भावंडांची गुप्त भाषा
अण्णा,आबा,दादा,कमाआते आणि आप्पा ह्या पांच भावंडांची एक गुप्त भाषा होती.लहान असतानाच त्या सर्वानी तयार केली होती.जशी एक "चकारी" भाषा आहे.ही चकारी भाषा बहुतेक सर्वांना माहित असावी.
उदा.
तुला माहीत आहे का?
हे वरील "चकारी"भाषेत म्हटलं जाणार
"चलातू चहीतमा चहेआ चका?"
मला तू सांगू नकोस
"चलाम चतू चंगूसा चकोसन"
काल त्याच्या आईला पाहिलं
"चलका चच्यात्या चईलाआ चहिलंपा"
अशाच प्रकारची पण थोडी वेगळी भाषा होती.आणि ही भाषा त्यानी त्यांच्या आईला आणि वडिल- नानांना- कळू नये आणि आप आपसात खाजगीत बोलायला मिळावं, म्हणून तयार केली होती.
एकदा काय झालं अण्णा आणि दादा सावंतवाडीहून वेंगुर्ल्याला आप्पांच्याच"सावंतव
मिसळपाव