लेखकएक एकटा एकटाचयांनी शुक्रवार, 24/06/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
अश्याच एका पावसाळ्या रात्री,
जेव्हा ती मला भेटली होती
लखलखत्या काळोखात,
तेव्हा तिच्या कानातली चांदणी चमकली होती
एकुलत्या एका शेडखाली
मला खेटुन ती उभी होती
अन माझ्या नकळतच्या स्पर्शाने
तिची ओली काया शहारत होती
बाहेर रस्त्यावरती पाउस मात्र,
एकसारखा कधीचा कोसळत होता
मला वाटलं की तोही तिच्यासाठीच
आज ज़रा जास्तीचा रेंगाळत होता
वाटलं की तिला कवेत घेउन
ह्या पावसात चिंब भिजावं
मिठीत तिच्या विरघळून जावं
अन स्वता:लाही विसरावं
ढगांच्या गडगडाटांनी घाबरून
ती अशी काही मला बिलगावी की,
हि धरणीही त्याला अशी कधी भेटत नाही,
पाहून त्या पावसाचीही जिरावी
पाउस ही आता जरा
जास्तच इरेला पेटला होता
वाऱ्य
लेखकअविनाशकुलकर्णीयांनी शुक्रवार, 24/06/2016 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुला, रतीने बघावे
अन पाहून तव रूप ,लज्जित व्हावे
.
असा ,सखे लयबद्ध पदन्यास तुझा
पैंजणास वाटे, तुज बिलगुनि राहावे
.
अशी लाजरी अबोध रमणी, असे तू
आला वसंत देही,तुज ठाऊक नसावे.
.
नाभीत जशी त्याच्या ,कस्तुरी दरवळे
तसे मम हृदयी तू ,दरवळत राहावे
.
हे काय झाले,तुला हि कळेना
ते पाहून ,मदनाने गाली हसावे
.
तारकांच्या साक्षीने विवाहबद्ध व्हावे
मी तुला अन तू सौभाग्यास मिरवावे
लेखकअत्रुप्त आत्मायांनी बुधवार, 22/06/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या
प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या!
गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही
डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!"
सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत.
"काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. "
येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून.
लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून.
कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू?
कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त!
लेखकखुशियांनी मंगळवार, 14/06/2016 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
असूर संहारा नंतर थकून बैसले त्रिपुरारी। निढळावरचा घर्मबिंदू एक टपकला भूमिवरी॥
त्या बिंदूतुन प्रगटली एक कन्या सुंदरी। कोण असशी गे मुली तू सुख देती हासरी॥
मी तर असे आपुलीच तनुजा बोले नमस्कारुनी। घर्मबिंदूमधुन आपुल्या जन्म माझा पावनी॥
दोन पुत्र असती आमुचे पण एक उणीव होती उरी। तुझ्या जन्माने सुरसे आज तीही झाली पुरी॥
आपुलीच गे पुत्री अपर्णे येई तू स्वीकार करी। येई गे मुली बैस अंकी हसून बोले शर्वरी॥
दोन बंधू एक भगिनी मोदे खेळती अंगणी। सुखी गृहस्थी पाहून डोलती उमा आणि मदनारी॥
स्कंद गजानन लपून बैसती शोधतसे मंदाकिनी। कोठे लपले बंधू दोघे खूणे दाखवि
लेखकआ युष्कामीयांनी रविवार, 12/06/2016 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
कविता करणे माझा छंद आहे
आपणही काहीतरी करतो इतरांपेक्षा वेगळं
साहजिकच झुंडीपेक्षा वेगळा मी
भलताच देऊन जातो आत्मसन्मान
शब्दाला शब्द अन यमकांचा खेळ
लहानपणी वाचलेलं सुभाषित
लख्ख आठवतं
काव्य, शास्त्र , विनोद यांत रस
नसलेला माणूस शेपूट, शिंग
नसलेला पशु आहे
मीही सरसावतो घेऊन पेन ,
ओढून पुढ्यात
कागद वगैरे फर्रकन
मीही गलबलतो शेतकरयांचे, कष्टकरयांचे
दु:ख ऐकून , पाहून
कधी कधी विषण्ण सुद्धा होतो
drawingroom मधल्या खुर्चीत
सैलावत माझेही अश्रू ओघळतात
महागड्या कार्पेटवर
हिंदकळतो हातातला ग्लास
मीही शोक व्यक्त करतो
बलात्काराच्या घृणास्पद घटनांवर
अन् विचार करतो
आज interview ला आलेली
पोरगी एकदम मस्त ह
लेखककानडाऊ योगेशुयांनी शनिवार, 11/06/2016 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
..मला मात्र पत्नी गोरी हवी..
-------------------------------------
तशी शक्यतोही कोरी हवी.
मला मात्र पत्नी गोरी हवी
जरा घेऊ वीम्याचा फायदा.
घरी एक साधी चोरी हवी.
( मला चोर अट्टल मानेन मी.
तिच्या स्पंदनांची चोरी हवी..)
असे एक संधी निसटायची.
जवळ फक्त बळकट दोरी हवी.
तुला भोगतो मी की तू मला?
कशाला हि मग शिरजोरी हवी?
हुश्श..आत घुसलो मी शेवटी
नको आणखी घुसखोरी हवी
किती प्रेम त्याचे काट्यांवरी
सरण म्हणुन बाभळिबोरी हवी.
---------------------------
+ कानडाऊ योगेशु