Skip to main content

कथा

निसटणं आणि टिकणं (लघुकथा)

लेखक लेखनवाला यांनी गुरुवार, 25/06/2020 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
तलावाच्या शहरातल्या तलावापैकी हा एक तलाव, अगदीच छोटेखानी, त्यांचे खोलवरचे सगळे पाण्याचे झरे विरत चालेले, हल्लीच तलावाच्यावरुन एका उडडाणपूलाचं बांधकाम झाल्यापासून तर तिथल्या पाण्यात सूर्यकिरणं यायला वावच राहिला नव्हता, या असल्या वातावरणात तिथं तंग धरु शकतील असे वनस्पतीजीव, जलचराचं मात्र यामुळे फारच हाल होतं होते.

दोसतार - ५६

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 25/06/2020 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
. एल्प्या डाव्या बाजूला गेला. अंदाजा प्रमाणे आदर्शचा दम संपायला लागलाय. तो परत फिरणार आता. तरीपण जाताना जमले तर पाहुया म्हणत आदर्शने हात फिरवला. एल्प्याने त्याचा हात चपळाईने पकडून ओढला. आदर्शचा तोल गेला. तो बाजूच्या रेषेच्या बाहेर गेला. अगोदर आम्हाला कळालेच नाही. पण बाहेर बसलेल्या टीमने है.म्हणत मैदान डोक्यावर घेतले. एका गुणाने आम्हाला निसटता विजय मिळाला होता. सातवी क ने एकदम शेवटपर्यंत झुंजवले . पुढची मॅच . आठवी ड बरोबर. मागील दुवा : http://misalpav.com/node/47076 आठवी ड सोबत मॅच तशी अवघड होती . त्यांचे गडी आडदांड होते.

दोसतार - ५५

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 24/06/2020 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
"काय शिकवतात म्हणजे! रेड कशी मारायची. पाटी कशी दाबायची. बोनस कसा मिळवायचा पटात घुसून रेडरला कसा उचलायचा. सगळं दाखवतात. कबड्डी कबड्डी म्हणताना दम कसा टिकवायचा. ते पण शिकवतात.सोप्पे नाहिये ते. मंडळातला नर्‍या गायकवाड आख्खी दोन मिनिटे दम टिकवतो. अजिबात श्वास सोडत नाही." आता इतर सगळे खेळ बाजूला पडले. वर्गाची कबड्डी ची टीम . त्यात कोणकोण असणार आणि प्रॅ़क्टीस कधी करायची यावरच सगळे बोलणे एकवटले
मागील दुवा : http://misalpav.com/node/47071 कोण कोण ? हा एक मोठा प्रश्न . कारण कबड्डीला निदान बारा खेळाडू लागतात.

शेवटची चूक.

लेखक Jayant Naik यांनी मंगळवार, 23/06/2020 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटची चूक. प्रेम माणसाला किती असहाय बनवते नाही का ? आता माझ्या सारखा मध्यमवयीन माणूस आणि तो सुद्धा लंडन मधील एक प्रथितयश डॉक्टर असा कसा काय वागू शकतो? मी म्हणजे डॉक्टर राहुल.माझे लग्न झालेले आहे आणि एक अतिशय प्रेमळ आणि सुंदर बायको आहे मला .एक गोड मुलगी सुद्धा आहे. तीन वर्षाची . त्यांना जर हे सगळे कळले तर ते काय म्हणतील ? मी काही कामासाठी पुण्याला आलो आहे इतकेच त्यांना माहित आहे. माझ्या बायकोला माझे लग्ना आधीचे प्रेम माहित आहे . मी लग्ना आधीच तिला रीना बद्दल सांगितले होते. रीना. तिचे नाव घेतले तरी अजून पोटात कालवाकालव होते. तिला सुद्धा असेच होत असेल का ?

दोसतार -५४

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 23/06/2020 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
"एका टीमच्या बॅट्समन चा उडालेला कॅच दुसर्‍या टीमचा फिल्डर पकडायचा. अशा वेळेस औट द्यायचा की नाही हेच समजत नाही. गावसकरच काय पण टोनी ग्रेक आणि सोबर्स ही असल्या मॅच खेळले नसतील. इतक्या सगळ्या नियमात बसवून क्रिकेटच्या मॅचेस घ्यायच्या शाळेला अवघड वाटणार नाही तर काय ! मागील दुवा http://misalpav.com/node/47063 शाळेनं हा विचार केलेला असणार अज्या संज्या संदीप गार्‍या सगळे मिळून या वर्षी कोणता खेळ असेल हेच बोलत होतो. अज्याचे म्हणणे की प्रत्येक खेळाला समान न्याय द्यायला हवा, "एखाद्या वर्षी फुटबॉल एखाद्या वर्षी हॉलीबॉल असे काहितरी ठेवायला हवे.

दोसतार - ५३

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 22/06/2020 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
येन रुम नपाम्रधु थेये. येन रुक नपाद्यम थेये.. मराठी वाक्य उलटीकडुन वाचत त्याने संस्कृत म्हणून लिहीले होते. अभ्यंकर बाई शब्दार्थ शोधत होत्या. मागील दुवा http://misalpav.com/node/47052 घटक चाचणी नंतर सगळ्यांना वेध लागलेले असतात ते गॅदरिंग चे. गॅदरिंग हा प्रत्येका साठी वर्षातला महत्वाचा दिवस. सणच म्हणूया ना. गॅदरिंग होणार ही चर्चा कोणं सुरू करते हे समजत नाही. पण लहान भुरभुरीने पाऊस सुरू व्हावा आणि मग तो सगळीकडे पसरत जावा तसे गॅदरिंगची चर्चा वर्गावर्गात सुरू होते. य्हात महत्वाचे असते म्हनजे मागच्या वर्षी कोणी काय केले होते ते.

टिक टिक

लेखक श्रीगणेशा यांनी रविवार, 21/06/2020 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
मेकॅनिकल घड्याळ म्हणजे मोठा कुतूहलाचा विषय. माझ्या बालजिज्ञासेत भर पडली ती वडिलांना घड्याळाची सर्जरी करताना पाहून. सर्जरीच म्हणावी लागेल त्याला. डोक शांत ठेवून आयग्लास मधून एकटक पाहत धारदार चिमट्याने घड्याळातील स्प्रिंगच्या डबीतून स्प्रिंग जराही न वाकवता अलगद वेगळी करणे आणि दुरुस्त करून परत जशीच्या तशी ठेवणे ज्याला जमले त्याला कदाचित एखादी मेंदूची शस्त्रक्रियाही लीलया जमून जाईल. मनगटी घड्याळ म्हणजे गुंतागुंतीचं मशीन अगदी त्यांच्या इंग्रजी ब्रँड नावांसहित... एचमटी, हँडो सांडो, राडो, फावर लुबा, इत्यादी. हे कानावर शब्दशः 'पडलेले' शब्द, लहानपणी जेवढे वेचून ऐकले तेवढेच लक्षात राहिले.

जीजी

लेखक सौन्दर्य यांनी रविवार, 21/06/2020 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. कित्येक वेळा छोट्या छोट्या घटना, गोष्टी आपल्याला आपल्या पूर्वायुष्यात नेतात. ह्या घटना एखाद्या दिव्याच्या बटनाप्रमाणे असतात, बटन दाबले की लख्ख प्रकाश पसरतो तसे आपल्याला काहीतरी अचानक आठवते. जीजी म्हणजे माझी आजी, तिच्या विषयीची खालील आठवण ही अशीच एका रेडिओ प्रोग्रॅमवरून जागृत झाली. जीजी आज सकाळी ऑफिसला येताना एन.पी.आर. रेडियोवर (ह्युस्टनचे लोकल रेडिओ स्टेशन) एक ‘स्टोरी कोर’ नावाचा कार्यक्रम ऐकला. तसा तो दर शुक्रवारी ब्रॉडकास्ट होतोच म्हणा पण आज ऐकायचा योग आला.

दोसतार -५२

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 20/06/2020 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
घरी संस्कृत गोष्टींचे पुस्तक नव्हतेच. आज्जीची पुस्तके होती पण ती देवाची होती. त्यात गोष्टी नव्हत्या. हरिविजय , गोपिकाष्टकम , महाभारत रामकथासार अशी होती. आणि आज्जीला त्या गोष्टी माहीत होत्या आई ती पुस्तके वाचायची पण तीला त्यातील गोष्टी माहीत नव्हत्या. नाही म्हणायला संगीत मंदारमाला नावाचे एक नाटकाचे पुस्तक होते पण ते मराठीत . संस्कृत नाही. कुठेतरी सापडायलाच हवी संस्कृत गोष्ट. मागील दुवा http://misalpav.com/node/47035 संस्कृत पुस्तके दुकानात पण मिळत नाहीत. जी काही मिळतात ती श्लोक आणि कसल्याशा पुराणांची.

राजयोग - १७

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 19/06/2020 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१५ राजयोग-१६ *** अनेक व्यक्तीगत कारणांमुळे पूर्ण करायची राहून गेलेली ही मालिका सर्व वाचकांची माफी मागून पुन्हा सुरु करीत आहे. सर्व रसिक वाचक मोठ्या मनाने मालिकेला पुन्हा प्रतिसाद देतील अशी आशा आहे. या भागात फक्त भाग सोळा आणि पंधराची लिंक देते आहे. पंधराव्या भागात अनुक्रमणिका असल्याने मागचे भाग सहज उपलब्ध होतील. या काळात ही मालिका पूर्ण करावी म्हणून प्रोत्साहन देणार्या सर्व मिपाकरांचे अनेक आभार.