Skip to main content

कविता

तेरा नाम ( हिंदी ऊर्दू कविता व भावानुवाद)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 02/07/2016 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
तेरा नाम कागज पे उतारनेसे अब डरसा लगता है तय-ब-तय सारी याँदे ऐसे खुलने लगती है जैसे दर्याने अपनी पोटली से हर रंग कि सिपीया निकालकर किनारेपें बिछा दि हो . फिर एक एक सिपी खेालते जाओ एक एक याद पिरोते जाओ देखते देखते वो एक बेहद खुबसूरत माला बन जाती है उसे गौरसे देखो तो फिर तेरी यादे घिर के आती है .... तेरा नाम कागज पे उतारने से अब डरसा लगता है |- मिसळलेला काव्यप्रेमी-| (२७/०६/२०१६) –-------------------------------------------------------- चाणाक्य यांचा भावानुवाद आताशा टाळतोच मी शक्यतो तुझं नाव लिहीणं कारण नंतर फार पसारा होतो तुझ्या आठवणींचा... समुद्राच्या लाटा कश्या शंख शिंपले उधळून टाकतात
काव्यरस

राणी दुर्गावती वर लिहिलेली कविता हवी आहे..

लेखक राघव यांनी शुक्रवार, 01/07/2016 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस खाली नमूद केलेली एक हिंदी कविता शोधतो आहे पण सापडत नाहीये. नेट वर ४-५ ओळी सापडतात.. पण पूर्ण कविता काही सापडली नाही. कुणास माहित असेल तर कृपया सांगावी. कवितेचे बोलः "दुर्गावती जब रण में निकली हाथ मे थी तलवारें दो.." माहिती हवी असल्यास कोणता सदाहरीत धागा वापरतात का ह्याची कल्पना नाही. तसे असल्यास कृपया हा प्रश्न त्यात विलीन करावा ही विनंती. राघव

माऊली उत्सव

लेखक कवि मनाचा यांनी शुक्रवार, 01/07/2016 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
|| माऊली उत्सव || विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं तुझ्या फुंकरेनं केले, स्वर हे मधाळं भक्तीरस झालं सारं, जीवन सकळं जगी नश्वरी नाही, इथे माझा राम देहभान बनले माझे, फक्त तुझा धाम तुझ्या दर्शनाची असे, आज मला आस मनमंदिरात माझ्या, फक्त तुझा वास देवा तुझ्या नामाची, चढलीया धुंदी कृतार्थाला सेवेची, दे रे एक संधी मनामधी वाहीला, तुझाच भक्तीझरा मनं माझं आतुरलेलं, मिळाया सागरा सोडूनी खेळ पाठी, हा उनसावल्यांचा चालतो मैलोन् मैल, जयघोष हरीनामाचा नाचतो मनडोलारा, नाद टाळमृदंगाचा वाहतो परमानंद डोही, वारकरी पंढरीचा मन होई रे प्रसन्न, कारणभाव सर्वसिद्धींचा तुका म्हणे तेथे

एक पावसातली भेट ... !

लेखक एकप्रवासी यांनी बुधवार, 29/06/2016 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या माझ्या ठरलेल्या भेटीला आधी पावसाने भेट दिली भिजलो आधीच चिंब मी समोर तुला भिजताना पाहिली पाहत होतो पळत येत होती तू तोल सावरत वर पाहताना मला क्षणभर वाटलं पाहता आलं असतं तर SLOW MOTION मध्ये येताना तुला पावसात भिजली जमीन गंध मातीचा आला सजली फुले सभोवती जशी तुझ्या स्वागताला वेले लपेटावी कोण्या निपर्ण झाडाला अन रंगत यावी त्याच्या जगण्याला कृष्ण धवल जगण्यात माझ्या उमटवलस तू इंद्रधानुला हातात माझ्या हात तुझा नयन नयनाशी भिडले होते मिठीत माझ्या तुला घेताना वाटे हात तोकडे होते........

कर…!!!

लेखक वटवट यांनी मंगळवार, 28/06/2016 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
कर…! काजळलेल्या राती.. पाजळलेली स्वप्नं.. कातरवेळी डोळ्यामधुनी.. पाझरलेली रत्नं.. मग, रत्नांच्या त्या गर्दीमध्ये.. गुरफटलेली धुंदी.. तू मी असता दुःख गं कसलं??... सारे काही आनंदी.. तू असताना दुःख सुद्धा गं रूप बदलते राणी.. वणव्याच्याही ओठी फुलती.. नाजूक फुलांची गाणी.. ऐक गं राणी, फुले सुद्धा ही नाहीत अगदी साधी… ह्याच फुलांनी बरी होते, शतजन्मांची व्याधी… शतजन्माची माझी व्याधी, बरी कराया ये ना… नक्षत्रांवर आपुली नावे, कोराया ये ना… चंद्र चंद्र मी.. रात्र रात्र तू.. होऊन होऊन जाशील… रोज सकाळी .. संध्याकाळी ...

सुरज (हिंदी-उर्दू रचना आणि तिचा अनुवाद)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 28/06/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
न जाने क्या है वहाँ जो सुरज रोज सुबह उठकर बिना थके दिन के चारो पहर की सारी सीढीया चढ के ऊपर चला जाता है --- फिर कुछ देर दुनिया की जानिब घूरता रहता है मानो कोई जंग जित ली हो --- कभी कभी लगता है अपने परछाई को हराने का जूनून सवार है उसपे --- ओ सुरज, तुम बडे कब होगे? |-मिसळलेला काव्यप्रेमी-| (२७/०६/२०१६) जानिब = दिशा ---------------------------------------------------------------------- (अनुवाद) असं काय ठेवलंय त्या तिथं, की हा सूर्य रोज म्हणजे अगदी रोज सकाळीसकाळी उठून जराही न थांबता, दिवसाच्या चारी प्रहरांचे जिने चढून हा असा जाऊन बसतो वरती. --- आणि मग थोडा वेळ बघत बसतो एकटक दुनियेच्या पसार्‍या
काव्यरस

हायकू – एक काव्य प्रकार

लेखक उल्का यांनी सोमवार, 27/06/2016 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक पावसाची सर यावी आणि चिब भिजवून जावी तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालंय. वाचनात अचानक एक हायकू आली आणि मला त्यात ओढून घेऊन गेली. हायकू पूर्वी ऐकली/वाचली तेव्हा साहित्य, काव्य ह्यात जेमतेम रस होता. त्यामुळे तेव्हा दुर्लक्षित राहिलेली हायकू आज मात्र वेड लावून गेली. तीन ओळींचे हे मुळचे जपानी काव्य निसर्गाशी जवळीक साधणारं, मनाला भिडणारं, समजायला खूप सोप्प असं आहे. ते क्लिष्ट नाहीये हाच मला आवडलेला त्याचा गुण म्हणेन मी. गुगल राजाला विविध प्रकारे आळवणी केल्यावर खूप माहिती वाचायला मिळाली. हायकूचे नियम कळले. 'हायकू' ही तीन ओळींची कविता. पूर्वार्धात एक विधान केलेले असते. उत्तरार्धात कलाटणी असते.

गझल - आणि हा खेळ झाला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 27/06/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
जरा हासलो आणि हा खेळ झाला तुझा भासलो आणि हा खेळ झाला तसा संयमी नित्य मी राहणारा जरा त्रासलो आणि हा खेळ झाला मला वाटले वेळ आलीच होती तरी वाचलो आणि हा खेळ झाला मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला जरा शेवटी हात जोडावयाला उभा ठाकलो आणि हा खेळ झाला अता थांबता येत नाही अपूर्व जरा धावलो आणि हा खेळ झाला - अपूर्व ओक
काव्यरस

पाऊसगाणे...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 26/06/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अंगणात आज वाजे पावसाचा ताशा सोहळ्यात पर्जन्याच्या रुजे उद्याची रे आशा.. माझे घर झाले आज आनंदाने ओलेचिंब दिसे प्रवाही पाण्यात भविष्याचे प्रतिबिंब... माझ्या घरात नाचते पावसाचे स्वैरगाणे आणि त्याच्या तालावर मन विभोर उधाणे... माझ्या मनात गुजते जुन्या पावसाची गाज गेल्या ओल्या दिवसाची सल छळते रे आज...