वरदान
वरदान
संध्याकाळचे सहा वाजले की माझी पाऊलं अपोआप हॅाटेल सवेराकडे वळतात. आज पण मी समोरचे कागद बाजूला सारून, कपडे करून बाहेर पडलो. माझ्या नेहमीच्या हॅाटेलच्या मध्ये जाऊन चहा पीत बसणे हा माझा आवडीचा टाइम पास होता. ह्या हॅाटेलची रचना मोठी सुरेख आहे. काही टेबल आंत होती तर काही बाहेर मोकळ्यावर. ज्याची जशी आवड त्याप्रमाणे लोक बसत असत. मी नेहमी बाहेर एका ठरलेल्या जागी जाऊन बसतो. ह्या जागेवरून रस्त्यावरची रहदारी अगदी सहज नजरेस पडते. मी येईपर्यंत शेट्टी त्या टेबलावर रिझर्वची पट्टी लाऊन ठेवत असे. माझ्यापासून शेट्टीच्या हॅाटेलचा खास फायदा होत असेल असे नाही.
मिसळपाव