Skip to main content

कथा

मुखवटा (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी बुधवार, 28/04/2021 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
मुखवटा (गूढकथा) खरेतर मी हे असे, घटनांचे ओझे घेऊन मिरवायला नको होते. किती वेळ! किती काळ! मी हे ओझे वागवणार होतो? शेवटी प्रत्येक गोष्टीला एक सीमा असतेच ना. मलाही आता त्या घटनांचा, त्या घटनांभोवतीच्या त्या बऱ्या वाईट जाणिवांचा त्रास व्हायला लागलाय. माझ्या सहनशक्तीच्या बाहेर, त्या जाणीवा जाऊ लागल्या आहेत. माझ्यासारखा सामान्य माणूस, या घटनांचा काय अर्थ लावू शकणार आहे? एका बंदिस्त वर्तुळापुरते मर्यादित असणारे माझे मन, त्या घटनांवर मंथन करण्याएवढे प्रौढ होते का? खरे तर माझ्या आसपास घडणाऱ्या घटना, त्या वर्तुळाच्या एकदम बाहेरच्या असाव्यात.

आमचीबी आंटी जन टेस

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/04/2021 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमचीबी आंटी जन टेस गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं. त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला. या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

होबार्टचं भूत

लेखक सरिता बांदेकर यांनी रविवार, 25/04/2021 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
होबार्टचे भूत सौ सरिता सुभाष बांदेकर फ्लाईट होबार्टला लॅंड झालं,चेक ईन् बॅग नव्हतीच त्यामुळे लगेच बाहेर पडायला मिळेल असं वाटत होतं. एक्झिटच्या दिशेने बाहेर पडताना एक कुत्रा जवळ येऊन घुटमळायला लागला, त्याच्या मागोमाग एक ॲाफिसर हजर. सर, मॅडम जरा बाजूला चला.त्या ॲाफिसरचे शब्द ऐकल्यावर आम्हाला काही कळेचना की याला आपल्या बॅगमध्ये कसला वास आलाय. बॅगची चेन उघडून कुणी काही टाकले तर नाही??पण तेव्हढ्यात त्यांनी सांगितले तुमच्याकडे काही खाण्याने पदार्थ आहेत का?? तेव्हा हसावे का रडावे तेच कळेना. मग मी त्यांना सांगितले की होय आमच्याकडे क्रोसॅंट आणि फ्रूट्स आहेत.

सेकंड लाईफ - भाग ८

लेखक अक्षरमित्र यांनी मंगळवार, 20/04/2021 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
२-३ आठवड्यांनी येऊन घर बघेन असे सांगून पुन्हा मुंबईस आलो मात्र लवकर परत जाणे शक्य झाले नाही. एकातून दुसरे, दुसर्‍यातून तिसरे अशी कामे वाढतच चालली होती. गया फिर आज का दिन भी उदास कर के मेरी अशी अवस्था झाली होती. दर वेळेस तृप्तीशी, आई बाबांशी खोटे बोलणे जीवावर येत होते. मात्र सेकंड लाईफ जगण्याची उर्मी वारंवार मनात येत असे. त्या स्वप्नाचा पाठलाग करणे अवघड होत चालले होते. मात्र एप्रिल च्या शेवटी पुन्हा संधी चालून आली. तृप्तीच्या मावस बहिणीचे मे महिन्यात लग्न होते त्यामुळे तिला १५-२० दिवस अगोदरच गावी जायचे होते.

मिपाबाजार

लेखक बापूसाहेब यांनी सोमवार, 19/04/2021 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/48684 इथे प्रतिसाद म्हणून लिहिणार होतो. पण मूळ लेखापेक्षा प्रतिसाद मोठा व्हायला लागला त्यामुळे नवीन जिलेबी पडायची ठरवली. कोरोनाकाळात आमच्यासारख्या विंडो शॉपिंग करणार्या लोकांचे हक्काचे ठिकाण म्हनजे मिपाबाजार.. या बाजारात हर तऱ्हेची दुकाने आहेत. पण आजकाल काही दुकादारांकडून गोंधळ घातला जात असल्याने मिपाबाजार नेहमीचं गजबजलेला असतो. बाजारात १८८ नंबर ला जे दुकान आहे ते दुकान एकदम मस्त आहे. प्रत्येक प्रकारचा माल तिथे मिळतो.. एक प्रकारचं D MART च म्हणा ना. अगदी कोणत्याही वस्तूचे नाव घ्या तिथे ती मिळणारच.

जादूगार (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी रविवार, 18/04/2021 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
  जादूगार (रहस्यकथा) गतकाळात घडलेल्या काही घटनांचे पडसाद, तुमच्या अंतर्मनात असे काही उमटलेले असतात की, त्यांच्यापासून तुमची सुटकाच होऊ शकत नाही. आता हेच बघा ना, इतर लोकांना जादू, जादूचे खेळ, ती जादू करणारा जादूगार किती आवडतात! अगदी मनापासून! अगदी तन मन हरपून ते जादूचे खेळ पाहतात. पण माझे तसे नाही. मला जादूगार अजिबात आवडत नाही. आणि त्यांचा तो जादूचा खेळ तर, मुळीच नाही. उलट या अशा जादूगाराबद्दल, मला अतिशय घृणा वाटते. सरसकट सगळे जादूगार हे धोकेबाज, कावेबाज आणि मतलबी असतात, अशी माझी पक्की धारणा आहे. ते तुम्हाला कधी फसवतील, कधी तुमच्यासोबत धोकेबाजी करतील, याचा नेम नाही.

फिरुनी नवी जन्मेन मी..........

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी मंगळवार, 13/04/2021 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
फिरूनी नवी जन्मेन मी….! समोरचं फाटक उघडलं, आणि आमची गाडी बापटांच्या बंगल्यात शिरली. प्रशस्त दिमाखदार वास्तू , जणू हसून स्वागत करत होती. खूप मोठी जागा, अन् तेवढाच मोठा बगीचा...! एप्रिल महिना असल्यानं, मोगऱ्याचा वास सर्वत्र दरवळला होता. रंगीबेरंगी फुलांची छोट्या झुडपांवरची नैसर्गिक सजावट लक्ष वेधून घेत होती. मन अगदी प्रसन्न झालं. पोर्चमध्ये गाडी थांबली, आणि आम्ही तिघं उतरलो. श्रीराम बापट, हे एक प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिक, आणि माझे पती नचिकेत साने हे यशस्वी उद्योजक..! काही महिन्यांपूर्वी पाटणकर डॉक्टरांच्या मुलाच्या लग्नात या दोघांची ओळख झाली होती.

तो कोण होता? (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 12/04/2021 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या दोघांची भेट घडणे हा निव्वळ योगायोग असेल, असे मी अजिबात म्हणणार नाही. तो योगायोग असूच शकत नाही. योगायोगाने जुळून येणाऱ्या गोष्टी, एवढ्या समर्पक असूच शकत नाहीत. बहुतेक एखाद्या अदृश्य शक्तीनेच आम्हाला एकमेकांशी भेटवले असणार. पण एक गोष्ट कबुल करेन मी, या आमच्या भेटीचे सर्व श्रेय त्यालाच जाते. तोच माझ्याकडे आला होता. अगदी अनाहूतपणे. तो मला भेटला! बोलला! तेव्हा मला जाणवले की, त्याचे मला भेटणे किती जरुरीचे होते. त्याची भेट मी आयुष्यभरात कधी विसरेन, कधी तो विस्मरणात जाईल असे होणारच नाही. त्या एका भेटीत मला तो किती अचंबित करून गेला? हे केवळ माझ्या अंतर्मनाला माहीत.

गोष्ट सांगा गणित शिकवा... 7

लेखक राजा वळसंगकर यांनी गुरुवार, 08/04/2021 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुमची सावली "गायब" होईल! (पुण्यात - 13 मे रोजी दु. 12:31 वा.) Fake news? खाली लिंक्स आणि सविस्तर माहिती दिली आहे. ************************** "ओ शी*" ... अचानक सगळे बंद पडल्यामुळे सायली आणि चिंट्या चांगलेच चिडले. क्वचितच वैतागणारा सॅमी देखील स्वतःला आवरू शकला नाही. डोळ्यावरचा 3D हेडसेट मधे फक्त काळोख दिसत होता... लाईट नाही गेले, मी ब्राउजर बंद केला... नेहाने हळूच सांगीतलं... रागीट नजरा आता नेहाकडे वळल्या. 3चा अलार्म वाजला, आपलं ठरलं आहे थांबायचं म्हणून... नेहाने सफाई दिली...

पणजीच लुगडं (भाग-२)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 06/04/2021 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
https://misalpav.com/node/48608 रात्र झाली.जेवण आटोपली.विभाला झोपच येतच नव्हती ,पणजीच नाव काय,कशा होत्या त्या ?