Skip to main content

कथा

धाड

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी सोमवार, 20/04/2020 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा. चिमुलवाड्यावर बहुतेक सर्वच घरांत बायका आपल्या कोवळ्या पोरांकडून ''ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा" बोबड्या आवाजात वदवून घेत होत्या. मॉन्सून पूर्व कामांच्या नावाखाली दिवसातून कमीत कमी ४-५ वेळा लाईट जाण्याचे प्रकार सुरु होते. भरलेले गटार समजून उसपण्याच्या नावाखाली खोदलेल्या चरित १ -२ दारुड्यांनी आपापले पाय मोडून घेतले होते ! "उनासाठी खूप झाला, आता पावसासाठी लवकरच ह्या छत्र्यांचा वापर होउदे रे देवा"- अशी प्रार्थनाच बहुतेक लोक करीत असावे. बाकी मागच्या वर्षीच्या गरमीपेक्षा ह्या वर्षीची गर्मी जरा जास्तच आहे असे प्रत्येकाला वाटत होते.

परवड !

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शनिवार, 18/04/2020 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
तो एक शनिवार होता. राजाभाऊ साठे, दामलेंच्या श्री सीता-राम बुक डेपोत कामाला असत. शनिवारची सुट्टी असून सुद्धा आज दामल्यांनी त्यांना फोन केला व दुकानावर येऊन नवीन आलेली बुके दाळावयास व त्यांचा हिशोब करण्यास सांगितल्याने झक मारीत त्यांना दुकानात जावे लागले होते. दुकान म्हणजे तसें जवळही नव्हते. दुकानात पाऊल ठेवण्यासाठी त्यांना फॉण्ड्यावरून ३० किमी. दूर पणजीला जावे लागायचे. रोजच्याप्रमाणे राजाभाऊ पणजीला जायला निघाले. वाटेवर जाताना त्यांनी साधलेंच्या दुकानावरून रोजचा पेपर घेतला व राशी भविष्य असलेले वर्तमानपत्राचे दुसरे पान उघडले.

धात्री (भाग 2) (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 17/04/2020 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
'धात्री' ही महाभारतातील तसं म्हंटल तर खूप महत्वाची व्यक्तिरेखा. पण काहीशी दुर्लक्षित! अर्थात मृत्युंजय मधल्या धात्रीच्या उल्लेखातून मला सुचलेली ही कथा. मागील शुक्रवारी या कथेचा पहिला भाग इथे लिहिला होता. त्याची माझ्या ब्लॉगवरील लिंक इथे देत आहे. दुसरा आणि शेवटचा भाग देखील इथे लिहिते आहे. https://jyotijinsiwalealavani.blogspot.com/ ------------------------- धात्री (भाग 2) (शेवटचा) राजकुमारीच्या उत्साहाने भरलेल्या आवाजामुळे मी काही क्षण स्थब्ध झाले. परंतु ऋषी दुर्वास कसे आहेत याची राजकुमारीला कल्पना नसावी असा माझा कयास होता.

शटडाऊन

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी गुरुवार, 16/04/2020 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
थंडी संपून उन्हाळ्याचे संकेत देणाऱ्या थोड्याश्या गर्मीचे दिवस होते. कामतकाकांच्या जुन्या घड्याळाने दहाचा टोला दिला आणि तेवढ्यातच बरोब्बर १०:३० ला होणाऱ्या देवकीकृष्णाच्या आरतीला सुरुवात झाली. वास्तविकतः कामत काकांचे अर्धा तास पाठी असलेले पिढीजात घड्याळ कोणाचाच हात पोचणार नाही अश्या उंचीवर त्यांच्या आज्याने लटकवले होते. ते निखळवून सारखे करण्यास म्हणून खास अनंत मेस्तास स्टूलाची आर्डर दिली होती. पावसात दार उघडताना व बंद करताना खालून लागत होते ते नीट करण्यास जो अनंत आला नाही त्याचे स्टूल इतक्यात कुठे पोचणार !

मोगँबो - ८ ( अंतीम)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 16/04/2020 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
सारंग जे काही म्हणत होता ते किती प्रॅक्टीकल होते ते यावेळेस तरी त्याला माहीत नव्हते पण ते करायचे होते हा ठाम निर्धार त्याच्या बोलण्यातून सरांनाही जाणवला. ज्योतीने ज्योत पेटवावी तसा तोच निर्धार प्रत्येकाच्या मनात आला होता. आजचा आणि उद्याचा दिवस हे महत्वाचे आहेत प्रत्येकजण मनातल्या मनात स्वतःला सांगत होता. आयुष्याला कलाटणी देणारे दोन दिवस.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46438 आजचा दिवस कसा जाणार आहे याचा विचारच मनात यायला वेळ नव्हता. दिवसात फक्त चोवीस तासच का असतात.

बुचाचे झाड

लेखक भागो यांनी बुधवार, 15/04/2020 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या घराच्या दाराशी एक बुचाचे झाड आहे.हे झाड मी माझ्या लहानपणापासून बघत आहे. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी अंगणात त्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा सडा पडलेला असे. आम्ही मुले ती फुले गोळा करून त्यांचा हार किंवा वेणी बनवत असू. पण काही दिवसापूर्वी एक गंमतच झाली. मी सकाळी उठून खिडकीबाहेर बघतो तर काय. बुचाच्या फुलांचे ते झाड गायब! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. वाटले मी झोपेत तर नाहीना. असे कसे होऊ शकते .एवढे मोठे भर भक्कम झाड एवढासाही मागमूस न ठेवता नाहीसे होते म्हणजे काय ? मी स्वतः एक प्रथितयश लेखक आहे. तो देखील रहस्यकथांचा!

The बाल्कनी

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 15/04/2020 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
का कुणास ठाऊक पण नभ दाटून आले होते आणि वारा तुफान वहात होता. आभाळाच्या छताखाली एक कागद उंचच उंच उडत होता. मी त्याच्याकडे बराच वेळ पाहत बसलो. मग शेवटी कंटाळलो. नंतर बऱ्याच वेळाने पुन्हा बाहेर आलो. एक कुत्र्याचं लहानसं पिल्लू रस्त्यावर मनसोक्त बागडत होतो. मी बराच वेळ पाहत बसलो. पण शेवटी कंटाळलो. तसा फारसा वेळही जात नव्हता. आणि मी आळसावलो होतो. गेल्या दोन दिवसांत काहीच न लिहीता आल्याने पुरता वैतागलो होतो. नंतर बऱ्याच वेळाने पुन्हा बाहेर आलो. बाल्कनीत एक कागद पडला होता. चांगला होता कोरा करकरीत. आता हाच वापरू म्हणून मी तो उचलला.

मोगॅबो-८

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 14/04/2020 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी पक्या गण्या आणि संध्या सकाळी जॉगिंग पार्क वर सरांना भेटतो. आणि तुम्हाला फोन करतो. चला आता उद्या सकाळी भेटूया." सकाळी काय होणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण तरीही सगळेच एका ठामपणा ने उठले. घरी जाऊन झोप येणार नव्हतीच .सकाळी मोगँबो सरांना भेटायचे होते. प्रश्नांला थेट भिडायचे होते. मागील दुवा http://misalpav.com/node/46406 फाईव्ह गार्डन च्या सेंट्रल गार्डन पहाटे इतकी गर्दी असू शकते यावर विश्वास बसणे जरा कठीणच जाते. सकाळी सहा वाजता इतकी माणसे इथे काय काय करतात. कोणी सुलटे चालतात कोणी विरुद्ध दिशेने चालतात. कोणी हात वर करून चालतात.

हैदोस [18+]

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 11/04/2020 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
बी.डी. चाळीच्या कोपऱ्यावरची शेवटची खोली आहे तिथे वारा खूप थंडगार सुटतो. म्हणूनच मालकाने आम्हांस तीच खोली देऊ केली. आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतले. त्यांचे आभारच मानायला हवेत. तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा. सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा. कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने 'आराम' सदासर्वकाळ ठरलेला असायचा. मोजून दोन अडीच तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखेरीज अन्य काम नसल्याने मन विटाळून गेले होते. तसे दिवसभर चौपाटीवर भटकण्यातही मजा राहिली नव्हती. तर त्या दिवशी भुर्जीचं पार्सल आणून खोलीवर निवांत आस्वाद घेत होतो.

धात्री

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 11/04/2020 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
(मृत्युंजय मधल्या धात्रीच्या उल्लेखातून मला सुचलेली ही संपूर्ण काल्पनिक कथा तुमच्या समोर मांडते आहे. 'धात्री' ही महाभारतातील तसं म्हंटल तर खूप महत्वाची व्यक्तिरेखा. पण काहीशी दुर्लक्षित!) धात्री माझे पती अधिराज मला लग्न करून शूरसेन महाराजांच्या मथुरा नगरीमध्ये घेऊन आले त्यावेळी मी केवळ बारा-चौदा वर्षांची होते. गावाची वेस ओलांडतानाच मला माझ्या मातेने जवळ घेऊन कानात सांगितले होते;"धात्री, पुत्री, आज मी तुला तुझ्या नावाचा अर्थ सांगते.