अवेळीचा पाहुणा .
अवेळीचा पाहुणा
सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायची सवय असणाऱ्या स्वरूप ने आपल्या बेड शेजारील टेबल वरच्या नोटपॅड वर लिहिलेल्या नोंदिकडे परत एकदा अगदी शेवटची नजर टाकली.
एक ,दोन ,तीन असे इंग्रजीत आकडे लिहून त्या पुढे इंग्रजीत सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या यादीत काही विसरले तर नाही ना ? याची खात्री करून घेतली.
बाहेरचा मुख्य दरवाजा नीट लावला होता. बाहेरच्या दरवाज्यावर उद्या दुध नको अशी चिठ्ठी लिहिली होती.घरातील सगळे नळ नीट बंद केले होते. उगाच एखादा नळ चालू राहिला तर त्याच्या आवाजाने शेजारच्या सदनिकेतील कोणी ठणाणा करत येऊ नये. आता संध्याकाळचे सात वाजले होते.
मिसळपाव