कथा
एक हरवलेली मैत्री..
वैताग वैताग आहे हा पाऊस, नेमके घरातून बाहेर पडायच्या वेळी दारात हजर. जा रे जा रे पावसा तुला देतो पैसा, पण ऐकतोय कसला. जरा कमी झाला तर निदान रिक्षास्टॅंड पर्यंत तरी जाता येईल. उगाच तेवढ्यासाठी म्हणून छत्री रेनकोट सांभाळायची झंजट नकोय. बाकी एकवेळ ते परवडेल, पण एकदा का हिची कधीपासून सांगतेय गाडी घ्या ची कॅसेट सुरू झाली की गाडी घसरलीच म्हणून समजा. उगाच मूडचा कचरा नकोय. किती दिवसांनी आज मस्त आऊटींग प्लॅन केलीय. मप्टीप्लेक्समध्ये सिनेमा, त्यानंतर मॉलमध्येच थोडीफार विंडो शॉपिंग, डोळे आणि मन भरून पावले की उदरभरणाची सोय जवळच्याच ओपन रेस्टॉरंटमध्ये.
घुसमट
कॊम्प्युटरच्या पडदयाआड चेहरा लपवून
मी तुझ्या खुर्चीकडे मोजून सोळाव्या वेळी बघतो.
खुर्ची अजूनही रिकामीच आहे.
आज गुरुवार.
गुरुवारी सकाळी तू मोहक नवीन केशभुषेत येत असतेस!
आज जरा जास्तीच वाट बघायला लावते आहेस.
तुझे आकर्षक रेशमी केस
प्रत्येक गुरुवारी त्यांनी धारण केलेली जानलेवा रुपे!
त्यांचे नवनवीन रंग.
कधी हलका सोनेरी
कधी पिंगट तपकिरी,
कधी मधूनच एखादी चुकार
बंडखोर रंगाची बट रेखलेली
कधी भुरभुरणारे कोरडे, मोकळे सोडलेले
कधी वेट लुक मधाळ, नजर चिकटवून ठेवणारे
तुझ्या प्रत्येक नवीन रुपाने
पुन्हापुन्हा खल्लास होणारे
ऒफ़िसमधले माझ्यासारखे अनेक जीव,
त्यांच्याकडे तू दुर्लक्षच करतेस.
पण तरीही आशेने त्याती
कहाणी राजपुत्राची
कहाणी राजपुत्राची
आटपाट नगर होत. नगराचा राजा होता. राजाला लेक होता. खावे प्यावे खेळावे हा त्याचा नित्यक्रम होता. एके दिवशी त्याजकडून आगळीक घडली. सवंगड्यांबरोबर खेळतांना त्याचा पाय नागावर पडला. नागानं त्याला शाप देवून क्षणात जंगलात पाठवलं.
घनदाट जंगलात राजपुत्र रानोमाळी भटकू लागला. कंदमुळं खावून जगू लागला. कोणी माणूस दिसतो का याची चाहूल घेवू लागला. होता होता कित्येक वर्षे गेले.
असाच भटकत असतांना त्याला एका झर्याच्या काठी एक साधू दिसला. इतक्या दिवसांत कुणीतरी भेटले याचा त्याला आनंद झाला.
सेकंड लाईफ - भाग ३
सेकंड लाईफ
सेकंड लाईफ - भाग २
---------------------------------------------------------------
मेकींग ऑफ "भाऊसाहेब दत्तू पाटील"
आय.टी. मध्ये असल्यामुळे शनिवार रविवार सुट्टयाच असायच्या. भाऊसाहेब दत्तू पाटील बनायचे तर ह्या मोकळ्या कालावधीचा उपयोग करावा लागणार होता. दर शनिवार-रविवार घराबाहेर राहायचे तर बायकोला काही ना काही पटणारे कारण सांगणे भाग होते. दरम्यान मला नुकताच रु. ३० हजार इन्सेन्टीव्ह मिळाला होता जे मी अजून बायकोला सांगीतले नव्हते. आता ती वेळ आली होती.
सेकंड लाईफ - भाग २
सेकंड लाईफ
आता तसं बघीतलं तर माझे आयुष्यातला सेकंड लाईफ हा भाग एखाद्या हिंदी थ्रीलर पे़क्षा मुळीच कमी नाही. पण चित्रपटात २.३०-३.०० तासांत वेगवान घडामोडी घडतात त्याच वेगाने खरोखरीच्या आयुष्यात घडत नाहित.
सेकंड लाईफच्या विश्वात जाण्याअगोदर मी तुम्हाला माझ्या फर्स्ट लाईफच्या फ्लॅशबॅकमधे घेऊन जाणार आहे.
मी पहिल्यापासूनच थोडासा अबोल, सहजासहजी माणसांत न मिसळणारा आहे. थोडासा रिझर्वच म्हणाना !
सेकंड लाईफ
नमस्कार ! मी योगेश.
ही कथा आहे माझ्या सेकंड लाईफ ची. लहानपणापासूनच मला वाचनाची फार आवड. इतकी मी ठरवूनच टाकले की मोठे झाल्यावर आपण पेपरस्टॉलच टाकायचा. का ? तर धंद्यापरीस धंदा होईल आणि सगळे पेपर, मासिके, दिवाळी अंक फुकटात वाचता येतील. मराठी लेखक वाचता वाचता नंतर कंटाळा येऊ लागला. पुढे पुढे तर मला इंग्रजीतुन मराठीत अनुवादीत झालेल्या कादंबर्याच आवडू लागल्या. त्यातल्या त्यात गुप्तहेरांच्या रहस्यमय कथांनी तर माझ्या मानाची पुरतीच पकड घेतली. त्यातील हेरांचे दुहेरी जगणे मला हळुहळू आवडू लागले.
फुस्स...
दत्तुमामा आलेत.
म्हंजे आमच्या आत्याचा नवरा.
आमच्या तीन आत्या.
एक पुन्याची. हे तिचे नवरे.
दुसरी तिकडं फालटन का काय तिकडं.
तिसरी मेली. कधी? म्हायती न्हाई.
म्या तिला बघिटलीचं न्हवं.
दत्तुमामा खाऊ आन्तेत.
म्याबी तांब्या भरूण पानी देते त्यास्नी पेयाला.
आय चा करत व्हती.
म्या येकलीच व्हती त्यांच्यासंग बोलाया.
दत्तुमामा म्हन्ले, “कितवीला तू आता?”
दर बारीला हेच विचारतेत.
दिवाळीला आलते, तवा मी पयलीत व्हते.
आताशिक सकरात आली जवळ.
मंग आताबी पयलीतच –हाणार की!
म्या दामटून म्हन्ली, “तिसरीला”
दत्तुमामा म्हनले, “वा! छान, अभ्यास कर हं, मोठी हो”.
येकदम फुस्स !
हे आयकत न्हाईत कायी.
वाड्यात.... १
मराठे दूर गेली त्यानंतर वर्षही संपलं होतं, वर्ष संपलं होतं म्हणून कॉलेज संपलं आणि बाय डिफॉल्ट बेकारी सुरु झाली होती. त्या वर्षी कोणत्याही मुलीकडे मी बघितलं सुद्धा नाही. पुन्हा ते सगळं सुरु झालं म्हणजे..?
मराठे दूर गेली म्हणून जाधवही दूर गेला आणि पाप्याही. शत्रूंचीसुद्धा सवय होते अशी विचित्र जाणीव झाली.
गावात बसून काय करणार म्हणून आम्ही पोरंही शहरात आलो. आमच्यासाठी शहर म्हणजे येऊन जाऊन पुणे अन मुंबई.
शहरात कुठेतरी कॉम्प्युटर शिकायचा असा प्लॅन होता.. परांजप्या आणि मी दोघेही एमसीए आणि तसल्या एंट्रन्स देऊन मार खाऊन बसलो होतो.
मिसळपाव