलत नाही . mobile वर काहीच उत्तर येत नाहीये . तू जरा तिला फोन करून बघ ना. आणि मला कळव.''
मी केलेला फोन उचलला गे ला नाही तेव्हा वंदनाच्या मुलाला फोन केला .
काळी मावशी
माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते.
माझं कोकणातलं गांव :- भाग - २ धरणावरच्या बागेत ( छायाचित्रांसह)
माझं कोकणातलं गांव :- भाग - १
टीपः- वर्णन जरी माझ्या लहानपणीचे असले तरी सर्व छायाचित्र मी मे-२०१३ साली गावी गेलो होतो तेव्हा माझ्या मायक्रोमॅक्स एच. डी. ११६ मोबाईलने काढलेली आहेत. तेव्हा आताच्या जंगलापेक्षा तेव्हाचं जंगल अधिक घनदाट होतं, आता बेसुमार वृक्षतोड झालेली आहे.
मागील भागात>>मग सगळी मुलं पळत अंथरुणात झोपायला जायाची. धरणावरच्या बागेत जाताना काय काय पहायला मिळणार या धुंदित केव्हा तरी गाढ झोप लागायाची.
सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ४
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा)
भाग १ - http://misalpav.com/node/26930
भाग २ - http://misalpav.com/node/26938
भाग ३ - http://www.misalpav.com/node/26981
४)
आईचे छत्र हरवलेले, वडीलांचे घराकडे फारसे लक्षा नाही आणि अर्थिक परिस्थिती ओढाताणाची. अशा स्थितीत प्रकाश आपल्या दोन धाकट्या आणि अविवाहित बहिणींची काळजी घेत त्यांच्या व स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी धडपडत होता.
माझं कोकणातलं गांव :- भाग - १
झुकझुक झुकझुक अगीन गाडी,धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहुया, मामाला गावाच्या जावूया ||
हे गाणं लागलं की कि मनाला खरं तर काकाच्या गावापेक्षा मामाचं गावं (म्हणजे आजोळ) सगळ्यांना जास्त प्रिय असतो हे पटायला लागतं. पण मला मात्र दोन्ही गावे तेवढीच आवडतात. काकाचे गाव म्हणजे आमचेच घर सगळ्यात जास्त आवडते.
मला एकुण ८ मामा व एक मावशी (रा. दापोली)त्यापैकी चार गावाकडे राहिले, तर चार कळव्याला माझ्या आई बरोबर रहायला आले, जसजसे लग्न जमत गेले तेव्हा स्वःताहाचे बिर्हाड करित गेले. मग त्यांची समवयस्क मुले, मामा, मामी, आणि आम्ही सगळे गावाला कधी जायचे ह्याचे बेत ठरवण्यासाठी आमच्याकडे जमत असत. आम्ही लहान थोर मिळुन सगळेजण १९ जण होतो.(सन १९९५ पर्यंत सगळे उत्सव/ सण आम्ही एकत्र जमुन साजरे करित असु पण आता जमाना बदलला आहे. मामे भावु/ बहिणी,(सख्खी बहिण सुद्धा) सगळ्यांची लग्न होवुन आपापल्या संसारात रममाण झाली आहेत. त्यातुन टी.व्ही ने सगळ्यांनाच एकमेकांपासुन तोडलंय.)
अकबराचा मोबाईल हरवतो
अकबराचा मोबाईल हरवतो
नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती.
बिरबलाचे बादशाह अकबराकडे बारकाईचे लक्ष होते.
सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग २
भाग १ - http://misalpav.com/node/26930
२)
रघूवीर आणि मी सहकारी आणि मित्र होतो. त्याची कुणाशीही सहज ओळख, मैत्री होत असे. अनेक वरिष्ठ अधिका-यांशी त्याचे आपुलकीचे बंध निर्माण होत. त्यावेळी कार्यालयात स्त्री कर्मचारी फारशा नव्हत्त्या. पण बाहेर रघुवीर च्या अनेक मित्र-मैत्रिणी होत्या. त्याच्या कंपुतल्या (मी या कंपूत नव्हतो) एका मित्राने कॉम्प्युटर चा कसलासा क्लास लावला होता. रघूवीर कधी त्याला क्लासजवळ भेटायला जाई. त्यातून क्लास मध्ये शिकवणा-या प्रणिता मॅडमशी त्याचा परिचय झाला. प्रणिता हळूहळू त्याच्या कंपूत सामील झाली.
सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा
"दिल से निकलने वाली रस्ते का शुक्रिया... दिल तक पहुचने वाली हर डगर को सलाम"
लता च्या आवाजातल्या या ओळी , "बाली उमरको सलाम" हे गाणं ऐकलं की मन वेगळ्याच विश्वात जातं. अनेक आध्या-अधू-या प्रेमकथा आठवू लागतातं.
अनेकदा मनात आलं की या कथा एकदा लिहून काढाव्यात पण ते प्रत्यक्षात उतरलं नाही. आता ते करावसं वाटतंय. अर्थात कितपत जमेल ते माहीत नाही. पण प्रयत्न करणार आहे.
या सगळ्या मी जवळून पाहिलेल्या गोष्टी आहेत. (काही माझ्याही आहेत). सगळ्या अधू-या प्रेमाच्या. यात माझी कल्पनाशक्ती फक्त नावे बदलण्यापुरतीच वापरणार आहे.
मिसळपाव