Skip to main content

कथा

मोगँबो - ७

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/04/2020 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
वर पाहिल्यावर ती कालची बाई जीना उतरत होती. खूप घाबरले. तीने मला पहायच्या आत पळायला हवे. मी स्टेशनच्या दारातून बाहेर पडले.आणि बाहेरच्या गर्दीत मिसळले. भुकेने अंगात त्राण नव्हते. चक्कर येत होती डोळ्यापुढे अंधारी येत होती तरीही चालत राहीले. पळत राहीले. आणि या दादांच्या गाडीला धडकले." आशा सांगत होती . ऐकणारे नि:शब्द झाले होते.
मागील दुवा http://misalpav.com/node/46323 आशाचे बोलणे संपले . पण सगळे अजूनही त्याच शॉक मधे. सारंग ने ही शांतता भंग केली. ही जेंव्हा माझ्या बाईकला धडकली तेंव्हाच ठरवले आपल्याच वयाची आहे ही.

कार्यकारणभाव (लघुकथा)

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 06/04/2020 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
वैताग नुसता वैताग.. घरातल्यांनी नुसता वैताग आणला आहे. माणसाने बुद्धीने चालावे की अंधश्रद्धेने ? आयुष्याची तिशी ओलांडल्यावर पहिली कार घेणार आहे तर घरच्यांनी हे तारे तोडावेत ? बायको म्हणतेय "अहो.. माझ्या बाबांनी सुचवलं आहे, गाडीच्या क्रमांकाची बेरीज ७ यायला हवी. ७ अंक आपल्या दोघांकरिताही शुभ आहे" इकडे बाबा म्हणतायत "अरे गाडी घ्यायचीच तर किमान दोन महिने थांब. सध्याची ग्रहस्थिती तुला अनुकुल नाही".. निवृत्तीनंतर बाबांना ज्योतिषशास्त्राने तर सासर्‍यांना न्युमरोलोजीने पछाडले. तर आईची अजूनच वेगळी तर्‍हा "अरे आपल्या कुटूंबात कुणाला चार चाकी वाहन लाभत नाही रे.

शशक- माकडांपासून सुटका!!

लेखक Cuty यांनी रविवार, 05/04/2020 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
मी काॅलेजला गेले त्यावर्षीची गोष्ट. काय झाले काय माहीत पण अचानकच गावात माकडांची संख्या खूप वाढली. जिकडेतिकडे माकडेच दिसू लागली. गावातल्या चौकात, वडाच्या पारावर, ईमारतींच्या गच्चीवर, चक्क देवळात आणि रस्त्यांवरही माकडे मुक्तपणे संचारू लागली. गावातील लोक आणि दुकानदारही त्यांच्या माकडचाळ्यांनी त्रस्त झाले. संध्याकाळी अंगणात माझी लहान भावंडे खेळत, अन या माकडांच्या टोळ्या घराभोवती हुंदडत. कधीकधी माकडे त्यांना वाकुल्या दाखवत, डोक्यावर टपली मारत, गालगुच्चा घेत. माझ्या मैत्रिणींच्या घरीदेखील हीच परिस्थिती. एकदा काॅलेजला जात असताना गर्दीत माझी ओढणी कुणीतरी मागून खस्सकन ओढली.

अनय

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 03/04/2020 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
अनय "नको जाऊस राधे! माझ्यासाठी नाही म्हणत ग मी... तुझ्यासाठीच सांगतो आहे.... नको जाऊस त्याला निरोप द्यायला." "निरोप द्यायला जाते आहे; हे कोणी सांगितलं तुला अनय? थांबवायला जाते आहे मी." "तुला वाटतं तो तुझं ऐकेल?" "तुला वाटतं नाही ऐकणार न? बघू, कोण बरोबर ठरतं." असं म्हणून राधा धावत घराबाहेर पडली. तिला लवकरात लवकर वेस गाठायची होती. तिचा शाम गोकुळ सोडून निघाला होता. आताच आलेल्या नंदिनीने तिला तसं सांगितलं होतं. खरतर राधेचा यावर विश्वास नव्हता बसला. पण नंदिनी ही राधेची एकुलती एक मैत्रीण होती जी राधेचं मन समजू शकत होती. त्यामुळे ती काहीतरी खोटं सांगेल असं राधेला वाटत नव्हतं.....

रामनवमी

लेखक श्रीगणेशा यांनी शुक्रवार, 03/04/2020 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
आन्हिकं आटोपून उत्सवाच्या तयारीसाठी लगबग सुरु व्हायची. सर्वात प्रथम मंजन. मारुती मंदिराशेजारील नळावरून पिण्याचं पाणी आणलं जायचं. एकट्याला उचलणं अवघड, अशी देवांच्या मूर्ती ठेवलेली परात गाभाऱ्यातून मठात आणली जायची. लिंबू आणि रांगोळीच्या मिश्रणाने घासून-पुसून सर्व मूर्ती उजळून निघायच्या. वर्षानुवर्षे स्थितप्रज्ञ असलेली गणपतीची मूर्ती शेंदुराच्या लेपात अजूनच तेजस्वी दिसायची. श्रीकृष्णाची मूर्ती अगदी सुबक, सर्वात ऊंच आणि स्वच्छ करायला अगदी सोपी. बालाजीची मूर्ती त्यापेक्षा थोडी अवघड. नृसिंहाची मूर्ती मात्र सर्वात कठीण आणि जडही. तुलनेने लहान मूर्तींची संख्या खूप.

मोगँबो - ६

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 01/04/2020 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
काहितरी करायलाच हवे, त्या खोलीला एक खिडकी होती . ती उघडायचा प्रयत्न केला. पण एकदम ज्याम होती. कधी उघडलीच नसावी. त्या खोलीत एक पलंग त्यावर मळकट चादर आणि एक बाथरूम होते. मला बसायला एक तोडकी मोडकी खुर्ची. तो माणूस यायच्या आत इथून पळून जायला हवे. खिडकी उघडतच नव्हती इथून बाहेर जायचा काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. मी दारापाशीच उभी राहिले..
मागील दुवा : http://misalpav.com/node/46314 किती वेळ गेला असेल माहीत नाही. मी तशीच दाराच्या जवळ उभी राहिले. जिन्यावर कोणाची तरी पावले वाजली. दाराची कडी उघडल्याचा आवाज. हाच एक क्षण हीच एक संधी.

मोगँबो - ५

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 30/03/2020 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
तिथल्या माणसानेअगोदर मला जवळजवळ हाकलूनच दिले. बराच वेळ थांबल्यावर त्याला माझी दया आली असावी. त्याने आतल्या एका माणसाला विचारले आतल्या माणसाने परळ च्या पोस्ट ऑफिसात विचारा परळचे पोस्ट ऑफिस उद्या सकाळी उघडेल म्हणून सांगीतले. मी पुन्हा दादर स्टेशनवर आले. त्याच प्लॅटफॉर्मवर रंजन ताईची वाट पहात राहिले. रंजन ताई जीना उतरत कोणाबरोबर तरी येत होती.
रंजन ताईने मला हात केला. मीही केला. तीच्या सोबत असलेल्या दाट कुरळे केस , असलेल्या त्या काळ्या कुळकुळीत माणसाशी ती कसल्याशा कानडी भाषेत बोलत होती. तो माझ्या कडे बघत मान हलवत होता. रंजन ताईने मग माझ्याशी ओळख करून दिली.

जब I met मी :-2

लेखक Cuty यांनी रविवार, 29/03/2020 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहान होते तेव्हाची गोष्ट. पाचसहा वर्षांची असेन. आम्ही एका ओळखीच्या काकूकडे गेलो होतो. आई सांगत होती, "आमची दिदी किनई खूप शहाणी आहे. कुठेही गेलो तरी आईजवळ एकाच जागी गप्प मांडी घालून बसते. कसला गडबडगोंधळ नाही." मी वर पाहिले, आई माझ्याकडे एकटक पाहत होती. मी कसंनुसं हसले आणि मांडी सावरून बसले. बाहेर हाॅलमध्ये दादू काकूच्या मुलांसोबत नुसता धुडगूस घालत होता. त्यांची खेळणी कशीही फेकत होता. मी त्याला बोलणार होते नीट खेळायला, पण आई रागावली असती, म्हणून गप्प बसले. आई हसत म्हणाली, "फारच द्वाड झालाय! मला तर बाई आवरतच नाही." आता काकू कसंनुसं हसल्या.

मोगँबो - ४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 28/03/2020 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
तीने हात जोडले थ्यांक्यू दादा. दोन दिवस झाले काहीतरी खाऊन . गावाहून आले. हातातली पर्स कुणीतरी चोरली. येताना आणले होते ते थोडेसे पैसे होते तेही नाहीसे झाले. काल दिवसभर तशीच बसून होते. पोटात अन्नाचा कण नव्हता. तुम्ही देवासारखे आलात. ती काय म्हणत होती ते आम्हाला अर्धवटच ऐकायला येत होते. तीची अवस्था बघवत नव्हती.आम्हालाच कसेतरी होत होते. भरपूर आजारी असावी . अंगात ताप जाणवत होता. डोळ्यातून पाणी वहात होते मधूनच हुंदके देत रडत होती. रडतारडताच बोलत होती.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46300 घरात मी, धाकटा भाउ लाला.