लेखकगबाळ्यायांनी मंगळवार, 19/12/2017 04:04 या दिवशी प्रकाशित केले.
नोटा
(चाल : गे मायभू तुझे मी)
नोटा अनेक असती
येती तुझ्याकडे त्या
मी नोट शोधतो माझी
परक्याच भासती साऱ्या
दूरस्थ योजना* त्या
खुणवी सदा मनाला
मी गुंतवित जाता
बुडतात घेऊनि मजला
मागावयास जाता
देती कुणी न काही
नोटांनी भरले पाकिट
मी स्वप्नी रोज ते पाही
* योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन "स्कीम"
लेखकवैभवदातारयांनी सोमवार, 18/12/2017 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
( धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना.. ह्या भावगीताच्या चालीवर म्हणता येते.)
दोन जीवांची इथे भेट झाली
रात्र सारी आज चांदण्यात न्हाली ||धृ ||
तुला पाहता मन हे मोहरले
तुझे माझे नेत्री शब्द अश्रूरूप झाले
शब्दावीण संवाद अंतर्यामी झाला
तुझे माझे मनी आज अनुराग झाला ||१ ||
तुझे लाजणे ते अन् हसून बघणे
मोग-यांचे गजरे केसांत गं माळणे
तुझ्या स्पर्शाने तनु रोमांचित होई
तुझा आणि माझा श्वास एकरूप होई ||२ ||
तुझे माझे नाते चिरंतन राहो
प्रेमभाव आपुल्या मनी वृद्धिंगत होवो
एकमेका साथीने जीवन जगणे
शरीरे वेगळी मन एकरूप होणे ||३ ||
कवी आणि गीतकार : वैभव दातार
भ्रमणध्वनी :८८९८४८२३८२
लेखकपद्मश्री चित्रेयांनी मंगळवार, 12/12/2017 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा
वाटा कितीक असती
येती तुझ्याकडे ज्या
नाहीच एकही माझी
परक्याच वाटती साऱ्या
दूरस्थ तूही तेथे
ठाऊक पाहसी मजला
ओठांवरी तुझ्या ही
वसलेला तोच अबोला
वाटे परंतु तरीही
बोलणार कुणीही नाही
निःशब्द भावनांना
आभाळ साक्षी राही
पद्मश्री चित्रे
24102017
लेखकगबाळ्यायांनी सोमवार, 11/12/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )
गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.
लेखकअनन्त्_यात्रीयांनी रविवार, 10/12/2017 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
In Flander's Fields ही एक प्रसिद्ध युद्धकविता. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान डॉक्टर, सैनिक व कवी असलेल्या डॉ. जॉन मॅक-क्रे यांनी बेल्जीयम मधल्या Ypres इथल्या युद्धात मरण पावलेल्या आपल्या मित्राच्या स्मरणार्थ लिहिलेली. एका अनाम युद्धक्षेत्रावर लढताना वीरगती मिळालेल्या अनाम सैनिकांचं हे भावविभोर मनोगत. युद्ध निषेधार्ह असतं, घातक असतं, निरर्थक असतं हे सर्व जरी खरं असलं तरी अजूनही ते आधुनिक जगातलं एक अटळ वास्तव आहे. म्हणूनच ही कविता आजही वाचताना मनाला चटका लावून जाते.
ही मूळ कविता व तिचा मी केलेला भावानुवाद.
लेखकगबाळ्यायांनी शनिवार, 09/12/2017 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514
अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो.
बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….
भू नकाशा लांघणारे चित्र आहे
टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे
तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे
सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे
कवळी शाबीत गळती नेत्र आहे
शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे
अंत ना आदि असे अजस्त्र आहे
प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे
बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….
घ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....
लेखकगबाळ्यायांनी शुक्रवार, 08/12/2017 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज असे हा वार गुरु
महिना चालू डिसेम्बरू
सप्त तारीख कॅलेंडरू
लेखणी माझी झाली सुरु
कित्ती विशेष हा असे दिनु
सहा वर्षांतूनी आगमनु
पहा अचंबूनी जाई मनू
कवीस पुरेसे हे कारणु
टाकुनी मागे त्या 'बुधि'या
धाव धावतो हा जरीया
धाव संपवी तो 'शुक्रि'या
शब्द वाकवी मी लीलया
एकेक दिन हा महामेरू
वाटे कविता त्याची करू
बसलो घेऊन मी बोरू
हवा कागदा स्पॉन्सरु
लेखकरामदासयांनी गुरुवार, 07/12/2017 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
अरे ,
उधार माग ,
देतो ना चार करकरीत नोटा
कधी देणार परत असं न पुटपुटता ...
अरे,
हिशोब माग ,
देतो मुकाट सगळ्या सोळभोगाचा इत्थंभूत ,
पण उंबरठ्यावर अडकण घालून ,
एक गाणं दे ,
एक गाणं दे
असा, धोशा लावणाऱ्या दिवसाला
कसं माघारी पाठवायचं ??