Skip to main content

कथा

स्वप्नाला पडली भूल

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 10/05/2020 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नाला पडली भूल उन्हाची चूल. दे चंद्रभाकरी थकल्या जीवा. रानीचा वणवा ताटावर ओणवा…. एकलाच गातो जोगी थकलेले गूढ मंत्र… एकटाच चेतवी जाळ थकल्या सांजवेळी स्मरणाचे पाप जाळीतो लावून आग.. स्मरणाचा कचरा होतो आशेची होते राख. गुंतून जीव जातो. मरण भयातच रमतो. कृष्ण तेथे येतो. भुईकडे नाळ मागतो. जाळून इतिहास कंदीलात आज मी स्वर्ग पाहिला. काचेवर काजळीने प्राक्तन उमटवून गेला वाटसरू कोण येवून गेला. वाटेला फुटले काटे मोहरली वाटे काया डोळ्यात काजळमाया. …………….. चकोर शाह.

कवी होण्याच्या चार सोप्या टिप्स

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 10/05/2020 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आज मी आपणाला कवी कसे बनावे याच्या चार सोप्या टिप्स देणार आहे. होतकरू तरूणांना यांचा निश्चित फायदा होईल. अनेकांना कविता लिहायची इच्छा असते. पण ती लिहावी कशी हे मात्र कळत नाही. त्यांच्यासाठी या टिप्स फार उपयोगी ठरतील. पहिली टिप : सुरुवातीला आपल्या मनातल्या भावना मुक्तपणे वाहू द्या. मनात येतील ते शब्द कागदावरती लिहून घ्या. तीन चार शब्दांची एक ओळ करा. आणि त्या ओळी एकाखाली एक लिहा. अभिनंदन! तुमची पहिली कविता तयार आहे. याला मुक्तकविता असे नाव देऊन कुठेही चिपकवा. दुसरी टिप : यमकांचा सराव. आपला शब्दसाठा वाढवा. कोणत्या शब्दाला कोणते यमक योग्य जुळते याचा सराव करा.

सुटकेस ६

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 09/05/2020 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठलो. चांगले प्रसन्न वाटत होते. आंघोळ वगैरे करून काऊंटरवरच्या म्हाताऱ्याला हिशोब दिला. आणि रस्त्यावर आलो. एका हॉटेलमध्ये फाफडा की काय तसले खाल्ले. आणी वडापने अहमदाबाद ला जायला निघालो. दोन अडीच तासांचा प्रवास मोठ्या मुश्कीलीने काटला. काल रात्री आपल्या हातून भयंकर गोष्ट घडली. गांज्याच्या नशेने माणूस एवढे उत्तेजित होते? काही कळेना. कदाचित माझ्याच मनात आतमध्ये कुठेतरी असे काही करायची सुप्त ईच्छा दडली असावी. पण पुन्हा असल्या फंद्यात पडायचे नाही असे मनोमन ठरवले. वडाप अहमदाबादमध्ये घुसले तसे रोख चारशे रूपये देऊन उतरलो. आळस झटकून तोंड धुतले. आणि एक हॉटेलमध्ये नाष्टा केला.

श्री सो.डी.माहात्म्य - द्वितीय अध्याय

लेखक अभिदेश यांनी शनिवार, 09/05/2020 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
श्री सो.डी.माहात्म्य -- द्वितीय अध्याय आटपाट नगर होतं. नगरजन खाऊन पिऊन सुखी होते . दर पाच वर्षांनी तिथे नवीन राजा राज्यकारभार सांभाळी . थेट लोकांमधून राजा निवडला जाई. लोकांना कारभार नाही आवडला तर ते नवीन राजा निवडू शकत होते. अशी सगळी आदर्श राज्यकारभाराची पद्धती होती. जणू रामराज्यच. एकदा काय झालं , लोकांनी एका नवीनच स्वर्णकेशी नामक राजाला निवडून दिलं . त्याने निवडून आल्या आल्याच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली.

पिंजऱ्यातली अंबा

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 08/05/2020 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारतातली अंबा! श्रीखंडीच्या शरीरातील स्त्रीमन अंबा! माझ्या कल्पनेतील तिच्या मनाची ही कथा. पिंजऱ्यातली अंबा हो! मी अडकले आहे या पिंजऱ्यात. तुम्हाला नाही कळणार ते... कारण तुम्हाला अंबा म्हणजे पितामह भीष्मांच्या मृत्यूचे कारण होणारी स्त्री! इतकेच माहीत आहे. अर्थात त्या अनुषंगाने माझ्याबद्दल महाभारतात जे सांगितलं आहे; ते देखील माहीत असेलच. मी काशी राजाची ज्येष्ठ मुलगी. माझ्या दोन भगिनी अंबिका आणि अंबालिका. ज्यांनी काहीही न बोलता हस्तिनापूरचे महाराज विचित्रविर्य यांच्याशी विवाह केला. आम्हाला जिंकून आणलं होतं हस्तिनापुराचे रक्षणकर्ते पितामह भीष्मांनी...

श्री सो.डी.माहात्म्य

लेखक अभिदेश यांनी शुक्रवार, 08/05/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
श्री सो.डी.माहात्म्य अध्याय पहिला कैलास पर्वतावर शंकर पार्वती बसलेले आहेत. मुलं सुद्धा त्यांच्या त्यांच्या उद्योगात . समोर नंदी नेहेमीप्रमाणे आळसावलेलाय . आज अचानक पार्वतीला प्रश्न पडलाय, म्हणाली " हे नाथ, हे मी काय बघतीये. गेले काही दिवस अचानक पृथ्वी वरचे मळभ हटलंय . सगळं कसं स्वच्छ , सुंदर , निर्मळ. हे अचानक असं कसं काय घडलं नाथ ? " शंकरांच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित उमटलं.

सुटकेस ५

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 08/05/2020 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस ४ ----------------------- स्टेशनला गेलो आणि गाडी पार्क केली. मग तोबा गर्दीत सलीमची वाट बघत बसलो. तिकीट काऊंटरच्या आसपास भटकलो. साला नक्की कुठे असेल या विचारात असतानाच तो पुढे येऊन टपकला. "चलो.." म्हणून मला सोबत येण्याची खूण केली. मी त्याच्या मागे मागे एका उड्डाणपूलाखाली अंधाऱ्या जागेत गेलो. तेथे एक भिकारी भीक मागत बसला होता. त्याच्याकडून कसलीशी पिशवी त्याने उचलली. आणि " ये ले" म्हणून माझ्याकडे दिली. "क्या है इसमे..?" मी पिशवी चापचत विचारले. आतमध्ये तर जुने फाटके कपडे कोंबून बसवले होते. "कोकेन.." तो शांतपणे म्हणाला.

श्वेत साडी (एक कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 07/05/2020 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या सुळक्याच्या त्या कड्यावर तो उभा होता. गावाशेजारी तो विस्तीर्ण कडा पसरलेला होता. कड्याची अवघड आणि घनदाट वाट तुडवत तो इथपर्यंत आला होता. आपल्याला इकडे येताना कोणी पाहू नये याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती. आपल्या मरणानंतर आपला मृतदेहही कोणाला सापडू नये अशी त्याची मनोमन इच्छा होती. तो द्विधा अवस्थेत इथपर्यंत आला. कड्याच्या टोकावर पोहोचेपर्यंत त्याचा आत्महत्येचा निश्चय पक्का झाला होता. तो आत्महत्या का करतो? कशामुळे करतो? एवढ्या टोकाचा निर्णय त्याने का घेतला? याची सगळी उत्तरे त्याच्या मनात तयार होती.

सुटकेस ४

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 07/05/2020 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस ३ ------------------------ ह्रदयाचे ठोके धडाधड पडत होते. डोक्यात घण वाजत होते. जीवन आणि मृत्यू मध्ये असल्यासारखे हे क्षण अगदीच पछाडून सोडत होते. गाडीला किक मारून मी शंकराचे एक प्रशस्त मंदिर आहे तिकडे निघालो. संकटकाळी आता तोच वाचवणार! धूप, उदबत्त्या, फुले यांनी मंदिर अगदी दरवळून गेले होते. भाविक भक्तीत तल्लीन होऊन शंकराचे दर्शन घेत होते. आणि मी एका दगडी खांबाला टेकून उदासवाणा बसलो होतो. एका उजळ चेहऱ्याच्या साधूने मला खायला प्रसाद दिला.

[शशक] प्रोजेक्ट डेमो

लेखक SaurabhD यांनी बुधवार, 06/05/2020 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला तर माहितीच आहे ... कथा पूर्णपणे काल्पनिकच आहे. वस्तुस्थितीशी ह्याचा अजिबात काहीही संबंध नाही ... आणि देव करो, आणि कधीच काही संबंध येऊ पण नये ... बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहातच ... –--------------------------------------------- "सर, एकदा बघून घ्या, प्लीज" "तुम्हाला कितीवेळा सांगितलं, आपण अशा डिझाईनवर काम करणं खूप पूर्वी सोडलं आहे. ह्या प्रकारचं डिझाईन तितकंसं परिणामकारक होत नाही. एकदा झालं आहे ना बघून आपलं !" "हो सर. तुम्ही सोडलं असेल, पण मी नाही !