Skip to main content

कथा

दुपारची झोप

लेखक लेखनवाला यांनी बुधवार, 06/05/2020 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
सणवाराला सकाळपासून चालेली जेवणाची लगबग पोटात कावळे जमा करतं…मिनिटामिनटाला आवंढे गिळणं चालू होतं…पण अजूनही तुम्ही भूकेच्या तटावर उभे राहत निमूटपणे सहनशक्तीशीं निकराची लढाई करत असता….कधी एकदा नैवदयाचं ताट देवापुढं ठेवलं जातयं, आणि तुम्ही जेवताय असं होऊन जातं…जीभेचं तातकळणं सुरु व्हायला लागतं…पण अजून अवकाश असतो… जेवणाच्या तयारीची लगबग सुरु होते एकदाची… तुम्ही स्वयंपाकघराच्या बाहेर उभे राहत नुसताच कानोसा घेत असता…. जसाजसा एकएक जिन्नस एकमेकांत घुसळत जातो, आगीचा धग अजून एकात एक मसाल्यांच्या चाललेल्या सरमिसळीला आपला-आपला रंग चढवत चाललेला असतो…आपल लक्ष कुठं दुसरीकडे लागतचं नसतं….

राक्षसमंदिर!

लेखक अज्ञातवासी यांनी सोमवार, 04/05/2020 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रकाशित! ©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे. ||प्रारंभ|| रटरटत्या उन्हात मल्लापाची भट्टी अजूनच रसरसली होती. कोळशाना वारा घालण्याचं काम अम्मा करत होती. "अम्मा, पाणी मिळेल काय?" अम्माने वर बघितले. आडव्या गंधाच्या रेषा ओढलेल्या, काळाकुट्ट चेहरा तिच्या समोर उभा होता. "हं." अम्मा हुंकारली, आणि आत गेली. त्या माणसाने तिथेच ठाण मांडलं आणि त्याच्या जवळची पोतडी उघडली. पोतडीतून त्याने एक डबी काढली. तिच्यातून चिमूटभर तंबाखू घेऊन त्यात चुना मिसळला. ती तंबाखू हातावर खसाखसा मळली.

दोसतार - ४४

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 04/05/2020 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
टंप्या असा काही बोलला असेल यावर विश्वास त्याचा स्वतःचाही बसणार नाही. पण मुख्याध्यापक सर सांगताहेत म्हणजे तो खरेच तसा बोलला असेल हे नक्की.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46560 शिक्षक दिनाला बक्षीस मिळाले म्हणून आईला काय आनंद झाला. तीने मीठ मोहरी ने माझी दृष्टच काढली. मुद्दाम उतरवून टाकलेली मीठ मोहरी चुलीत टाकली. मीठ मोहरी उतरवून टाकणे म्हणजे काय ते कधीच समजत नाही. पण ती उतरून टाकल्या नंतर चुलीत मोहरी तडतडल्याचा जो मस्त वास येतो त्याची सर कशालाच नाही. शिक्षक दिन होऊन गेला . पण तो तिथेच थांबला नाही.

सुटकेस ३

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/05/2020 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस २ ----------------------- चुर्रर..! ऑम्लेटचा खमंग वास दरवळला आणि भूक भडकली. टिव्हीवर बातम्या कमी आणि जाहिरातींचा भडीमार सुरू झाला. पण साली आपण ही चूक केलीच कशी? एवढ्या रात्री परत तिकडे जायची काय अवदसा सुचली. देव देतो आणि कर्म नेते दुसरे काय! चिऊ पळत आली. आणि हातात रिमोट देत म्हणाली. "घे.." मी चॅनल बदलला. आणि कार्टून लावले. दुसरा काही मार्गच नव्हता. नाहीतर तिने आकाश पाताळ एक करायला कमी केले असते. "अरे पण त्यांना तू वरती का नाही घेऊन आलास?" बायको किचनमधून म्हणाली. "घाईत होते ते.

कृतघ्न -6

लेखक बाप्पू यांनी शनिवार, 02/05/2020 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 आता पुढे.. गाडी निघाली, आणि थेट सोलापूर च्या दिशेने धावू लागली.

मंथरा (भाग 2) (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 02/05/2020 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भागासाठी माझ्या ब्लॉगची लिंक देत आहे https://jyotijinsiwalealavani.blogspot.com/ मंथरा (भाग 2) (शेवटचा) दुसऱ्या दिवशी दिवस चांगलाच वर आल्यावर मंथरा राणी कैकयीच्या महालात पोहोचली. तोपर्यंत महाराज राणी कैकयी सोबत असल्याने अंत:पुरात कोणालाही येण्याची परवानगी नव्हती; याची तिला कल्पना होती. मंथरेने आत शिरताच राणी कैकयीचे मुख न्याहाळले आणि तिच्या लक्षात आले की काल अंत:पुरातून बाहेर पडताना तिने राणी कैकयीशी जो संवाद केला होता त्याचा योग्य तो परिणाम झाला आहे. राणी कैकयी काहीतरी खूप मोठे मिळवल्याच्या समाधानात होती.

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग १

लेखक वेदांग यांनी शुक्रवार, 01/05/2020 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध http://www.misalpav.com/node/46640 आजच परिक्रमेचा श्रीगणेशा केला असल्यामुळे अंगात प्रचंड उत्साह सळसळत होता. आम्ही सर्वच रस्त्यांच्या बाबतीत अडाणी असल्यामुळे रस्त्यातच एका गुरुजींना रस्ता विचारला असता लक्षात आले कि आम्हाला सनावाद – बडवाह मार्गे जायचे आहे.

बोध कथा – Revisited

लेखक शेर भाई यांनी शुक्रवार, 01/05/2020 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वी इसापनीती का पंचतंत्र आता नक्की आठवत नाही, पण एक गोष्ट ऐकली होती. त्याच हे एक remix. एका राज्यात एक राजा असतो आणि त्याला अचानक एक दिवस दोन शिंग येतात. त्याच ते गुपित कोणालाच माहित नसते कारण शिंग तो आपल्या मुकुटाखाली दडवत असतो. मग थोड्या दिवसानी जेव्हा राजाचे केस वाढतात तेव्हा शाही हजामाला बोलावले जाते. आता त्या शाही हजामाला आपण नाव देऊ “बंडू”. कारण शाही हजाम पेक्षा बंडू छोटुस बर. तर बंडू राजाचे केस कापायला येतो, आणि बघतो तर काय.........................

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 01/05/2020 00:04 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख