मोगँबो -१
ए मोगँबो आला रे……….. मोगँबो आला रे.
मागच्या बेंचवरून आवाज आला. वर्ग एकदम शांत झाला.
आत्तापर्यंत चाललेली गडबड एकदम खेळताना दोन बोटे रोखून कोणीतरी स्टॅच्यू म्हणावे आणि ऐकणाराने जागीच आहे त्या अवस्थेत थिजून जावे तशी थिजून गेली.
म्हणजे मीना आणि संध्या हातात कसलेसे कागद घेऊन एकमेकींचे पाठांतर तपासत होत्या. संजना बॅग मधून रंगीत कागदाचे तुकडे काढून चिकटवत होती. झिपर्या उर्फ पक्या प्लेअरवर गाणी मागे पुढे करत क्रम लावत होता. गण्या वहीत खर्चाची बिले आणि हिषेब जुळवत होता. हिषेब लावताना कसलीशी आकडेमोड करत होता. मधूनच तो कोणालातरी प्रश्न विचारत होता.
मिसळपाव