Skip to main content

कथा

दोसतार- ५१

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 17/06/2020 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
जाधव मामा म्हणजे एकदम आयडीयाबाज. आरसे पण असे बसवलेत की खुर्चीत बसलेल्या माणसाच्या समोर आणि मागेही आरसा लावलाय. समोरच्या आरशात मागचा आरसा दिसतो. बसलेल्या माणसाला पुर्वी त्याच्या डोक्याची मागची बा़जू दाखवायला हातात वेगळा आरसा धरून दाखवायला लागायचे. आता त्याला समोरच्या आरशात मागचा आरसा दिसातो. जाधव मामांनी मागच्या " दाढी कटींग चे पैसे रोख द्यावेत असे उल्ट्या अक्षरात लिहून घेतले आहे. .

दोसतार - ५०

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 16/06/2020 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
छाती भरून आली . आपण खरेच शिवाजी महाराजांचे कोणीतरी सैनीक आहोत असे वाटत होते. त्याच धुंदीत घरी आलो. रात्री मामा ,आईला सांगत होता. विन्याला या दिवाळीत किल्ला करता येणार नाही म्हणाला म्हणून मुद्दाम हा किल्ला दाखवला. गण्या एल्प्या टंप्या मी आमच्या मनातली दिवाळी कधीच संपणार नव्हती.
दिवाळीची सुट्टी संपली . शाळा सुरू झाली. सुट्टी संपल्याच्या म्हणजे शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी शाळेत पटकन जावे आणि अजिब्बात जाऊ नये असे आलटून पालटून दोन्ही वाटत होते. वस्तु ज्या स्थितीत आहे त्याला त्या स्थितीत रहावेसे वाटते. हा न्यूटनचा नियम इथेही लागू होतो.

दोसतार - ४९

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 11/06/2020 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोण काय म्हणेल त्याला म्हणु देत म्हणत. आपल्या मनातल्या मनात हसण्याने ही ती शांतता मोडायची. ही शांतता डबीत साठवून ठेवता यायला हवी. आपल्याला हवी तेंव्हा बाहेर काढून अत्तरासारखी श्वासात घेता यायला हवी. खूप वेळ गेला सगळे गप्पच होते. कोणालाच ही शांतता मोडावेसे वाटत नव्हते. दरीतून येणार्‍या वार्‍यामुळे आमच्या चेहेर्‍यावर आलेला घामही थंडगार झाला. झेंड्याच्या दगडी बुरुजावरून खाली दरीच्या उतारावर पुढे समोर दरीच्या मधोमध दिसणार जयगड तानुमामाने दाखवला .

बालकथा: रामूची हुशारी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 10/06/2020 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
बालकथा: रामूची हुशारी एक छोटे गाव होते. त्या गावात रामू नावाचा पोरका मुलगा राहत होता. जवळचे कुणीच नसल्याने तो एकटा राहत होता. बारा तेरा वर्षांचा रामू कोण कुठला कुणालाच माहीत नव्हता. तो सार्‍या गावाचाच मुलगा झाला होता. गावात मिळेल ती कामे तो करायचा. कुणाची गुरे चारून आण, बांधावरचे गवत कापून दे, कुणाचे धान्य पोहचवून दे तर कुणाच्या घरची इतर कामे करून दे असले वरकाम करून तो पोट भरे. गावकरीही त्याच्या एकटेपणाची जाणीव ठेवून होते. त्याचा स्वभावही मनमिळावू आणि पोटात राहून जगण्याचा होता. असेच एकदा त्याला एका आजीने जळणासाठी लाकडे तोडून आणण्यास सांगितले.

बोहेमिअन रॅप्सडी

लेखक स्टार्क यांनी मंगळवार, 09/06/2020 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
'ती आली, त्यांनी पाहिलं आणि ते हसले' फॉल सेमिस्टरपासून सुरू झालेल्या आमच्या फिलॉसॉफी क्लासचं हे एका वाक्यातलं वर्णन! एव्हाना रंगीबेरंगी फॉल सीझन संपून पांढर्‍याफटक हिवाळ्याने माझ्या शहराला - इथकाला आणि आमच्या युनिवर्सिटीला कह्यात घेतले होते. जणू शरदाचे सप्तरंग शिशिराने अलगद आपल्या पांढर्‍या बर्फात गोठून ठेवावेत आणि मग मन भरले की ते वसंताच्या हवाली करून निघून जावे. मला नेहमी वाटे....आमच्या ईथकातला शरद ऋतू म्हणजे अगदी एखाद्या मुरलेल्या चित्रकारासाराखा... सुबक आकारांमध्ये मोजून मापून रंग भरणारा....आणि रंगांच्या छटा एवढ्या अगणित की बस्स!

गनिमी कावा

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 08/06/2020 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
``तू पहिल्यासारखा राहिला नाहीस.`` पहिल्याच वाक्यानं त्याचं कामातलं लक्ष उडालं. ``आता काय झालं?`` त्यानं काळजीनं विचारलं. ``काही नाही. जाऊ दे.`` तिनं दोनचार तोंडवाकडे, लालबुंदे, भुवईउडवे इमोजी टाकले. अशा प्रसंगी काय करायचं असतं, हे त्याला लग्नाच्या दहा आणि व्हॉट्स अपच्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर नीटच माहीत झालेलं होतं. ``अगं सांग ना, काल तुला फोन केला नाही, त्याचा राग आलाय का तुला?`` ``कालचं काय विशेष? हल्ली फोनच करावासा वाटत नाही तुला! चॅट करायलाही वेळ नसतो!`` ``….`` ``आता काही बोलणार नाहीस, माहितेय मला. मी इकडे एकटी असते, सगळं घर सांभाळते, काही कुरकुर न करता.

दोसतार - ४८

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 07/06/2020 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अशा सहा उदबत्त्यांची एक मोठी माळ करायची. आणि पलंगाखाली ठेवायची. सहव्या उदबत्तीच्या शेवटच्या टोकाला मोठ्ठा दंड्या फटाका वातीला बांधून ठेवायचा. सहावी उदबत्ती शेवटच्या टोकापर्यंत यायला सकाळचे पाच साडेपाच होणार. दंड्या फटाका उडणार. येवढा मोठा दंड्या फटका अगदी पलंगाखाली ढाम्म करून उडाल्यावर कुंभकर्णाला सुद्धा जाग यायला पाहिजे. मागील दुवा http://misalpav.com/node/46878 लवकर उठायचे म्हणून कुंभकर्णाला जाग आणायचा गजर स्वतःसाठीच लावल्यावर झोपी गेलो. आपल्याला सकाळी तानुमामाच्याही अगोदर नक्की जाग येणार . तानुमामा सकाळी काहितरी गम्मत करणार म्हणतोय.

येडा होण्याआधी..

लेखक रातराणी यांनी शनिवार, 06/06/2020 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
*** ही कथा लिहली होती त्याला आता बरोबर दोन वर्ष झाली. जेम्स वांड यांची मुक्कामी यष्टी अन संगीचा दृष्टांत ही कथा वाचल्यावर खूप आवडलेली. त्यातला येडा हा येडा का झाला असेल असा विचार करता करता, तो आणि ओरिजिनल कथेत कमी फुटेज मिळालेली संगी यांच्यावर सुचलेली ही गोष्ट. जेम्स वांड यांनी ही पात्रं वापरण्याची परवानगी तर दिलीच शिवाय कथा वाचून काही बदलही सुचवले. त्याबद्दल त्यांचे अनेक आभार. पण अनेक कारणांमुळे ही कथा लिहिणे बारगळलेच. ती आता शेवटी नेटाने पूर्ण करून प्रकाशित करीत आहे.

केस ऑफ माय ओन मर्डर

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 05/06/2020 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
जवाहर नगर.गोरेगाव पश्चीम रोड नंबर नऊ , बीट नंबर दोन. निदान पोलीस स्टेशनच्या बाहेर च्या पाटीवर तरी हेच नाव होते. एरवी ही पाटी नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी पोस्टर होर्डिंग ने च्या मागे लपलेली असते त्यामुळे कोणाला दिसत नाही. लोकल कॉर्पोरेटर आणि गल्लीतील भावी नेते यांची ही तर हक्काची जागा. मनाचा राजा , राजासारखे मन. गल्लीतील भावी नेते. पप्पू भाऊ . दिनके आगे रात है हम तुम्हारे साथ है. अशा काही घोषणा लिहीलेले बोर्ड दिसायचे. आता कापडी बोर्ड जाऊन फ्लेक्स आले इतकाच काय तो फरक गेल्या दहा वर्षातला. कधी कधी गम्मत व्हायची.

बेचव बकवास

लेखक शेर भाई यांनी सोमवार, 01/06/2020 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यात आधी मिसळ-पाव हॉटेलामध्ये आमच्या सारख्या पामरास आपला ठेला लावू दिल्याबद्दल हॉटेल मालकांचे आभार. या हॉटेलात आमचे हे तिसरे पुष्प. पुष्प ते पण हॉटेलात, sounds weird, म्हणून आपण ह्याला तिसरा गार-बकवास-बेचव-वडा म्हणूया. आता या हॉटेलामध्ये जी बरीच गर्दी असते, आणि ती दर्दी पण असते, अस म्हणतात. आम्ही पहिल्यापासूनच बरेच उपदव्यापी. एकदा फिरता फिरता एका “उद्योगी मराठी माणसांच्या उत्थानासाठी आयोजित” होऊ घातलेल्या खाद्य-महोत्सवात गेलो होतो. तिथे आयोजक दादांपैकी एक दादा आमचा मित्र निघाला. त्याने विचारले तुम्ही घेणार का एखादा Food Stall चालवायला? तिथे आमच्या Madam नी आम्हाला लगेच spot-approval दिल.